‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         Dr. Nilesh Sable पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘होम मिनिस्टर’ शी होतेय तुलना…
मराठी मनोरंजन विश्वातुन एक नविनमाहिती समोर आली आहे. अभिनेता, लेखक, आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे आता आपल्या फॅन्ससाठी नव्या शोमध्ये दाखल होतोय. ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध शोमुळे प्रत्येकाच्या ओठांवर असलेल्या या बहुपरिचित व्यक्तिमत्त्वाने आता वहिनीसाहेब सुपरस्टार या नव्या कार्यक्रमाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. निलेश साबळे या शोमध्ये त्याच्या उत्तम विनोदी लेखनासाठी आणि धमाल संवादांसाठी ओळखला जातो. ‘चला हवा येऊ द्या’च्या 10 वर्षांच्या प्रवासात निलेशने विविध विनोदी आणि समृद्ध भूमिका साकारल्या. या शोने त्याला एक वेगळी ओळख दिली, पण त्याच्या अत्यंत व्यस्त शेड्यूलमुळे त्याने दुसऱ्या सीझनला नकार दिला होता.(Dr. Nilesh Sable)

काही काळानंतर, निलेश साबळे स्टार प्रवाहवरील ‘ढिंच्याक दिवाळी’ या शोमध्ये दिसला, ज्यामुळे त्याच्या फॅन्सना एक आनंदाचा धक्का बसला. या शोमध्ये त्याच्याशी असलेली जोडी आणि कलाकारांची निवड यावर चर्चा झाली, आणि त्याला भविष्यात या वाहिनीवर आणखी काही काम करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता निलेश साबळे आपल्या नवीन प्रकल्पाबद्दल आनंदाने सांगत आहेत. त्याने ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ या आगामी शोचे नाव सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या फॅन्सना उत्सुक केलं आहे. हा शो धमाल खेळ, गप्पा, कॉमेडी, संगीत आणि बक्षिसे यावर आधारित असेल. कार्यक्रमाच्या घोषणा सोबतच निलेशने सहभाग घेण्यासाठी संपर्क क्रमांक सुद्धा शेअर केला आहे, परंतु शो कोणत्या वाहिनीवर प्रसारित होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ या नावावरून अनेकांना असा अंदाज आला आहे की, हा शो झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ सारखा असावा, जो घरातील गृहिणींशी संवाद साधून, त्यांच्याशी खेळ खेळून आणि त्यांना बक्षिसे देण्यावर आधारित होता. निलेश साबळेच्या या नव्या प्रयोगामुळे महिलांना या शोमध्ये सहभागी होण्यासाठी खूप उत्सुकता आहे.(Dr. Nilesh Sable)
==============================
हे देखील वाचा: Abhanga Tukaram Movie: अजिंक्य राऊत दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 
==============================
निलेश साबळेच्या पोस्टवर अनेकांनी आनंद व्यक्त केला असून, काही युजर्सनी भाऊ कदम यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न विचारले आहेत. ते दोघं एकत्र शोमध्ये दिसणार का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल असं दिसतं. निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमामुळे बऱ्याच महिलांनी सहभागी होण्याची इच्छाशक्ती दाखवली आहे, आणि त्यांच्या या खास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात हा शो लोकांच्या विशेष चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
