Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

चांगल्या हेतूने केलेली कुठलीही गोष्ट चांगलंच फळ देऊन जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॅान..

 चांगल्या हेतूने केलेली कुठलीही गोष्ट चांगलंच फळ देऊन जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॅान..
मनोरंजन ए नया दौर मिक्स मसाला

चांगल्या हेतूने केलेली कुठलीही गोष्ट चांगलंच फळ देऊन जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॅान..

by Kalakruti Bureau 09/06/2020

इतक्या सिनेमांचे आपण चित्रीकरण केले आहे, आपण एखादा चित्रपट काढून पाहायला हरकत नाही म्हणून नरिमन इराणी यांनी जिंदगी-जिंदगी नावाच्या सिनेमाची निर्मिती केली, तो सॉलीड आपटला आणि त्यांच्यावर १२ लाखांचं कर्ज झालं (७८ सालचे १२ लाख). यानंतर ते मनोजकुमारच्या रोटी, कपडा और मकान ह्या सिनेमाचं चित्रीकरण करत होते, त्याच वेळी टांझानियामध्ये जन्मलेला, वाढलेला नंतर लंडनमध्ये स्थायिक झालेला चंद्रा बारोट इंग्लंडला काही कामधंदा जमला नाही म्हणून मनोजकुमारकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सात वर्षांपासून काम करत होता. कॅमेर्‍यामधून प्रत्येक शॉट बारकाईने आणि अभ्यासाने पाहण्याच्या चंद्राच्या सवयीने नरीमन इराणींना चंद्रा आवडू लागला आणि त्यांची दोस्ती झाली. ह्या सेटवर इराणी सोडल्यास अमिताभ, झीनत अमान आदी सगळी चंद्राच्याच वयाची मंडळी होती. आपण भलं आणि आपलं काम भलं ह्या वृत्तीचे पण कामात चोख असलेले नरीमन इराणी सगळ्यांचे लाडके होते. एके दिवशी इराणींनी चंद्राला हजार रुपये मागितले. चंद्राला आश्चर्य वाटले पण त्याने ते दिले. त्यांनंतर त्यांनी काही दिवसांनी दहा हजार मागितले तेही चंद्राने दिले आणि कारण विचारलं. इराणींनी त्याला जिंदगी-जिंदगी ची कथा सांगितली. साठ हजार रुपये महीना कमावणारे इराणी बारा लाखाचं कर्ज कसं फेडायचं ह्या चिंतेत होते. त्यावर यातून निघण्यासाठी आपण एक सिनेमा काढू असे चंद्राने त्यांना सांगितले. त्यासाठी त्याने अमिताभ, झीनत यांना पटविले. सगळ्यांनी इराणींसाठी होकार भरला. आता प्रश्न होता कथेचा, तर चंद्राने वहीदा रहमान यांच्या मार्फत सलीम खानशी संपर्क साधला आणि सलीमने त्यांना तीन-चार वर्षांपासून पडून असलेली आणि जितेंद्र, धर्मेंद्र, देवानंद, प्रकाश मेहरा इत्यादी दिग्गजांनी नाकारलेली ‘डॉन वाली स्टोरी’ दाखवली. जेम्स बॉंडच्या सिनेमांवर वाढलेल्या चंद्राला सूटा-बूटातल्या खलनायकाची कथा एकदम आवडली. तोपर्यंत हिंदी सिनेमातले खलनायक धोतरं नेसून घोड्यावर यायचे. त्या तुलनेत हे धाडसच होतं. सात वर्षात चंद्रा चांगला तयार झाला आहे त्याला दिग्दर्शन सोपवायला हरकत नाही अशी ग्वाही मनोज कुमारने इराणींना दिली. सलीम खान चर्चा करतांना नेहमी ‘डॉन वाली स्टोरी’ असा उल्लेख करायचे. त्यामुळे इराणींनी ‘डॉन’ हे शीर्षक नोंदवून टाकले. कल्याणजी आनंदजींना संगीताची जवाबदारी सोपवली. इराणी कर्जातून बाहेर निघण्यासाठी आणखीन सिनेमा काढताहेत तेही नव्या दिग्दर्शकाला घेवून, तेही अनेकांनी नाकारलेल्या कथानकावर आधारीत यावरुन सिनेसृष्टीत लोकं चेष्टेच्या सुरात बोलायला लागले. त्यातून इराणी-चंद्रा जोडी फारच मजेदार होती. इराणी सहा फुटी धिप्पाड तर चंद्रा साधारण प्रकृतीचा, साडेपाच फुटाचा. कर्जातून निघण्यासाठी सिनेमातर काढायचा पण त्यासाठी पैसे नाहीत. सुरवात गाण्याच्या शुटींगने केली. त्याकरीता धाकट्या भावाच्या स्वप्नपूर्तीसाठी पैसे चंद्राच्या गायिका बहिणीने दिले. सिनेमाचं शुटींग रंगात आलं अन् प्राणला अपघात झाला. तो लंगडत होता म्हणून मग कथेत बदल करुन त्याला लंगडा दाखवला. ते होत नाही तर मोठा धक्का बसला, खुद्द इराणींचा मृत्यु झाला. जुने बारा लाख आणि हा नवीन खर्च असा सर्व बोजा इराणींच्या बायकोवर आला, पुन्हा दोस्तांनी हिम्मत बांधली. डॉन जख्मी हुआ तो क्या हुआ, आखिर डॉन है ह्या संवादाला जागत शुटींग सुरू राहीले. अमिताभ, झीनत, प्राण यांनी पैसे नकोच सिनेमा पूर्ण करु असा धीर चंद्राला दिला. सिनेमाचे रशेस पाहून सलीम-जावेद ने चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा होतोय या शब्दात अमिताभ व चंद्राचे कौतुक केले. डॉन म्हणजे क्षणाक्षणाला धक्का देणारी अशी अतिशय चोख आणि बंदीस्त मनोजकुमारच्या शब्दात एअर टाईट पटकथा होती. त्यांनीच लोकांना रिलॅक्स व्हायला उत्तरार्धात एक गाणं टाकण्याची सुचना केली आणि मुळात बनारसी बाबू या सिनेमासाठी लिहीलेल्या ‘खईके पान बनारसवाला’ या गाण्याचा डॉनमध्ये समावेश झाला. त्यांत लावारिसच्या चित्रीकरणाच्या दरमयान पाय दुखावलेला असतानाही खैके पानचं चित्रीकरण अमिताभजींने थांबवले नाहि … !!! चित्रपट तयार झाला. चित्रातल्या ‘व्हाईट स्पेस’चे महत्व समजणार्‍या चंद्राने सिनेमाचे पोस्टर्स स्वतः करवून घेतले. पूर्ण पांढर्‍या पार्श्वभागावर एका रंगातली झीनत अमान आणि दिवाकर करकरे या चित्रकाराने काढलेला धावणारा अमिताभ इतकाच ऐवज असणारी ती पोस्टर्सही गाजली. त्यावेळचे मोठे चित्रपट प्रत्येक विभागात साधारण नऊ लाखाला विकले जायचे. डॉनला प्रत्येक टेरेटरीत एकवीस लाख अशी सॉलीड रक्कम मिळाली. एकूण ८४ लाखात तयार झालेल्या डॉनने पहिल्याच वर्षी ७ करोड बॉक्स ऑफिस कालेक्शन जमवले. आज पावेतो ३५० कोटींपेक्षाही अधिक कमाई केली आहे. डॉन नंतर महीनाभरात कल्याणजी आनंदजी अमिताभला घेवून वर्ल्ड टूरला निघाले. त्यांच्या प्रत्येक शोची सुरवात ‘जिसका मुझे था इंतजार ने’ व्हायची तर शेवट ‘खईके पान बनारसवालाने’. डॉन सर्व संबधितांच्या कारकीर्दीतलं सोन्याचं पान ठरला. चंद्रा स्वतःही नंतर तसा चित्रपट तयार करुन शकला नाही. आणि हो ज्या कारणासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला ते इराणींचं कर्जही फिटलं व त्यावर्षीचे अवॉर्ड अमिताभजींना मिळाले.
तर हे सगळं लिहिण्याच् कारण … सध्याच्या लॉक डाऊनमुळे आपण सर्वच कठीण आर्थिक परिस्थितीतुन जाणार आहोत. आपल्याला जमेल तिथं कुबेर व धनलक्ष्मी प्रसंन्न करुयात… अर्थात कामे व पैसे एकजुटीने मिळवूयात. कोणी आपला दोस्त, मित्र मैत्रीण, नातलग प्रतिकुल परिस्थितून जात असेल तर शक्यतो आपल्यातच अंतर्गत व्यवहार करून एकमेकाला सावरुयात. वरील पोस्टवरून चित्रपटाच्या निर्मितीचा मूळ हेतूच अहम मित्राला कर्जातून बाहेर काढण्यासाठी होता. पुढे घडलेल्या विपरीत घटनेतून कुटुंबास सगळ्यांनी निरपेक्ष वृत्तीने मदत केली. त्याची परतफेड ही मिळतेच. मग मदत कितीही छोटी का असेनात.

गेल्या वर्षीच्या गाजलेल्या सुबोधभावेच्या “तुला पाहते रे” मालिकेतल वाक्य आठवत … दो रुपये भी बहुत बडी चीज होती हैं बाबू …. !!!!!

सौजन्य –
डीआय फिल्म्स ग्रुप, सुरेश पाटील


  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood Topics bollywood update Cinema Entertainment Indian Cinema movies
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.