Dilip Prabhavalkar : ८१व्या वर्षी प्रभावळकरांचा ‘दशावतार’, बॉडी डबल न

Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का म्हणाले साबळे?
काही दिवसांपूर्वीच ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाचं दुसरं पर्व येणार असं जाहिर करण्यात आलं… पण या पर्वात सुत्रसंचालक म्हणून डॉ. निलेश साबळे (Dr. Nilesh Sabale) ऐवजी अभिजित खांडकेकर (Abhijeet Khandkekar) दिसणार आहे… आणि हाच मुद्दा उचलून प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत निलेशवर टीका केली होती… यावर निलेशने इन्स्टाग्रावर एक सविस्तर व्हिडिओ करुन त्यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं… आता पुन्हा एकदा त्याने या प्रकणावर भाष्य करत कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं ही खंत व्यक्त केली आहे… नेमकं काय म्हणाला आहे निलेश साबळे जाणून घेऊयात…(Marathi Entertainment News)

तर, नुकतीच निलेश साबळे याने लोकशाहीला एक मुलाखत दिली… यावेळी पुन्हा शरद उपाध्ये यांच्या टीकेबद्दल विचारलं असता निलेश म्हणाला की,”हा विषय माझ्यासाठी कायमचा संपला आहे आणि मी कायम शरद उपाध्ये सरांचा आदर करेन”, असं तो म्हणाला. पुढे तो असं देखील म्हणाला की, “मी तो विषय आता विसरून गेलोय, तुम्ही विचारलात म्हणून…कारण, एखादी गोष्ट तेव्हाच थांबते जेव्हा आपण त्याविषयीचं बोलणं थांबवतो. मी त्या व्हिडीओमध्ये नमूद केल्याप्रमाणे सन्माननीय शरद उपाध्ये सरांनी यापूर्वी सुद्धा दोन-तीनवेळा अशा पोस्ट केल्या होत्या. तेव्हा मी गोष्टी सोडून दिल्या होत्या. सहा वर्षांपूर्वी सुद्धा त्यांनी अशीच एक पोस्ट लिहिली होती…त्यातही त्यांनी बरंच काही म्हटलं होतं.”

निलेश पुढे मनातील खंत व्यक्त करत म्हणाला की, “शेवटी सांगायचं काय तर कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं. कलाकार व्यक्त झाले तरी समस्या निर्माण होते आणि एखादा कलाकार व्यक्त झाले नाहीत तरीही समस्या निर्माण होतेच. पूर्वी या गोष्टी व्हायच्या नाहीत. पण, आता काय झालं आहे…प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे मला अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जरी लिहायचं असेल तरी मी पटकन लिहू शकतो. माझी पोस्ट जर त्यांच्यापर्यंत पोहोचली तर, दुसऱ्या मिनिटाला ते सुद्धा ती पोस्ट वाचू शकतात. आता सोशल मीडिया संवाद साधण्याचं नवीन माध्यम झालंय पण, त्यावर काहीही लिहिणं हे योग्य नाहीये.”(Entertainment)
================================
=================================
निलेश पुढे असं देखील म्हणाला की, “मला असं वाटतं की अलीकडच्या काळात हे फार सुरू झालं आहे… आपण एखाद्या गोष्टीवर काहीही बोलायच्या आधी प्रतिक्रिया यायला सुरू होते. त्या घटनेनंतर अनेकांना असं वाटलं, ‘अरे निलेश साबळेचा हा चेहरा आम्हाला माहितीच नव्हता’, ‘अरे बरं झालं तुम्ही निलेशचा खरा चेहरा आमच्यासमोर आणला’, ‘निलेश साबळे असा असेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. असा विचार अनेकांनी केला. कलाक्षेत्रात तुमची एक इमेज असते आणि ती जर अशा प्रसंगांमुळे डागाळली गेली तर, पुढच्या कामांवर त्याचा निश्चित परिणाम होतो. मला माझेच लोक विचारू लागले…तू असा वागला होतास का? मग मी ठरवलं की, नाण्याची एक बाजू लोकांना समजली आता दुसरी बाजू कळणं फार गरजेच आहे. एखादी मोठी व्यक्ती जेव्हा हे सगळं सांगते…तेव्हा लोकांना वाटतं अरे हेच बरोबर आहे…त्यामुळे यावेळी सविस्तर बाजू मांडणं मला महत्त्वाचं वाटलं.” (Latest Entertainment News)
================================
=================================
शेवटी निलेश म्हणाला की,सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपला मुद्दा प्रामाणिकपणे मांडला पाहिजे असा विचार मी केला. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा निश्चित अधिकार आहे पण, त्यांनी नीट माहिती घ्यायला हवी होती. गैरसमजातून झालेला तो सगळा प्रकार होता…मी सगळ्यांना एकच सांगेन आता तो विषय माझ्या बाजूने पूर्णपणे संपला आहे. शरद उपाध्ये सर आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी त्यांचा आयुष्यभर आदरच करेन.” आता तुर्तास निलेशच्या बाजूने या प्रकरणाला पुर्णविराम लागला असून उपाध्ये यांचं यावर पुन्हा काही म्हणणं असणार का? की ते देखील विषय इथेच संपवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागंल आहे खरं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi