
Rakhi Sawant : ड्रामा क्वीन आणि अंबानी कुटुंबाचं कनेक्शन माहितेय का?
ड्रामा क्वीन म्हटलं की एकच नाव येतं ते म्हणजे राखी सावंत. हिंदीत आयटम सॉंग करणाऱ्या राखी सावंत हिचा इंडस्ट्रीत येण्यापूर्वीचा संघर्ष फार आहे. आता पापाराझींना इक्सक्लूझिव्ह फुटेज देणारी किंवा सातत्याने चर्चेत राहण्यासाठी काहीनाकाही खुरापती करणारी राखी सावंत एकेकाळी वेटर म्हणून काम करत होती हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात ड्रामा क्वीन राखी सावंतबद्दल….(Rakhi Sawant)
राखी सावंत (Drama queen) हिने कायमच लोकांना चर्चेसाठी विषय दिले. अनेक इंटरव्ह्यूमधून तिने बॉलिवूड इंडस्ट्री किंवा कलाकारांबद्दल गौप्यस्फोटही केले. हे करत असताना तिने तिचं वैयक्तिक जीवन कसं होतं हे देखील सांगितलं. एका इंग्रजी मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत म्हणाली होती की, तिने १९९१ मध्ये उद्योगपती Anil Ambani आणि टीना मुनीम यांच्या लग्नात वेटरेसचं काम केलं होतं. इतकंच नव्हे तर अंबानींच्या लग्नात जेवण वाढण्याचं कामंही तिने केलं. “जेव्हा मी १० वर्षाची होते तेव्हापासून मी कॅटर्सकडे दिवसाचे ५० रुपये कमवण्यासाठी काम करत होते”, असंही राखी म्हणाली होती. (Bollywood update)

याशिवाय राखीने (Rakhi Sawant) तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत चाळीत तीचं लहानपण मोठ्या कुटुंबासोबत गेल्याचंही म्हणालीते. चाळींमध्ये मुलींना बाहेर खेळायला जायची परवानगी देत नव्हते. पण ज्यावेळी पैसे कमावण्याची वेळ येत होती तेव्हा त्याच मुलीला बाहेर कमावण्यासाठी पाठवत होते. त्यामुळे बाहेर काम केल्यानंतर पुन्हा त्याच घरात जाण्याचं माझं कधीच मन व्हायचं नाही. “कुटुंबासाठी कमवत असताना मी माझं बालपण कधी जगलेच नाही याची खंत आजही मला होते”, असंही राखी म्हणाली.(entertainment trending news)
बरं, राखी सावंत (Rakhi Sawant) हे तिचं खरं नाव नाहीये हे तुम्हाला माहित आहे का? हो. राखी सावंतचं खरं नाव आहे निरा भेडा. राखी सावंतच्या आईने म्हणजे जया भेडा यांनी पोलिस कॉन्सटेबल आनंद सावंत यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांचं आडनाव राखीने अॅडॉप्ट केलं आणि इंडस्ट्रीला मिळाली द ड्रामा क्वीन राखी सावंत. वयाच्या ११ व्या वर्षी एका दांडिया स्पर्धेत राखीने भाग घेतला होता. पण तिच्या आईला तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ नये असं वाटत होतं. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन राखीने चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमवण्यास सुरुवात केली. मात्र, सावळ्या रंगामुळे तिला रिजेक्शन मिळालं. अखेर १९९७ मध्ये ‘अग्निचक्र’ या चित्रपटात तिला ब्रेक मिळाला आणि त्यानंतर राखीची गाडी सुटलीच.(Bollywood gossip)

राखी सावंत (Rakhi Sawant) हिने ‘जोरु का गुलाम’, ‘कुरुक्षेत्र’, ‘बदमाश नं १’, ‘मैं हु ना’, ‘दम’, ‘शुटआऊट एट लोखंडवाला’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली. पण तिच्या भूमिकांपेक्षा ‘राखी का स्वयंवर’, तिचे आयटम सॉंग्स अधिक लोकांना लक्षात राहिले. नुकतंच तिने पाकिस्तानची सुन होणार असल्याचा स्टंट केला होता खरा पण आता भविष्यात खरंच तिचं लग्न होणार का? किंवा तिचं लग्न झालं आहे का? याची उत्तरं मिळणं जरा अशक्यच वाटतंय. मात्र, तोवर ड्रामा क्वीन राखी सावंत आपलं मनोरंजन करतेय ते एन्जॉय करुन घेऊयात… (entertainment masala)