महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
Do Aur Do Pyaar सिनेमा झाला ओटीटीवर रिलीज, जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल
विद्या बालन आणि प्रतीक गांधी स्टारर ‘दो और दो प्यार‘ हा सिनेमा थिएटरनंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही. अशावेळी जर तुम्ही हा सिनेमा पाहणं चुकवलं असेल तर तुम्ही आता तो ओटीटीवर पाहू शकता. शीर्षा गुहा ठाकुरता दिग्दर्शित ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला होता. विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती यांच्यासह अनेक स्टार्स या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.(Do Aur Do Pyat On Ott)
जर तुम्ही ‘दो और दो प्यार‘ हा सिनेमा थिएटरमध्ये पाहणं चुकवलं असेल तर आता याबाबत चांगली बातमी येत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात ‘दो और दो प्यार’ कुठे स्ट्रीम केला जातो आणि तुम्हा तो कुठे पाहू शकाल. ‘दो और दो प्यार’ हा विद्या बालनचा २०२४ मधील पहिला चित्रपट होता. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग केली. मात्र, यानंतर हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही. आता डिस्ने प्लस हॉटस्टारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर ‘दो और दो प्यार’ च्या स्ट्रीमिंगची घोषणा केली आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टारने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ”पुन्हा प्रेमात पडा, कारण ते एकदाच पुरेसे नाही., ‘दो और दो प्यार’ आता स्ट्रीमिंग होत आहे.” शीर्षा गुहा ठाकुरता दिग्दर्शित ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात विद्या बालन काव्या गणेशनची भूमिका साकारत आहे. तर अनिरुद्ध बॅनर्जीच्या भूमिकेत प्रतीक गांधी दिसला आहे.(Do Aur Do Pyat On Ott)
==================================
==================================
वैवाहिक जीवनात खूप त्रास सहन करणाऱ्या या दोघांची ही कहाणी आहे. दोघांनी प्रेमविवाह केला असला तरी लग्नाच्या १२ वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यातील प्रेम संपुष्टात येते. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दोघेही विवाहबाह्य संबंधात पडतात. यानंतर काय होते यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल.