Elvish Yadav पुन्हा अडचणीत; काशी विश्वनाथ मंदिरात केलेली ‘ही’ चूक युट्यूबरला पडली महागात
प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव जिथे जातो तिथे त्याच्यासोबत अस काहीतरी होतच ज्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होते आता पुन्हा एकदा एल्विश वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे आणि यावेळी प्रकरण असे आहे की, त्याच्यावर श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसरात फोटो काढल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि म्हणूनच त्याची तक्रार वाराणसीच्या उपायुक्तांकडे करण्यात आली आहे. वकील प्रतीक कुमार सिंह यांनी वाराणसीच्या सत्र न्यायालयात पत्राद्वारे एल्विश यादव विरोधात तक्रार दाखल केली आहे. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण नेमक आहे तरी काय.(Kashi Vishwanath Temple Elvish Yadav Controversy)
श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारात फोटो काढल्याचा त्याच्यावर आरोप करुन युट्यूबर एल्विश यादव याच्या विरोधात वाराणसीच्या उपायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.वाराणसी सत्र न्यायालयाचे वकील प्रतीक कुमार सिंह यांनी पत्राद्वारे यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, सोशल मीडिया आणि इतर माहिती प्रसारणाच्या माध्यमातून एल्विश यादव यांनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिरात फोटो काढल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासन वाराणसीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काशी विश्वनाथ मंदिर परिसरात मोबाईल फोन आणि कॅमेऱ्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सातत्याने कॅमेऱ्यांच्या वापरामुळे नियमित भाविकांच्या भावना दुखावल्या जात असून मंदिराच्या सुरक्षेला तडा जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी विनंती ही या पत्रात करण्यात आली आहे.
पोलिस सहआयुक्त के. एगिलरसन यांनी या संपूर्ण प्रकारणावर सांगितले की, एल्विश यादव यांच्याविरोधात काही लोकांनी तक्रार केली आहे. या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले असून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.(Kashi Vishwanath Temple Elvish Yadav Controversy)
==============================
हे देखील वाचा: Singham Again Exclusive: अजय देवगणच्या चित्रपटाचा क्लायमॅक्स रिलीज होण्याआधीच लीक?
==============================
एल्विश यादव सध्या उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये असून सहकाऱ्यांसमवेत येथील मंदिरांना भेट देत आहे. याच अनुषंगाने त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. मंदिराचे पुजारी श्रीकांत यांनी याचवेळी विधी ही केले. आणि त्यानंतर त्यानंतर एल्विशने देवाची प्रार्थना करून आशीर्वाद घेतला.