
Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता
पंजाबी इंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध संगीतकार आणि गायक म्हणजे दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh). मधल्या काही काळापासून दिलजीत हे नाव फक्त पंजाबी इंडस्त्रीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगभर गाजताना दिसत आहे. दिलजीतचे संपूर्ण जगभर कोट्यवधी फॅन्स आहेत. तो आणि त्यांचे विविध कॉन्सर्ट्स तुफान गाजतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात. (Diljit Dosanjh)
गेल्या काही दिवसांपासून दिलजीत त्याच्या साध्य सुरु असलेल्या म्युझिक टूरमुळे (Music Tour) तुफान गाजत आहे. आज दिलजीत दोसांझ त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. दिलजीत दोसांझचा जन्म ६ जानेवारी १९८४ रोजी झाला. आज त्याचा ४१ वा वाढदिवस आहे. दिलजीतच्या वाढदिवसाच्या निमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही गोष्टी. (Bollywood Tadka)
दिलजीत दोसांझ पूर्वी फक्त पंजाबी इंडस्ट्रीमध्ये (Punjabi Indastri) प्रसिद्ध होता. मात्र आता तो हिंदी सिनेसृष्टीमधे देखील कमालीचा लोकप्रिय आहे. केवळ संगीत क्षेत्रात नाही तर त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. दिलजीत त्याच्या गाण्यांसोबतच त्याच्या अभिनयामुळे देखील लोकप्रिय आहे. आज दिलजीत संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असून, कोट्यवधी रुपये कमवत आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा तो पैसे कमवण्यासाठी कीर्तन, भजन म्हणायचा. (Diljit Dosanjh Birthday)

दिलजीतचा जन्म ६ जानेवारी १९८४ साली पंजाबमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव बलबीर सिंह (Balbir Singh) आणि आईचे नाव सुखविंदर कौर (Sukhvindar kaur) आहे. दिलजीतचे वडिल हे पंजाब रोडवेजचे निवृत्त कर्मचारी आहेत. दिलजीतला एक लहान भाऊ आणि बहीण आहे. दिलजीतने संगीतामध्ये करियर करताना सोबतच त्याचे शिक्षण देखील सुरु ठेवले होते. पंजाबमधील दोसांझ कलान या गावात त्याने सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि नंतर तो लुधियाना येथे गेला. सुरुवातीच्या काळात कीर्तनामध्ये भजन गाणारा दिलजीत हळूहळू पुढे जात होता.
अशातच दिलजीतने २००४ मध्ये त्याचा पहिला पंजाबी अल्बम ‘इश्क दा उडा ऐदा’ (Ishq Da Uda Ada) प्रदर्शित झाला आणि त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली. पुढे २००९ मध्ये दिलजीतने रॅपर हनी सिंगसोबत ‘गोलियां’ (Goliyan) हे गाणे गायले. या गाण्यामुळे त्याला जगात ओळख मिळाली आणि तो आंतरराष्ट्रीय स्टार बनला.
संगीताच्या क्षेत्रात यश मिळवत असताना दिलजीतने अभिनयाच्या क्षेत्रात देखील प्रवेश केला. त्याने २०११ मध्ये ‘द लायन ऑफ पंजाब’ (The Lion Of Punjab) या चित्रपटात काम करत आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या ‘जट्ट अँड ज्युलिएट’ आणि ‘जट अँड ज्युलिएट 2’ या चित्रपटांनी पंजाबी चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड तोडले. (Diljit Dosanjh Punjabi Movie)

पंजाबी इंडस्ट्री गाजवत असतानाच त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. २०१६ मध्ये दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या तुफान गाजलेल्या ‘उडता पंजाब’ (udta punjab) या हिंदी सिनेमामध्ये दिलजीतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातूनच त्याने अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
हा सिनेमा पंजाब आणि आसपासच्या परिसर होणाऱ्या ड्रग्सच्या जाळ्यावर आधारित होता. या चित्रपटात दिलजीतने पोलीस इन्स्पेकटरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Ankahi Baatein)
=================
हे देखील वाचा : A. R. Rahman वाढदिवस स्पेशल: भारतीय संगीताचा ‘राजा’ – ए आर रहमान
=================
‘उडता पंजाब’ सिनेमामुळे दिलजीतला अनेक मोठमोठ्या सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि तो या इंडस्ट्रीमध्ये देखील हिट झाला. पुढे तो अनुष्का शर्मासोबत ‘फिल्लौरी’ चित्रपटात दिसला होता. २०१८ मध्ये, त्याने माजी भारतीय हॉकीपटू संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘सूरमा’ चित्रपटात संदीप सिंगची भूमिका साकारली होती. त्यांनंतर त्याने गुड न्यूज',
सूरज पे मंगल भारी’ आदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. (Entertainment mix masala)