Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

रायटर्स होत आहेत ॲक्टर्स….

 रायटर्स होत आहेत ॲक्टर्स….
टीव्ही वाले मिक्स मसाला

रायटर्स होत आहेत ॲक्टर्स….

by Kalakruti Bureau 28/04/2021

‘लाईटस् कॅमेरा ॲक्शन’ आता फक्त ॲक्टर पर्यंत मर्यादित राहिलं नसून आता लेखक सुद्धा अभिनयात आपली चुणूक दाखवत आहेत. मालिकेचं  कथा, पटकथा लेखन, संवाद लेखन म्हणजे एखाद्या मालिकेचा प्राण असतो. मालिकेचा लेखक काहीसा पडदयाआड असला तरी त्याची भूमिका मालिकेच्या युनीटमध्ये महत्त्वाची असते. पण आता पडद्याआडचे लेखक मंडळी थेट कॅमेरा फेस करताना दिसत आहेत. आपण लिहिलेल्या मालिकेत एखादा रोल करताना तर एखाद्या मालिकेत कॅरॅक्टर निभावताना दिसत आहेत. कोणत्या आहेत या मालिका त्यावर एक नजर टाकूया…             

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत अभिषेक ज्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करतो त्या हॉस्पिटलमधील मॅडम म्हणजेच डॉक्टर वसुधा हे पात्र साकारणारया मुग्धा गोडबोले या मालिकेच्या संवाद लेखिका आहेत. आतापर्यंत या मालिकेतील वास्तवदर्शी संवाद लेखनासाठी त्यांचं खूप कौतुक होतय आणी  त्यांचा अभिनयसुद्धा आता प्रेक्षकांना भावतोय. ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेतदेखील त्यांनी भूमिका साकारली आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) मालिका तर इतकी यशाच्या शिखरावर आहे कि आता मालिकेचा तिसरा सिझन आपल्या भेटीला आलाय. या तिनही सिझनमध्ये इसरलंय असं म्हणणारं एक पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार ठरलं. हा मालिकेत सगळं विसरणारा पांडू मात्र मालिकेचे संवाद लिहायला अजिबात विसरत नाही. कारण पांडूची भूमिका साकारणारा प्रल्हाद कुरतडकर या मालिकेच्या प्रत्येक सिझन साठी लेखन करतोय.

  • रोहिणी निनावे
  • मुग्धा गोडबोले

नुकत्याच संपलेल्या ‘माझ्या नवरयाची बायको’ या सिरीअलचा लेखक अद्वैत दादरकरने त्या सिरिअलमध्ये राधिकाच्या दुसऱ्या नवऱ्याची भूमिका तर साकारलीच पण त्याचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की आता तो ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेमध्ये सोहम ही महत्वाची भूमिका साकारतोय. लेखक किरण माने सध्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत माऊच्या वडिलांची भूमिका सक्षमपणे निभावत आहेत.

याआधी सुद्धा लेखक अनेकदा मालिकांतून आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसले आहेत. लेखक चिन्मय मांडलेकर याने ‘तू तिथे मी’ या मालिकेत नायकाची भूमिका साकारली. त्याने अवघाची संसार, कुंकू, एका लग्नाची तिसरी गोष्ट यासारख्या दर्जेदार मालिकांचं लेखन केल आहे. लेखिका मधुगंधा कुलकर्णीने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत मेघनाची मोठी जाऊ हे पात्र साकारल आहे. त्यांनी होणार सून मी या घरची यासारख्या लोकप्रिय मालिकेसाठी लेखन केल आहे. माझ्या नवरयाची बायको या मालिकेचे लेखक अभिजीत गुरू आणि रोहिणी निनावे यांनी सुद्धा या मालिकेत अभिनयातून प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या भूमिकामधून आले.

अशाप्रकारे आता पडदयाआड लेखनाची महत्त्वाची भूमिका पार पाडणारे लेखक पडद्यावर सुद्धा तितक्याच ताकदीचा अभिनय करताना दिसत आहे. लेखक लेखिका आता अभिनेते अभिनेत्री होताना कधी लेखन आणि अभिनय अशा दुहेरी जबाबदाऱ्या निभावत आहेत. लेखणीमुळे प्रसिद्ध असणारे लेखक आता कलाकार म्हणूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

–   सिध्दी सुभाष कदम 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Entertainment Marathi Serial marathi Show Television writer
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.