ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘बिग बीं’ चा ‘मै आजाद हूं’ आठवतो का?
सिनेमातील गर्दीच्या शॉट साठी मोठ्या लोकसंख्येने जर लोकांना एकत्र आणायचे असेल तर तो एक मोठा अवघड टास्क असतो. कारण या गर्दीवर नियंत्रण करणे खूप अवघड असते. त्यात पुन्हा जर चित्रपट पोशाखी असेल, ऐतिहासिक असेल, धार्मिक असेल तर तेवढ्या लोकांसाठी ड्रेपरीचा वेगळा इंतजाम करावा लागतो. बॉलीवूडमध्ये अशा गर्दीच्या सीन साठी लोक पुरवणारे काही यंत्रणा आहेत. ती यंत्रणा तुम्हाला पैसे देऊन माणसं पुरवतात. (Amitabh Bacchan)
पण एखादा शॉट जर रस्त्यावरच घ्यायचा असेल आणि लोकांना फक्त त्या गर्दीचा एक भाग व्हायचा असेल तर काय करायचे? उगाच पैसे कशाला द्यायचे? असाच एक पेचप्रसंग अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंग च्या दरम्यान निर्माण झाला होता. पण अमिताभने (Amitabh Bacchan) एक जुगाड करून मस्त गर्दी जमवली होती. पण एकूणच तो प्रसंग चित्रित करणे खूप अवघड झाले होते. कोणता होतो तो चित्रपट? आणि काय होता तो प्रसंग? खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे.
टिनू आनंद दिग्दर्शित ‘मै आजाद हूं हा चित्रपट १९८९ झाली प्रदर्शित झाला होता. हा एक ऑफ बीट सिनेमा होता. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या कमर्शियल सिनेमा सारखा तो नव्हता. थोडाफार कलात्मक शैलीत मोडणारा असा हा चित्रपट होता. यात अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) सोबत शबाना आझमी असली तरी ती टिपिकल नायिका नव्हती. त्यात दोघांचा एकही रोमॅण्टिक सीन नव्हता. या चित्रपटात क्लायमॅक्सच्या सीनमध्ये त्यांना पाच ते दहा हजाराचा लोकांचा मॉब हवा होता. एवढे लोक एकत्र कसे आणायचे ? या चित्रपटाची चित्रीकरण गुजरात मधील राजकोट येथे चालू होते. सर्वांनी एकत्र बसून विचार करायला सुरुवात केली.
राजकोटच्या स्टेडियममध्ये हा शॉट घ्यायचे ठरवले. सिनेमाचे बजेट खूपच कमी होते. काय करायचे? अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांना एक भन्नाट आयडिया सुचली. त्यांनी सांगितले,” आपण इथल्या लोकल पेपर मध्ये एक जाहिरात देऊ. त्यामध्ये असे सांगू की, सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा एक शो आहे आणि या शोमध्ये तुम्हाला सामील व्हायचे आहे. या या ठिकाणी संपर्क साधा.” अमिताभ बच्चन यांच्या शोला फुकट जायला मिळतय म्हणून लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. फक्त राजकोटच नाही तर आजूबाजूच्या गावातून लोक तिथे आली.
निर्मात्याला फक्त पाच हजार लोक हवे होते पण पन्नास हजाराची गर्दी जमली. निर्माता दिग्दर्शकाने प्रेक्षकांना अंधारातच ठेवले होते. त्यांनी सर्व बाजूने कॅमेरे सेट केले आणि मुख्य कॅमेरा अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) वर केंद्रित केला. अमिताभ बच्चन यांनी हातामधून माईक घेऊन लोकांना सांगितले की, ”आता तुम्हाला माझ्या मागून ही कविता म्हणायची आहे.” लोकांना खूप इंटरेस्ट आला. लोकांनी आनंदाने हो म्हटले.
आता कॅमेरा ऑन झाला. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी आपल्या स्वरात धीर गंभीरपणे गायला सुरुवात केली. ’इतने बाजू इतने सर गिन ले दुश्मन जान के…’ एका टेक मध्ये सर्व गाणं चित्रित झालं. हे गाणं शबाना आझमीचे वडील कैफी आजमी यांनी लिहिलं होतं. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी नंतर लोकांशी गप्पा मारल्या. लोक देखील खूष झाले. आणि हा क्लायमॅक्सचा शॉट व्यवस्थित चित्रित झाला. अमिताभचा जुगाड मस्त जमून आला. लोकांना अमिताभ (Amitabh Bacchan) सोबत काम करता आले आणि निर्मात्याचे पैसे वाचले.
================
हे देखील वाचा : ‘कभी कभी’ चे टायटल सॉंग अमिताभ बच्चन गाणार होते?
================
जाता जाता थोडंसं ‘मै आजाद हूं’ या चित्रपटाबद्दल : खरंतर टिनू आनंद यांना हा चित्रपट आर्ट फिल्म म्हणून बनवायचा होता. त्यांना एका थिएटरमध्येच हा सिनेमा रिलीज करायचा होता. अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) राजकारणात व्यस्त असल्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण लांबत गेले. हा सिनेमा १९४१ साली Frank Capra यांच्या Meet John Doe, या सिनेमावर बेतला होता. या सिनेमाचे आधीचे टायटल ‘सत्यम’ होते. आज हा सिनेमा सर्वांच्या विस्मृतीत गेला आहे. पण अमिताभने एक ऑफ बीट सिनेमा करण्याचा प्रयत्न यातून केला होता हे नक्की!