Dream Girl 2 Box Office Collection: आयुषमान खुराना च्या ‘ड्रीम गर्ल 2’ ची बंपर कमाई !
अभिनेता आयुष्मान खुरानाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘ड्रीम गर्ल 2′ हा 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ड्रीम गर्ल चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात आयुष्मान पूजा या महिलेच्या भूमिकेत झळकला आहे. पूजाच्या भूमिकेने आयुष्मानने चित्रपटगृहात सर्वांना खळखळून हसवले आहे. त्याचबरोबर ओपनिंग डेच्या निमित्ताने ‘ड्रीम गर्ल २’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे, त्यामुळे या विनोदी चित्रपटाने पहिल्याच दिवशी चाहत्यांवर आपला ठसा उमटवला आहे, असे म्हणता येईल. जाणून घेऊया या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची कमाई केली आहे.(Dream Girl 2 Box Office Collection)
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्लने पहिल्या दिवशी 10.69 कोटींची कमाई केली आहे. संध्याकाळी चार वाजल्यानंतर मात्र यात बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली पहायला मिळाली. आणि गदर 2, ओह माय गॉड 2 नंतर आता ड्रीम गर्ल 2 च्या पहिल्या दिवसाच्या कमाईमुळे चित्रपटसृष्टीत उत्साहाची लाट उसळली आहे. यापूर्वी केरळ स्टोरी, सत्य प्रेम की कथा, रॉकी आणि राणी की प्रेम कहानी, झारा हटके, जरा बचके यांसारख्या मिड बजेट चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे.
त्याबरोबर ट्रेड अॅनालिस्ट सुमित कडेल यांच्या मते, चित्रपटाच्या मॉर्निंग शोमध्ये २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. हा चित्रपट दिवसभरात ४० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवू शकतो. ड्रीम गर्ल 2 दुसऱ्या दिवशी 14 ते 15 कोटींची कमाई करू शकतो असा अंदाज आहे. बॉक्स ऑफिसवर सातत्याने अपयशी ठरल्यानंतर आयुष्मान खुराना कोरोना महामारीनंतर पहिला हिट चित्रपट देणार आहे. या चित्रपटाचे लाइफटाइम कलेक्शन १४२.२६ कोटी रुपये होते.ड्रीम गर्ल 2 च्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 1 लाखाहून अधिक तिकिटे विकली होती. ज्यामुळे या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 3.13 कोटींचा गल्ला जमवला आहे. ड्रीम गर्ल २ चे सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग मुंबई आणि एनसीआरमध्ये झाले आहे.(Dream Girl 2 Box Office Collection)
======================
हे ही वाचा: Gadar 2 Box Office Collection: गदर 2 सिनेमा ४०० कोटींच्या क्लबमध्ये झाला सामील!
======================
ड्रीम गर्ल 2 बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. 2019 मध्ये आलेल्या ड्रीम गर्लचा हा सिक्वल आहे. ड्रीम गर्ल 2 च्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडे, अन्नू कपूर, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, सीमा पाहवा, मनजोत सिंग महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.