
Aishwarya Rai Bachchan च्या बॉडीगार्डचा पगार माहितेय का? आकडा ऐकून तुमचे ही डोळे विस्फारतील
Aishwarya Rai: पूर्व मिस वर्ल्ड आणि बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आपल्या सौंदर्य आणि गुणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. तिचे करोडो फॅन्स आहेत, जे तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्या विश्वासार्ह बॉडीगार्ड्सवर असते. ऐश्वर्या आपल्या स्टाईल आणि शानदार अभिनयासाठी ओळखली जाते, आणि एक नटी म्हणून सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रीपैकी ती एक आहे. जेवढी ऐश्वर्या प्रसिद्ध आहे तेवढीच तिची सुरक्षा ही मजबूत असते. पूर्व मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची लोकप्रिय डीवा ऐश्वर्या राय बच्चनची फॅन फॉलोइंग जगभरात पसरलेली आहे.(Aishwarya Rai Bachchan)

पण तुम्हाला माहिती आहे का, तिच्याबरोबर तिच्या सावलीसारखा असणारा तिच्या बॉडीगार्डचा पगार किती आहे? सेलिब्रिटी होणे याचा अर्थ केवळ ग्लॅमर आणि लक्झरी नाही तर त्यांना तेवढी मजबूत आणि उच्च सुरक्षा आवश्यक आहे. ऐश्वर्याची लोकप्रियता पाहता तिच्या बॉडीगार्ड्सना देखील फार अलर्ट राहावे लागते. फॅन्सच्या गर्दीत कलाकाराचा सुरक्षा राखणे ही त्यांची सर्वात मोठी जबाबदारी असते.

बॉलीवूड स्टार्सच आयुष्य जितक ग्लॅमरस दिसत, तितकीच त्यांची सुरक्षा ही आवश्यक आहे. खास करून जेव्हा विषय ऐश्वर्या राय बच्चनचा असेल, कारण तिचे चाहते जगाच्या प्रत्येक काना कोपऱ्यात आहेत. जेव्हा ती एखाद्या इवेंट ला सामान्य लोकांमध्ये दिसते, तेव्हा तिचे फॅन्स तिला घेरून घेतात. यामुळे अशा परिस्थितीत तिचा बॉडीगार्ड शिवराज तिची सुरक्षा सांभाळतो, आणि तो नेहमी तिच्यासोबत असतो. शिवराज फक्त ऐश्वर्याची सुरक्षा संभाळत नाहीत तर बच्चन कुटुंबाचे विश्वासार्ह सिक्युरिटी गार्ड देखील आहेत. (Aishwarya Rai Bachchan)
=======================================
हे देखील वाचा: ‘देवमाणूस’ मध्ये Sai Tamhankar पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!
=======================================
ऐश्वर्या राय बच्चन हीचा बॉडीगार्ड शिवराज केवळ तिच्या सुरक्षेसाठी नाही तर त्यांच्या कुटुंबासोबतही खूप जवळ मानला जातो. सांगितले जाते की 2015 मध्ये ऐश्वर्या हिच्या लग्नात सुद्धा तो उपस्थित होता . यामुळे त्यांच्यात किती घरच्यांसारखे संबंध आहेत ते समजू शकते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ऐश्वर्या आपल्या बॉडीगार्ड्सना खुप मोठा पगार ही देते.अर्थात , त्यांच्या अचूक पगाराचा उलगडा झालेला नाही, पण रिपोर्ट्सनुसार, शिवराजला दरमहा लाखो रुपये मिळतात. India.com च्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे की ऐश्वर्या रायच्या या खास बॉडीगार्डला मोठी रक्कम दिली जाते. इतकेच नाही तर, ऐश्वर्याचा आणखी एक बॉडीगार्ड राजेंद्र ढोले याचा पगारही चर्चेत असतो , त्यांच पॅकेज वार्षिक 1 कोटी रुपये आहे.यावरुन कळते की एका कलाकाराचे आयुष्य जितके ग्लॅमरस असते, तितकीच त्याच्या जबाबदाऱ्या आणि सुरक्षेची काळजी घेतली जाते.