Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

The Perfect Murder नाटकात प्रिया मराठेच्या जागी दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री !
अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. तिच्या अचानक निघून जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत मोठा शोककळा पसरला होता. प्रिया मराठे ही मराठी इंडस्ट्रीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि सशक्त अभिनेत्री होती. तिच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली होती. त्याचप्रमाणे, तिने हिंदी मालिकांमध्ये सुद्धा पवित्र रिश्ता सारख्या प्रसिद्ध शोमध्ये अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली होती.प्रिया मराठेने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक नकारात्मक भूमिका ही केल्या, ज्या प्रेक्षकांना विशेष आवडल्या. तिच्या अशा अचानक निधनाने मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण तिच्या सशक्त अभिनयामुळे ती कायमच आठवणीत राहतेय .प्रिया कर्करोगासारख्या महाभयंकर आजाराशी लढत होती, पण तरीही कधीही तिची हिंमत ती हरली नाही. त्या आजाराशी लढताना सुद्धा ती आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत होती. अनेक कष्ट आणि संघर्षातूनही ती आपल्या मालिकांमध्ये, नाटकांमध्ये काम करत होती. जेव्हा तिच्या आरोग्याची स्थिती गंभीर झाली, तेव्हा तिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयावर तिने सोशल मीडियावर पोस्टसुद्धा शेअर केली होती.(The Perfect Murder Marathi Drama)

याच दरम्यान प्रिया मराठे च्या निधनापूर्वी ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक रंगभूमीवर चालू होते, आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. पण आजारपणामुळे प्रिया सुट्टीवर गेली होती. तिच्या निधनानंतर नाटकात तिच्या पात्राची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता यावर उत्तर मिळाले आहे, आणि दिप्ती भागवत या अभिनेत्रीने प्रिया मराठेच्या जागी नाटकात प्रवेश केला आहे.

दिप्ती भागवत सध्या या नाटकाच्या नवीन प्रयोगात काम करणार आहेत. या नाटकाच्या सोशल मीडिया पेजवर याबाबत माहिती शेअर करण्यात आली आहे. ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकात दिप्ती व्यतिरिक्त श्वेता पेंडसे आणि पुष्कर क्षोत्री यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे प्रियानंतर तिच्या पात्रासाठी अभिनेत्री योगिनी चौक याची निवड झाली होती, पण काही प्रयोगांनंतर ती नाटकातून बाहेर पडली. आता, ५ नोव्हेंबर २०२५ पासून या नाटकाचे नवीन प्रयोग सुरू होत आहेत, आणि दिप्ती भागवत त्यात प्रमुख भूमिका साकरणार आहे . या नाटकाचा शुभारंभ रॉयल ऑपेरा येथे होईल.(The Perfect Murder Marathi Drama)
============================
============================
दिप्ती भागवत या अभिनेत्रीला विशेष ओळख मिळाली ती स्वराज्य सौदामिनी ताराराणी या लोकप्रिय मालिकेमुळे. तिच्या अभिनयाने या शोमध्ये एक वेगळाच ठसा प्रेक्षकांवर सोडला होता.