Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ekda Yeun Tr Bagha Movie: प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

 Ekda Yeun Tr Bagha Movie: प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
kalakruti-ekda-yeun-tr-bagha-movie-directed-by-maharashtrachi-hasyajatra-fame-prasad-khandekar-marathi-info/
मिक्स मसाला

Ekda Yeun Tr Bagha Movie: प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

by Team KalakrutiMedia 03/11/2023

आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात हे प्रत्येकाला पटेल. आपल्या आयुष्यात आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला अगदी सहज साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब  लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. २४ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतंय. या कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत अनुभवायची असेल तर प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट तुम्हाला पाहावाच लागेल.(Ekda Yeun Tr Bagha Movie)

श्रावण, फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची ही गोष्ट आहे.  फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरु तर करतात पण ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात? ज्या गिऱ्हाईकांची वाट बघत आहेत ते गिऱ्हाईक हॉटेल मध्ये आल्यावर हे कसे एका प्रॉब्लेम मध्ये अडकत जातात आणि मग पुढे काय होतं ? त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्याला ही  मंडळी कशी सामोरी जातात? या सगळ्याची गमतीशीर गोष्ट म्हणजे ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट.  

गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने अशी तगडी स्टारकास्ट फुलंब्रीकर कुटुंबात पहायला मिळणार आहेत. या पाच जणांसोबत सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठी फौज चित्रपटात  आहे. हे कुटुंब तुम्हाला निखळ हास्याची मेजवानी देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रसाद खांडेकर  व्यक्त करतात.एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब  २४ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतंय.(Ekda Yeun Tr Bagha Movie)

=======================

हे देखील वाचा: Astitva Marathi Drama: भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत…

=======================

२४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ekda Yeun Tr Bagha Movie Entertainment maharashtrachi hasyajatra marathi movie 2023 namrata sambherao omkar bhojane prasad khandekar movie tejswini pandit
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.