Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Dev Anand सोबत ‘तिजोरी’ पडद्यावर यायला हवा होता
जवळपास प्रत्येक कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक, तंत्रज्ञ यांच्या प्रगती पुस्तकात एक हमखास असणारी गोष्ट, एखादा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडणे, एखादा चित्रपट दोन चार रिळांत बंद पडणे, एखादा चित्रपट पूर्ण होता होता बंद पडणे हे होत असतं. ही देखील एक रंगतदार आणि या चित्रपट व्यवसायाचे अंतरंग दाखवणारी गोष्ट… हे दिग्दर्शक राज खोसला यांनाही चुकलेले नाही. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (३१ मे) दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सी.आय.डी’, ‘बम्बई का बाबू’ आणि ‘मेरा गाव मेरा देश’ या म्युझिकल सुपरहिट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला यानिमित्त हे जुने चित्रपट पाहता येतील. खोसला यांनी दिग्दर्शित केलेल्या अन्य चित्रपटांवरही यानिमित्त फोकस केला जात आहे हे महत्वाचं. राज खोसला यांनी कायमच विविधता जपली हेदेखील यानिमित्त चर्चेत आहेच. (Indian cinema)

तसं पाहता, दिग्दर्शक राज खोसला आणि सदाबहार देव आनंद हीदेखील एक जोडी. या जोडीने रसिकांच्या एका पिढीला विविध थीम आणि त्यात म्युझिकल हिट असा झक्कास आनंद दिला. त्याचे प्रगती पुस्तक बघा. ‘मिलाप’ (१९५४, ‘बचना जरा यह जमाना है बुरा’ हे यातीलच गाणे), ‘सीआयडी’ (१९५६, ‘लेके पहेला पहेला प्यार’, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना’), ‘सोलवा साल’(१९५८, ‘है अपना दिल तो आवारा’), ‘काला पानी’ (१९५८, ‘हम बेखूदी मे तुमको’, ‘अच्छा जी मै हारी’), ‘बम्बई का बाबू’ (१९६०, ‘साथी ना कोई मंझिल’, ‘दीवाना मस्ताना हुआ दिल’)….एव्हाना या सर्व गाण्यातील देव आनंद कधी एकटा तर कधी त्याच्या नायिकांसोबत डोळ्यासमोर येतोच. श्रवणीय गीत संगीताची तीच खासियत आहे, ती गाणी चित्रपटाची सतत आठवण देतात. त्यात पुन्हा राज खोसला पडद्यावर गाणे खुलवण्यात एक्स्पर्ट. देव आनंद तर गाण्यात जास्त खुलणारा. ही गाणीच जुन्या चित्रपटांना पुढील पिढीतील रसिकांशी जोडतात. हेदेखील आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील एक विशेष वैशिष्ट्य. (Bollywood masala)
================================
हे देखील वाचा: Dev anand : देव आनंद पाकिस्तानी क्रिकेटपटूला घेऊन हा चित्रपट बनवणार होता!
=================================
साठच्या दशकात विजय आनंदच्या दिग्दर्शनातील देव आनंदची यशस्वी वाटचाल सुरु झाली आणि राज खोसला अन्य हीरोंकडे वळला. त्याच्या दिग्दर्शनात पुन्हा देव आनंद दिसायला १९७३ साल उजाडले. ‘शरीफ बदमाश ‘ नावाच्या या अॅक्शन चित्रपटात हेमा मालिनी नायिका होती. याही चित्रपटातील तेरे सौ दीवाने, नींद चुराके ऑखो मे…. ही दोन गाणी आजही लोकप्रिय आहेत. आणि मग निर्माते मुशीर रियाज यांच्या ‘तिजोरी’ या चित्रपटाची घोषणा झाली. तोपर्यंत मुशीर रियाज जोडीने असित सेन दिग्दर्शित ‘सफर’ ( राजेश खन्ना, शर्मिला टागोर), पुन्हा असित सेन दिग्दर्शित ‘बैराग’ ( दिलीपकुमार, सायरा बानू, लीना चंदावरकर), शक्ती सामंता दिग्दर्शित ‘मेहबूबा’ ( राजेश खन्ना, हेमा मालिनी) या चित्रपटाची निर्मिती केली होती.(Bollywood tadaka)

तात्पर्य, निर्माते तगडे होते. पटकथा के. ए. नारायणन यांची होती. विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’, ब्रीज दिग्दर्शित ‘व्हीक्टोरिया नंबर २०३ असे बंदिस्त पटकथेसाठी आजही ओळखले जाणारे चित्रपट त्यांचेच! तर छायाचित्रण फली मिस्री, गीते आनंद बक्षी, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल असा भारी संच. राज खोसला दिग्दर्शित ‘दो रास्ते’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘प्रेम कहानी’, ‘कच्चे धागे’ यांना आनंद बक्षी यांची गीते आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत असा तिहेरी सूर जुळला होताच. म्हणजे गीत संगीताची ‘तिजोरी ‘ चांगली भरणार हे स्वाभाविक होतेच. फक्त नायिका निवडायचे बाकी होते. हेमा मालिनी, राखी अथवा झीनत अमान, टीना मुनिम यातीलच कोणी एकादी असती. आपण देव आनंदची नायिका व्हावे ही अनेक अभिनेत्रींची इच्छा असे, आपल्या मुलाखतीतून त्या तसे बोलत. हीदेखील देव आनंदची खासियत म्हणायची. (Entertainment news)
================================
हे देखील वाचा: Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!
=================================
इतके सगळे काही जमून आले ते फक्त आणि फक्त या चित्रपटाच्या गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओतील मुहूर्तापुरतेच राहिले. तेवढ्यावरच या चित्रपटाची प्रगती का खुंटली आणि या पटकथेचे पुढे काय झालं ( तीच पटकथा अन्य निर्माता आणि दिग्दर्शकांनी अन्य काही नावाने पडद्यावर आणली का?) अशा प्रश्नांची उत्तरे कधीच मिळाली नाहीत आणि ती शोधायचीही नसतात. चित्रपटसृष्टीचे जग अशाच अनेक लहान मोठ्या गोष्टींनी भरलयं हे या माध्यम व व्यवसायात भटकंती, लहान मोठ्या भेटीगाठी व निरीक्षण करताना लक्षात येते. अशा कायमच्या बंद पडलेल्या चित्रपटांची तिजोरी खूप मोठी आहे. ती कधीच भरत नाही…देव आनंदची भूमिका असलेले चेतन आनंद दिग्दर्शित ‘एक था राजा’ वगैरे अनेक चित्रपट बनलेच नाहीत. त्यात ‘तिजोरी’ राज खोसलाचा चित्रपट. त्याच्या जन्मशताब्दीनिमित्त आठवलाच हवा होता.(Bollywood)