‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अमीर खान आणि किट्टू गिडवानीचा लीप लॉक किसिंग सीन आठवतो कां?
हिंदी सिनेमाच्या इतिहासात चुंबनाची (kissing scene) परंपरा खूप जुनी आहे. मूकपटात देखील काही सिनेमात चुंबन दृश्य होती. बोलपटात तीसच्या दशकात देविका राणी हिचे ‘कर्म’ या चित्रपटातील हिमांशू रॉय सोबतचे प्रदीर्घ चुंबन दृश्य (kissing scene) अनेक वर्ष चर्चेत होतं. त्यानंतर मात्र विशेषतः स्वातंत्र्यानंतर चुंबन दृश्यांवर सेन्सॉर बोर्ड आक्षेप घेऊ लागले. मग दिग्दर्शक काही आयडिया करून सूचक पद्धतीने ही दृश्य प्रेक्षकांना दाखवली जाऊ लागली. बागेत दोन फुलं एकमेकांना भेटतात, चिकटतात यातून बऱ्याचदा चुंबदृश्य सूचित अर्थाने दाखवलं जायचं! साठच्या दशकात मात्र ‘जोहर मेहमूद इन गोवा’ या एका चित्रपटात चुंबन दृश्य दाखवला गेलं आणि ते सेन्सॉरने संमत देखील केले. आय एस जोहर आणि सोनिया सहानी यांच्यातील ते चुंबन दृश्य होतं. तो भारतातील पहिले सेन्सॉर पास ऑफिशियल किस सीन समजला जातो. नंतर हळूहळू समाजात मोकळेपणा आल्यानंतर सेन्सॉर बोर्ड देखील अशा दृश्यांकडे डोळे झाक करू लागले. एकविसाव्या शतकात तर इमरान हाशमीच्या आगमनानंतर चुंबनदृश्यांचा (kissing scene) कहरच झाला! आता ओटीटी जमान्यात तर किसिंग सीन बाबत कुणालाच काही वाटत नाही. पण एकेकाळी किसिंग सीन बाबत आपल्या समाजात एक Tabu होता. किसिंग सीन देणाऱ्या कलाकाराकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जायचं.
अशा या प्रतिकूल परिस्थितीत ऐंशीच्या दशकामध्ये आमिर खानने एका चित्रपटांमध्ये किसिंग सीन (kissing scene) केला होता. हा चित्रपट फारसा न चालल्यामुळे कुणाच्या ते लक्षात देखील नाही. परंतु आमिर खान चे पहिले रुपेरी चुंबन म्हणून त्याकडे बघितले जाते. आमिर खानने नंतर ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात जूही चावलाचे आणि राजा हिंदुस्तानी या चित्रपटात करिष्मा कपूर यांचे प्रदीर्घ चुंबन घेतले होते. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील करीना कपूर सोबतचा त्याचा किसिंग सीन भलताच लोकप्रिय झाला होता. पण आज आपण पाहणार आहोत आमिर खानचा पहिला किसिंग सीन. आमिर खानचा हा पहिलाच चित्रपट होता १९८४ साली प्रदर्शित झालेला ‘होली’. या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते नंतर ‘मिर्च मसाला’ ‘माया मेमसाब’ ‘मिस्टर योगी’ हे सिनेमे दिग्दर्शित केलेल्या केतन मेहता यांनी. हा सिनेमा एक लो बजेट सिनेमा होता. पुण्याच्या एफ टी आय च्या स्टुडन्ट चा तो एक प्रायोगिक प्रयत्न होता. (kissing scene)
या सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण पुण्याच्या एफटीआय आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले होते. सिनेमाचे दिग्दर्शक केतन मेहता हे देखील पास आऊट स्टुडन्ट असल्यामुळे त्यांना पुणे शहर खूप आवडते होते. हा सिनेमा कॉलेज जीवनावर आधारित होता. ‘रॅगिंग’ च्या प्रश्नावर यात भाष्य केले होते. या सिनेमात आमिर खान आणि अभिनेत्री किट्टू गिडवानी यांचे हे चुंबन दृश्य होते. आज तुम्हाला किट्टू गिडवानी लगेच आठवणार नाही पण दूरदर्शन च्या सिंगल स्क्रीन च्या काळात ती दूरदर्शनच्या बऱ्याच मालिकांमधून आणि जाहिरातीमधील दिसत होती. तिचे आणि आमिर खानचे काही सेकंदाचे लीप लॉकिंग चुंबन दृश्य या सिनेमात होते. यातील आमिर खानला जर तुम्ही पाहिले तर तुम्ही ओळखणार नाही. कारण मिशी आणि कमी केस यामुळे तो पटकन ओळखला जाऊ शकणार नाही. या सिनेमाच्या वेळी आमिर खानचे वय अवघे अठरा होते. या सिनेमात आमिर खान सोबत आशुतोष गोवारीकर, ओम पुरी, श्रीराम लागू, नसरुद्दीन शहा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा व्यवस्थितरित्या प्रदर्शित न झाल्याने आमिर खानचा पहिला चित्रपट लोक ‘कयामत से कयामत तक’ हाच समजतात पण त्यापूर्वी तब्बल सहा वर्ष ‘होली’ हा चित्रपट आला होता आणि हाच आमिर खानचा पहिला चित्रपट होता. हा सिनेमा युट्यूब वर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी खाली दिली आहे. (kissing scene)