Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन आणि अंबानी कुटुंबाचं कनेक्शन माहितेय का?

 Rakhi Sawant : ड्रामा क्वीन आणि अंबानी कुटुंबाचं कनेक्शन माहितेय का?
कलाकृती विशेष

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन आणि अंबानी कुटुंबाचं कनेक्शन माहितेय का?

by रसिका शिंदे-पॉल 07/03/2025

ड्रामा क्वीन म्हटलं की एकच नाव येतं ते म्हणजे राखी सावंत. हिंदीत आयटम सॉंग करणाऱ्या राखी सावंत हिचा इंडस्ट्रीत येण्यापूर्वीचा संघर्ष फार आहे. आता पापाराझींना इक्सक्लूझिव्ह फुटेज देणारी किंवा सातत्याने चर्चेत राहण्यासाठी काहीनाकाही खुरापती करणारी राखी सावंत एकेकाळी वेटर म्हणून काम करत होती हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात ड्रामा क्वीन राखी सावंतबद्दल….(Rakhi Sawant)

राखी सावंत (Drama queen) हिने कायमच लोकांना चर्चेसाठी विषय दिले. अनेक इंटरव्ह्यूमधून तिने बॉलिवूड इंडस्ट्री किंवा कलाकारांबद्दल गौप्यस्फोटही केले. हे करत असताना तिने तिचं वैयक्तिक जीवन कसं होतं हे देखील सांगितलं. एका इंग्रजी मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत म्हणाली होती की, तिने १९९१ मध्ये उद्योगपती Anil Ambani आणि टीना मुनीम यांच्या लग्नात वेटरेसचं काम केलं होतं. इतकंच नव्हे तर अंबानींच्या लग्नात जेवण वाढण्याचं कामंही तिने केलं. “जेव्हा मी १० वर्षाची होते तेव्हापासून मी कॅटर्सकडे दिवसाचे ५० रुपये कमवण्यासाठी काम करत होते”, असंही राखी म्हणाली होती. (Bollywood update)

याशिवाय राखीने (Rakhi Sawant) तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत चाळीत तीचं लहानपण मोठ्या कुटुंबासोबत गेल्याचंही म्हणालीते. चाळींमध्ये मुलींना बाहेर खेळायला जायची परवानगी देत नव्हते. पण ज्यावेळी पैसे कमावण्याची वेळ येत होती तेव्हा त्याच मुलीला बाहेर कमावण्यासाठी पाठवत होते. त्यामुळे बाहेर काम केल्यानंतर पुन्हा त्याच घरात जाण्याचं माझं कधीच मन व्हायचं नाही. “कुटुंबासाठी कमवत असताना मी माझं बालपण कधी जगलेच नाही याची खंत आजही मला होते”, असंही राखी म्हणाली.(entertainment trending news)

बरं, राखी सावंत (Rakhi Sawant) हे तिचं खरं नाव नाहीये हे तुम्हाला माहित आहे का? हो. राखी सावंतचं खरं नाव आहे निरा भेडा. राखी सावंतच्या आईने म्हणजे जया भेडा यांनी पोलिस कॉन्सटेबल आनंद सावंत यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांचं आडनाव राखीने अॅडॉप्ट केलं आणि इंडस्ट्रीला मिळाली द ड्रामा क्वीन राखी सावंत. वयाच्या ११ व्या वर्षी एका दांडिया स्पर्धेत राखीने भाग घेतला होता. पण तिच्या आईला तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ नये असं वाटत होतं. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन राखीने चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमवण्यास सुरुवात केली. मात्र, सावळ्या रंगामुळे तिला रिजेक्शन मिळालं. अखेर १९९७ मध्ये ‘अग्निचक्र’ या चित्रपटात तिला ब्रेक मिळाला आणि त्यानंतर राखीची गाडी सुटलीच.(Bollywood gossip)

राखी सावंत (Rakhi Sawant) हिने ‘जोरु का गुलाम’, ‘कुरुक्षेत्र’, ‘बदमाश नं १’, ‘मैं हु ना’, ‘दम’, ‘शुटआऊट एट लोखंडवाला’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली. पण तिच्या भूमिकांपेक्षा ‘राखी का स्वयंवर’, तिचे आयटम सॉंग्स अधिक लोकांना लक्षात राहिले. नुकतंच तिने पाकिस्तानची सुन होणार असल्याचा स्टंट केला होता खरा पण आता भविष्यात खरंच तिचं लग्न होणार का? किंवा तिचं लग्न झालं आहे का? याची उत्तरं मिळणं जरा अशक्यच वाटतंय. मात्र, तोवर ड्रामा क्वीन राखी सावंत आपलं मनोरंजन करतेय ते एन्जॉय करुन घेऊयात… (entertainment masala)

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anil ambanai Bollywood bollywood drama queen bollywood update drama queen entertainemnt tadaka Rakhi Sawant Rakhi Sawant Ex husband tina munim
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.