सेरोगेसीच्या माध्यमातून निर्माती एकता कपूर दुसऱ्यांदा होणार आई? खरी माहीती आली समोर
निर्माती एकता कपूर आपल्या प्रोफेशनल लाईफबद्दल सर्वांना अपडेट ठेवत असली तरी तिला पर्सनल लेव्हलवर लाइमलाइटपासून अंतर ठेवणं आवडतं. एकता सिंगल असून एका मुलाची आई आहे. आता नुकतीच ती पुन्हा आई होणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. या रिपोर्टवर एक नवीन अपडेट आले आहे. प्रसिद्ध निर्माती एकता कपूर तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे खूप चर्चेत असते. चित्रपट आणि टीव्ही शोची निर्मिती केल्यानंतर आता ती ओटीटीवर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिच्या यशस्वी वेब सीरिजही आहेत. एकता वयाच्या 48 व्या वर्षीही सिंगल आहे आणि ती एका मुलाची आई सुद्धा आहे.आता ती सरोगसीच्या माध्यमातून पुन्हा आई होणार असल्याचे वृत्ता समोर आले होते. पण आता या रिपोर्टवर एक नवीन अपडेट आलं आहे.(Ekta Kapoor Expecting A Second Baby)
अलीकडेच एक रिपोर्ट आला की, एकताचा मुलगा रवी आता 5 वर्षांचा झाला आहे आणि आता त्याला ही भावाची गरज आहे. एकता कपूरही यावर विचार करत असून सरोगसीच्या माध्यमातून पुन्हा आई होण्याचा विचार करत आहे. पण आता नव्या अहवालात या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून ही केवळ अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे. नव्या स्टेटमेंटमध्ये या बातमीबाबत म्हटले होते की, केवळ एक्सक्लुझिव्ह आणि लाइक्सच्या बदल्यात खोटी माहिती शेअर करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही.कुठल्याही बातमीला आधी पूर्ण सन्मान दिला पाहिजे आणि आधी त्याची चौकशी व्हायला हवी. अशा बातम्याही समोर येणे अत्यंत हास्यास्पद आहे.
केवळ एकता कपूरच नाही तर तिचा धाकटा भाऊ तुषार कपूरही आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत सरोगसीच्या माध्यमातून वडील बनला आहे. त्याच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे. दोन्ही भावंडे लाइमलाइटपासून दूर राहतात. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तुषार कपूर अजूनही चित्रपटांमध्ये सक्रीय आहे, पण तो कमी दिसतो.(Ekta Kapoor Expecting A Second Baby)
============================
हे देखील वाचा: ताजिकिस्तानचा गायक Abdu Rozik लवकरच लग्न बंधनात अडकणार !
============================
मागच्या वेळी तो त्याची बहीण एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या लव्ह सेक्स आणि धोखा 2 या चित्रपटात दिसला होता. याशिवाय फरहाद सामजीच्या ओटीटी ‘सीरिज पॉप कौन‘मध्ये ही दिसला होता.