Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kamal Amrohi हिंदी सिनेसृष्टीतील हुशार आणि परफेक्शनिस्ट दिग्दर्शक कमाल अमरोही

 Kamal Amrohi हिंदी सिनेसृष्टीतील हुशार आणि परफेक्शनिस्ट दिग्दर्शक कमाल अमरोही
कलाकृती विशेष

Kamal Amrohi हिंदी सिनेसृष्टीतील हुशार आणि परफेक्शनिस्ट दिग्दर्शक कमाल अमरोही

by Jyotsna Kulkarni 17/01/2025

हिंदी सिनेमाला अनेक दिग्गज आणि अफाय प्रतिभा असलेल्या लोकांचा सहवास लाभला. अनेक दिग्गज लोकांनी आपल्या भारतातील या सिनेसृष्टीला मोठे करण्यासाठी खूप मेहनत घेतली. हिंदी सिनेमातील असेच एक हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कमाल अमरोही (Kamal Amrohi). आज कमाल अमरोही यांची १०६ वी जयंती आहे. (Kamal Amrohi)

हिंदी सिनेमातील अतिशय अभ्यासू, परफेक्शनिस्ट, हुशार दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून कमाल अमरोही यांना ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या ४५ वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीमध्ये केवळ ४ सिनेमे केले. कमाल यांची कारकीर्द त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूपच गाजली. कमाल अमरोही आणि मीनाकुमारी यांचे नाते आणि त्यांचे लग्न आजही चर्चेचा विषय आहे. जाणून घेऊया कमाल अमरोही यांच्याबद्दल काही गोष्टी. (Ankahi Baatein)

कमाल अमरोही यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ साली उत्तरप्रदेशमधील अमरोही येथे झाला. ते उर्दू कवींच्या कुटुंबातील होते. कविता आणि लेखन त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच मिळाले होते. पण असे असूनही त्यांचे वडील या लिखाणाच्या विरोधात होते. मात्र कमाल यांना लेखक व्हायचे होते. यासाठी त्यांनी केवळ १६ व्या वर्षी बहिणीचे चांदीचे कडे चोरले आणि ते लाहोरला निघून गेले.

Kamal Amrohi

त्यांना त्यांच्या लाहोरमधील नातेवाईकांच्या मदतीने त्यांना स्थानिक उर्दू मासिकासाठी लिखाण करण्याची संधी मिळाली. त्यांनी दोन वर्षांत, त्यांचे काम इतक्या चांगल्या पद्धतीने केले की, मालकाने आनंदाने त्यांचा पगार ३०० रुपये केला. हा ३०० रुपये पगार ३० च्या दशकात खूपच जास्त होता. नोकरी चांगली चालू असताना कमाल यांनी ओरिएंटल कॉलेजमधून पारशी आणि उर्दू भाषांमध्ये पदवी घेतली. संपूर्ण कॉलेजमध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होते. (Box Office Collection)

त्या काळी गायक आणि अभिनेते असलेले के.एल. सेहगलही लाहोरला बऱ्याचदा जायचे. एक दिवस के.एल. सेहगल यांनी कमाल अमरोही यांचे हस्ताक्षर पाहिले तेव्हा ते खूश झाले आणि ते कमाल यांना मुंबईला घेऊन आले. येथे त्यांना प्रसिद्ध निर्माता सोहराब मोदी यांचे प्रोडक्शन हाऊस मिनर्व्हा मूव्हीटोन फिल्म प्रॉडक्शनमध्ये काम मिळाले. (Bollywood Masala)

काम करताना त्यांनी १९४९ साली दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘महल‘ करायचे ठरवले. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला हॉरर चित्रपट म्हणून महल सिनेमाला ओळखले जाते. मात्र या सिनेमात कोणतीही अभिनेत्री काम करण्यास तयार नव्हती. कारण कमाल अमरोही नवीन होते. मात्र त्यांना मधुबाला (Madhubala) अभिनेत्री म्हणून पाहिजे होती. अखेर त्या तयार झाल्या आणि महल सिनेमा बनला.

हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत मधुबाला आणि लता मंगेशकर यांनाही मोठी ओळख मिळवून दिली. लतादीदींनी चित्रपटासाठी गायलेले “आयेगा, आयेगा आनेवाला” हे गाणे त्यांचे पहिले हिट गाणे ठरले. पहिल्याच चित्रपटाने कमाल यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली.

Kamal Amrohi

१९५३ मध्ये कमाल पिक्चर्स प्रोडक्शन हाऊस सुरू केले. त्याच वेळी, त्यांचे दुसरे प्रोडक्शन हाऊस कमलिस्तान स्टुडिओ होते. पहिल्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्यांनी मीना कुमारीसोबत १९५५ साली ‘दायरा’ हा पहिला चित्रपट बनवला. मात्र तो फ्लॉप ठरला. मात्र कमाल अमरोही आणि मीनाकुमारी यांच्यामध्ये प्रेम फुलू लागले. पण या दोघांच्या वयात १९ वर्षांचे अंतर होते आणि कमाल हे ३ मुलांचे वडील होते. सोबत त्यांची दोन लग्नं झाली होती.

कमाल आणि मीना यांना लग्न करायचे होते, मात्र मीना यांना माहित होते की, त्यांचे वडील हे लग्न मान्य करणार नाहीत. त्यामुळे दोघांनीही गुपचूप लग्न करण्याचा निर्णय घेतला. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी व्हॅलेंटाईन डेला मीना त्यांच्या वडिलांच्या नकळत लग्न केले. मात्र त्या पुन्हा त्यांच्या वडिलांच्या घरी आल्या. वडिलांना याबद्दल काहीच माहिती नव्हती.

लग्न लपवून ठेवण्यासाठी कमाल आणि मीना कुमारी एकत्र राहत नव्हते. एके दिवशी मीना यांच्या वडिलांना लग्नाची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटस्फोटासाठी मीना यांच्यावर दबाव आणला, पण दोघांनाही ते मान्य नव्हते. अखेर वडिलांनी मीनाला घरातून हाकलून दिले. आणि त्यानंतर मीना कमाल यांच्याकडे राहायला आल्या.

Kamal Amrohi

कमाल अमरोही यांनी मीना यांना चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली मात्र त्यांना संध्याकाळी ६.३० पर्यंत घरी परतावे लागेल या अटीवर. इतकेच नाही तर स्वतःच्या कारमध्ये यावे लागेल आणि त्यांच्या मेकअप रूममध्ये कधीही कोणीही प्रवेश करणार नाही. याशिवाय कमाल यांचे सहाय्यक बकर अली मीनाकुमारी यांच्यावर सतत पाळत ठेवत होता. यासर्व गोष्टींमुळे मीनाकुमारी खूपच त्रासल्या होत्या.

पुढे कमाल अमरोही यांनी ‘पाकिजा’ सिनेमा लिहिला. मीनाकुमारी यांच्यासोबत त्यांनाच मुख्य भूमिका करायची होती.पण अभिनय आणि दिग्दर्शन एकाच वेळी अवघड आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी विचार बदलला. कमाल मीना कुमारीबद्दल खूप पझेसिव्ह होते. अशोक कुमार यांना या चित्रपटात सलीमची प्रमुख भूमिका देण्यात आली होती.

बाकर अलीला अनेक अधिकार देण्यात आले होते. काही बातम्यांनुसार एके दिवशी बकर अली याने मीना यांना सार्वजनिक ठिकाणी चापट मारली होती. कारण त्यांच्या मेकअप रुममध्ये गुलजार यांनी प्रवेश केला होता. यानंतर मीना यांनी कमाल यांना हे सांगितले मात्र त्यांनी काहीच ऐकले नाही. नंतर मात्र मीना यांनी कमाल यांचे घर सोडले. १९५२ मध्ये झालेले मीना कुमारी आणि कमाल यांचे लग्न १९६४ मध्ये मोडले. या लग्नापासून या जोडप्याला अपत्य नव्हते.

मीना आणि कमाल यांच्या घटस्फोटानंतर पाकिजा रखडला होता. मात्र १९६९ मध्ये मीनाकुमारी यांनी सिनेमाला पुन्हा होकार दिला आणि चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले. मात्र तेव्हा अशोक कुमारऐवजी राजकुमार यांना सलीमच्या भूमिकेत साईन करण्यात आले, तर अशोक कुमार यांना सहाबुद्दीनची भूमिका देण्यात आली.

Kamal Amrohi

घटस्फोटानंतर मीनाकुमारी यांना दारूचे व्यसन जडले. त्यामुळे त्यांची प्रकृतीही त्याकाळात ठिक राहात नव्हती. उपचारासाठी त्यांना दररोज शूटिंग सोडून जावे लागत असे. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या बॉडी डबलसह शूटिंग करण्यात आले. मीना कुमारी यांनी या चित्रपटासाठी फक्त १ रुपया मानधन घेतले होते.

कमाल हे खूपच परफेक्शनिस्ट होते. ते कलाकारांच्या कपड्यांपासून, सेटवरील अतिशय छोट्या गोष्टी देखील स्वतः तपासायचे. १९६४ मध्ये या चित्रपटाचे बजेट ४० लाख ठेवण्यात आले होते. या बजेटमध्ये चित्रपटाचा सेट तयार करण्यासाठी सर्वाधिक खर्च करण्यात आला. या सिनेमाचे चित्रीकरण १८ वर्ष चालले. त्यानंतर पाकिजा चित्रपटाचा प्रीमियर ३ फेब्रुवारी १९७२ रोजी मराठा मंदिर थिएटरमध्ये झाला होता.

पाकिजा चित्रपट ४ फेब्रुवारी १९७२ प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला हा सिनेमा एक सामान्य सिनेमा मानला जात होता. मात्र ३१ मार्च १९७२ रोजी मीनाकुमारी यांच्या निधनानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांची अलोट गर्दी उसळली. अनेक किलोमीटरपर्यंत तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहायचे. ४० लाखांत बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६ कोटींची कमाई केली.

===============

हे देखील वाचा : Javed Akhtar घराण्याचा लिखाणाचा वारसा सक्षमपणे सांभाळत यश मिळवणारे गीतकार जावेद अख्तर

===============

दरम्यान मीना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर कमाल त्यांच्या दुसरी पत्नी मेहमुदासोबत राहू लागले. दोघांना तीन मुले होती. काही वर्षांनंतर १९८२ मध्ये मेहमुदा यांचेही निधन झाले. १९८३ मध्ये आलेला रझिया सुलतान हा कमाल अमरोही यांचा शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट काही विशेष कमाल दाखवू शकला नाही. कमाल यांनी ‘आखिरी मुगल’ बनवण्याचा निर्णय घेतला, पण चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी ११ फेब्रुवारी १९९३ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

मीना कुमारी यांच्या मृत्यूनंतर २१ वर्षांनी कमाल यांचे निधन झाले. त्यांची कबरही मीना यांच्या कबरीशेजारी बांधण्यात आली. घटस्फोटानंतरही मीना यांनी त्यांच्याकडे परतावे अशी कमाल यांची इच्छा होती, पण तसे झाले नाही. मीना यांचा मृत्यू झाला तेव्हा कमाल यांनी त्यांच्या कबरीशेजारीच त्यांची कबर असावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured Marathi Movie कमाल अमरोही कमाल अमरोही आणि मीनाकुमारी कमाल अमरोही जयंती कमाल अमरोही माहिती दिग्दर्शक कमाल अमरोही पाकिजा सिनेमा लेखक कमाल अमरोही
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.