‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कुली सिनेमाच्या ॲक्सीडेंटमुळे ‘हा’ सिनेमा ठरला सुपरहिट
अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान झालेला अपघात सर्वाना माहिती आहे पण आणखी एक अपघात त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाच्या दरम्यान देखील झाला होता. अर्थात हा अपघात अतिशय छोटा होता पण या अपघातामुळे अमिताभ बच्चन यांना त्यांच्या दुसऱ्या एका चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणासाठी एक वेगळा विग वापरला होता! आणि ‘कुली सिनेमाचा ॲक्सीडेंट या सिनेमाला सुपरहिट (Superhit) करून गेला. ही एक मस्त इंटरेस्टिंग स्टोरी आहे. काय होता हा नेमका प्रकार? कोणत्या सिनेमाच्या शुटींगच्या दरम्यान घडला?
आज अमिताभ बच्चन यांच्या या दुसऱ्या एक्सीडेंट बद्दल माहिती घेऊयात. हा चित्रपट होता रवी टंडन यांनी दिग्दर्शित केलेला ‘खुद्दार’. १९८२ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट मेहमूद यांचे भाऊ अन्वर अली यांनी निर्माण केला होता. अन्वर अली आणि अमिताभ बच्चन हे दोघेजण अतिशय चांगले मित्र होते. अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’. या चित्रपटात अन्वर आली यांची देखील एक भूमिका होती. या दोघांची मैत्री तिथूनच सुरू झाली. मुंबईमध्ये आल्यानंतर अमिताभ बच्चन यांचा पहिला मित्र म्हणजे अन्वरअली. आणि यांच्यामुळेच अमिताभ बच्चन यांना ‘बॉम्बे टू गोवा’ हा चित्रपट मिळाला होता. अन्वर अली मेहमूद यांचे प्रोडक्शन हाऊस ते सांभाळत होते. त्यांनी काही चित्रपटात अभिनय देखील केला होता. सत्तरच्या दशकाच्या मध्यावर मात्र मेहमूद आणि त्यांचा धाकटा भाऊ अन्वर अली यांच्यात काही कारणाने मतभेद झाले आणि मेहमूदने रागाभरात अन्वर अली ला आपल्या कंपनीतून काढून टाकले. अन्वर अली अक्षरशः रस्त्यावर आले.(Superhit)
त्यांना पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहमूद चा भाऊ म्हणूनच ओळखत होते. त्यांना स्वतःची अशी वेगळी आयडेंटिटी नव्हतीच. त्यामुळे त्यांनी आता स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक चित्रपट निर्माण करायचे ठरवले. पण प्रश्न पैशाचा होता. एक फायनान्सर त्यांना पैसे द्यायला तयार झाला; परंतु त्याने सांगितले की ,” मी तुला पैसे त्याच वेळेला देईल जेव्हा तुझ्या चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन असेल!” अन्वर अली ताबडतोब आपला जुना मित्र अमिताभ बच्चन यांच्याकडे गेले आणि त्यानी सर्व परिस्थिती कथन केली. अमिताभ ने देखील सायनिंग अमाऊंट न घेता मार्केट रेट च्या केवळ निम्मे पैसे घेऊन चित्रपट केला. या चित्रपटाची कथा पटकथा संवाद सलीम जावेद यांनी लिहावी असे अमिताभला वाटले परंतु त्यांचे रेट खूप जास्त होते. त्यामुळे अमिताभ कादर खान यांच्याकडे गेले आणि कादर खान यांनी या चित्रपटाचे कथा पटकथा संवाद लिहिले. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद मेहरा, संजीव कुमार परवीन बाबी, बिंदिया गोस्वामी, प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला संगीत राजेश रोशन यांच्या होते. प्रारंभी या चित्रपटाची खरी नायिका रेखा होती परंतु नंतर तिच्या जागी परवीन बाबी आली. मूळ कथानकात नायिका हि मराठी मुलगी दाखवली होती. परंतु परवीन बाबी आल्यामुळे ती गोवानीज ख्रिश्चन दाखवली गेली .
आता येऊ मूळ किस्स्यांकडे. या चित्रपटात एक गाणे होते ‘मच गया शोर सारी नगरी मे…’ मुंबईच्या दहीहंडी मधील हे लोकप्रिय गाणे या चित्रपटात होते. या गाण्याचे शूट च्या वेळी सर्वजण अगदी जोशात होते. गाण्याची चाल धमाकेदार होती. या गाण्यात शेवटी अमिताभ बच्चन दहीहंडी फोडतो. दहीहंडी हाताने फोडावे असे ठरले होते. परंतु जोश मध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले मी ही दहीहंडी डोक्याने फोडणार! आणि गाण्याच्या क्लायमॅक्स ला अमिताभ ने जेव्हा ही दहीहंडी डोक्याने फोडली त्यावेळेला त्याच्या कपाळाला मोठी खोक पडली. मोठा रक्त स्त्राव झाला आणि तब्बल सात ते आठ टाके कपाळाला तिथे पडले. अमिताभच्या ह्या एक्सीडेंट बद्दल फारशी चर्चा झाली नाही. कारण हा रुटीन ॲक्सीडेंट होता. पुढे अनेक वर्षांनी अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये याचा खुलासा केला. (Superhit)
====
हे देखील वाचा : याचं भन्नाट कल्पनेमुळे ‘मिस्टर इंडिया’ ठरला हिट
====
खरी गंमत पुढेच आहे. त्यावेळी अमिताभ बच्चन मनमोहन देसाई यांच्या ‘देशप्रेमी’ या चित्रपटात देखील काम करत होते. त्याचे देखील चित्रकरण याच काळात चालू होते. अमिताभ बच्चन यांच्या कपाळाला टाके पडल्यामुळे आता देश प्रेमी च्या शूटिंगच्या वेळेला मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्या चित्रपटातील ‘गोरे नही हम काले सही….’ या गाण्याचे चित्रीकरण होणार होते. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी एक आयडिया केली. या गाण्याच्या वेळेला त्यांनी जो केसांचा विग वापरला होता तो विग थोडासा आणखी खाली कपाळावर त्यांनी ओढून घेतला आणि गाण्याचे चित्रीकरण पार पडले! तुम्ही काळजीपूर्वक ‘देश प्रेमी’ चित्रपटातील हे गाणे पहा तुम्हाला लक्षात येईल. ‘खुद्दार’ हा चित्रपट ३० जुलै १९८२ या दिवशी प्रदर्शित झाला आणि प्रचंड हिट (Superhit) झाला. हा चित्रपट प्रचंड यशस्वी होण्यामागे ‘कुली’ या चित्रपटातील एक्सीडेंट देखील होता. कारण ‘कुली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान बंगलोर येथे २६ जुलै १९८२ या दिवशी अमिताभ बच्चन यांचा मोठा एक्सीडेंट झाला आणि अमिताभ बच्चन सिरीयस झाले. या घटने नंतर त्यानंतर अवघ्या चार दिवसांनीच ‘खुद्दार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे सहाजिकच प्रेक्षकांच्या उड्या या चित्रपटवर पडल्या आणि सिनेमा सुपरहिट (Superhit) ठरला. खरंतर हा सिनेमा तब्बल पाच वर्षे निर्मिती अवस्थेत होता खूप रखडला त्यामुळे याच्या यशाबाबत सर्वांच्या मनात शंका होती पण कुली सिनेमातील अमिताभचा एक्सीडेंट या प्रेमासाठी लाभदायक ठरला. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानच परवीन बाबी पुण्याला ओशो यांच्या आश्रमात निघून गेल्यामुळे तिचे बरेचसे शॉट्स या सिनेमात कमी करावे लागले!