Namrata Sambherao : नम्रता संभेरावला मिळाला मानाचा झी पुरस्कार

Chhaava ‘त्या’ सीनसाठी विकीचे हात रात्रभर बांधले; नंतर घेतला दीड महिन्याचा ब्रेक लक्ष्मण उतेकरांचा खुलासा
सध्या मनोरंजनविश्वात फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘छावा‘ (Chhaava). लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित आणि विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनित हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजच्या पराक्रमावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेला स्वराज्याचा वारसा जपण्यासाठी, आपल्या प्राणांची पर्वा न करता, लढणाऱ्या संभाजी महाराजांचे शौर्य या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Chhaava )
काही दिवसांपूर्वीच छावा सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे. सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या प्रमोशनच्या निमित्ताने आपल्याला कलाकारांकडून आणि दिग्दर्शकाकडून पडद्यामागील अनेक किस्से आणि घटना ऐकायला मिळत आहे. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सिनेमाच्या टीमने छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांचा जो छळ केला त्या सीनबद्दल सांगितले आहे. (Bollywood Tadka)

छावा सिनेमातील प्रत्येक लहान मोठा सीन खरा वाटावा यासाठी दिग्दर्शकांनी आणि कलाकारांनी देखील खूपच मेहनत घेतली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाच्या सीन शूट करताना छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विकी कौशलचे हात पूर्ण रात्र दोरखंडाने वर बांधून ठेवण्यात आले होते. पण विकीने याबद्दल कोणतीच तक्रार केली नाही. (Entertainment mix masala)
याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, “आम्ही सीनसाठी विकीचे हात रात्रभर दोरखंड वर बांधले होते. शूटिंग झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्याचे हात सोडवले, तेव्हा तो त्याचे हात खाली वाकवूच शकत नव्हता. बरेच तास दोरखंडाने हात वर बांधल्याने त्याचे हात आखडले होते. त्यामुळे विकीला या दुखण्यातून बरे होण्यासाठी दीड महिन्यांचा मोठा काळ लागला. म्ह्णून मग आम्हाला देखील दीड महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता. या काळात आम्ही तो सेट पूर्णपणे पाडला. विकीला बरे होण्यासाठी आम्ही पूर्ण वेळ दिला. त्यानंतर पुन्हा सेट बांधला गेला आणि पुन्हा आम्ही शूटिंग सुरु केली.” (Bollywood Masala)

यावेळी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या शूटिंगच्या वेळी घडलेला एक योगायोग देखील सांगितला. उतेकर म्हणाले, “जेव्हा संभाजी महाराजांना पकडले गेले आणि त्यांना टॉर्चर केले गेले त्याच दिवशी योगायोगाने आम्ही देखील टॉर्चरचाच सीन शूट करत होतो. आम्हला सीनच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी याबद्दल समजले की हा तोच दिवस होता, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करण्यात आला होता.”(Chhaava Movie Torture Scene Story)
दरम्यान, छावा चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाल्यानंतर एका दृष्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराज एका दृष्यात गाण्यावर नाचताना दाखवले होते. या सीनमुळे राज्यभरात मोठा वाद झाला आणि हा सीन काढण्याची मागणी केली गेली. वाद वाढल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. पुढे त्यांनी “महाराजांपेक्षा चित्रपटातील सीन मोठा नाही” म्हणत तो चित्रपटातील सीन हटवणार असल्याचे सांगितले. आणि सोबतच सर्व शिवप्रेमींची माफी देखील मागितली होती.
========
हे देखील वाचा : Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर
========
छावा हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना त्यांची पत्नी महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, डायना पेंटी आदी कलाकार देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.