Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

“Salman Khan अॅक्टर नाही तर गुंड आहे”; दबंगच्या दिग्दर्शकाने केला मोठा गौप्यस्फोट
तशा तर कलाकार, दिग्दर्शकांच्या बऱ्याच मुलाखती व्हायरल होत असतात… पण सहसा बॉलिवूडच्या ३ खान्सवर कुणी आरोप उघडपणे करताना दिसत नाहीत… परंतु, ‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी मात्र सलमान खानच्या (Salman Khan) विरोधात हाती पवित्रा घेत त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत… अगदी त्याला अॅक्टिंग येत नाही तिथपासून ते कसं सलमान आणि त्याच्या घरच्यांनी अभिनवला मानसिक त्रास दिला यावरही त्यांनी भाष्य केलं आहे… सलमान खानला अॅक्टिंग काहीच येत नाही असं म्हणत तो गुंड असल्याचं अभिनव या सणसणीत मुलाखतीत व्यक्त झाले आहेत.. काय काय गौप्यस्फोट त्यांनी केले आहेत जाणून घेऊयात…

‘बॉलिवूड ठिकाना’ या चित्रपटाला अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) यांनी मुलाखत देत सलमान खान याने कशाप्रकारे त्यांना मानसिकरित्या त्रास दिला होता याबद्दल खुलासा केला… अभिनव म्हणाले की, “सलमान खानच्या काही फॅन्सना असं वाटतं की, दबंग चित्रपटाचा दिग्दर्शक मी नाही तर अरबाज खान आहे.. त्यांना असं वाटतं की चित्रपट दिग्दर्शक नाही तर अॅक्टर तयार करत असतो… पण आम्हा दिग्दर्शक किंवा मेकर्सची ८-१० तासांची मेहनत कधीच कुणाला दिसत नाही… पण चित्रपटात हिरो काय करतो? तर येतो आणि डायलॉग्ज बोलून निधघून जातो पण सलमानला एकही डायलॉग धड बोलता येत नाही… तोएकही संवाद पाठ करत नाही, त्याला प्रोम्पटींग लागतं…सलमानच्या कोणत्याही चित्रपटात त्याची डायलॉग डिलॅवरी किती रटाळ असते…मुळात तो आयुष्यभर अॅक्टिंगच करत असतो.. कॅमेऱ्यासमोर यांना काहीच येत नाही… आणि महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचे हक्क हिसकावून घेणे, गुंडगिरी करणं हे इतकंच काम फक्त सलमानला येतं आणि याचमुळे सलमानसारखी लोकं कधीच एकटे भेटत नाहीत तर त्यांना कायम त्यांच्यासोबत ४०-५० लोकं लागतात”….(Salman Khan and Dabangg Movie)

पुढे अभिनव यांनी दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या नावाचा उल्लेख करत असं म्हटलं की, “‘दबंग’च्या सेटवर मला फार मानसिक त्रास होत होता आणि त्यामुळेच मी चित्रपट सोडणार होतो… पण माझ्या एका मित्राने मला समजवलंयय तो म्हणाला की चित्रपट सोडू नकोस कारण त्यांना तेच हवं आहे… तुझ्यासोबतही तेच होईल जे अमोल गुप्तेसोबत झालं होतं… अमोल गुप्ते (Amol Gupte) यांनी ‘तारे जमीन पर’ या चित्रपटासाठी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केलं होतं, पण त्यांना या चित्रपटातून हटवण्यात आलं होतं… (Bollywood News)
================================
हे देखील वाचा : Bollywood : लग्न न करताच झाली ही अभिनेत्री आई; लेक आहे बॉलिवूडची सुपरस्टार!
================================
दरम्यान, द ग्रेट दिग्दर्शक मणी रत्नम यांना असिस्ट करणाऱ्या अभिनव यांनी २०१० मध्ये ‘दबंग’ चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं… त्यानंतर’ बेशरम’ हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला होता…. आता अभिनव कश्यप यांनी सलमान खानवर केलेल्या आरोपांवर सलमान काही प्रतिक्रिया देणार का किंवा मग सलमानच्या बाबतीत जे म्हटलं जातं की भाईशी पंगा लिया तो करिअर खतम हे अभिनय यांच्या बाबतीत घडणार हे येणारा काळच ठरवेल… (Salman Khan Gossip News)

दरम्यान, ‘दबंग’ (Dabangg) चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटात सलमान खानसह सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, सोनू सुद, ओम पुरी, महेश मांजरेकर, विनोद खन्ना, डिंपल कपाडिया असे बरेच कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते… २०१० मध्ये रिलीज झालेल्या ‘दबंग’ चित्रपटाने भारतात १३८.८८ कोटी तर जगभरात २२१ कोटींची कमाई केली होती… आणि त्यानंतर आलेल्या ‘दबंग २’ (२०१२) ने जगभरात २४९ कोटी आणि ‘दबंग ३’ (२०१९) जगभरात २३० कोटींचा गल्ला जमवला होता… (Dabangg movie box office collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi