Indeevar : संगीतकार आनंदजी यांनी इंदीवर यांना सुचवले होते हुक

Emraan Hashmi : चित्रपट नव्हे तर सुपरहिट गाणी देणारा अभिनेता!
बॉलिवूडचा ‘सिरीयल किसर’ अशी ओळख निर्माण करणारा इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याचा आज (२४ मार्च) वाढदिवस. २००३ मध्ये ‘फुटपाथ’ या चित्रपटापासून इम्रानने अभिनयाची कारकिर्द सुरु केली. आजवर त्याने बरेच चित्रपट केले पण ते कर्मशिअली चालले नाहीत हे जितकं सत्य असलं तितकंच हे देखील सत्य आहे की त्याच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी आजही प्रत्येकाच्या तोंडावर पाठ आहेत. ट्रॅव्हल करताना, ब्रेकअप झालं असेल किंवा गर्लफ्रेंडला मनवायचं असेल तर प्लेलिस्टवर इम्रान हाश्मी सॉंग्स असं टाकलं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतातच. इम्रान हाश्मीने एकही गाणं त्याने फ्लॉप दिलं नाही आहे बाकी खरं. पण तुम्हाला माहित आहे का इम्रान हाश्मी हा इंडस्ट्रीमधील असूनही त्याला फारसा त्याचा फायदा झाला नाही. भट्ट कुटुंबाशी खास नातं असूनही त्याचा स्ट्रगल फार मोठा आहे. जाणून घेऊयात इम्रानबद्दल…(Bollywood news)
अभिनेता होण्यापूर्वी इम्रान हाश्मीने (Emraan Hashmi) महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या ‘कसूर’ आणि नंतर ‘राज’ (Raaz) या चित्रपटांसाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. इम्रानचं शिक्षण मुंबईतच झालं आहे. मात्र, शिक्षणापेक्षा इम्रानला मित्रांमध्ये रमण्यात अधिक रस होता. अनेक मुलाखतींमध्ये त्याने स्वत: सांगितलं आहे की, कॉलेजमध्ये असताना तो वर्गात कमी आणि कट्ट्यावर मित्रांसोबत टाईमपास अधिक करायचा. आणि त्याच्या याच टवाळखोरपणामुळे महेश भट्ट यांनी त्याला दम देखील दिला होता. आता महेश भट्ट आणि इम्रानचं नातं काय आहे ते पुढे जाणून घेऊयात…(Entertainment news)

एका मुलाखतीत बोलताना महेश भट्ट यांनी ज्यावेळी पहिला चित्रपट इम्रानला अभिनेता म्हणून ऑफर केला होता त्यावेळी त्याच्या भावना काय होत्या या व्यक्त केल्या होत्या. तो म्हणाला होता की, “ ‘राज’ चित्रपटासाठी मी महेश भट्ट यांना असिस्ट करत होतो. आणि त्यावेळी अचानक महेश भट्ट माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुझ्यात मला एक अभिनेता दिसत आहे. मी म्हणालो मला माझ्यात अभिनेता दिसत नाहीये तुम्हाला काय दिसतंय? महेश भट्ट यांनी मला चित्रपटाची दिलेली ऑफर मी ४-५ वेळा रिजेक्ट केली होती. पण नंतर काही मित्रांसोबत चर्चा केल्यानंतर असा विचार आला की तसेही करिअरच्या बाबतीत काही घडत नाहीये तर अॅक्टिंग करुन बघतो. आणि ‘राज’च्या सेटवर जाऊन महेश भट्ट यांना घाबरत म्हटलं होतं की मी तुमची ऑफर स्विकारतो, तुम्ही सांगा तसं मी करेन”.

२००३ मध्ये इम्रान हाश्मीचा पहिला चित्रपट ‘फुटपाथ’ जरी आला असला तरी त्याचा पहिला चित्रपट ‘ये है जिंदगी का सफर’ हा होता. या चित्रपटात आधी गोविंदा असणार होते पण तारख्यांच्या गोंधळामुळे गोविंदांची चित्रपटातून एक्झिट झाली. आणि या चित्रपटाचं शुट जे ६ महिन्यानंतर सुरु होणार होतं ते आधीच झालं आणि ‘फुटपाथ’ पुर्वी या चित्रपटासाठी पहिल्यांदा इम्रानने कॅमेरा फेस केला.
===========
हे देखील वाचा : Sonali Kulkarni : “मी सतत त्यांच्याकडे पैसे…”, सोनालीच्या बालपणीचा संघर्ष
===========
इम्रान हाश्मी आणि महेश भट्ट यांचं एक विशेष नातं आहे. महेश आणि मुकेश भट्ट यांची आई शिरीन बानू या इम्रान हाश्मीची आई मेहेरबानोची बहिण. त्यामुळे नात्याने महेश भट्ट इम्रानचे मामा लागतात आणि त्यामुळे आलिया भट्ट (Alina Bhatt) ही इम्रानची बहिण आहे. आता बॉलिवूडमधल्या एका प्रतिष्ठित कुटुंबाशी घरचे संबंध असूनही इम्रानला मात्र इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल काही सुटला नाही. सहाय्यक दिग्दर्शकांपासून सुरु झालेला इम्रानला प्रवास टायगर ३ पर्यंत येऊन ठेपला. (Bollywood gossip)

इम्रान हाश्मी याने खरंच फार सुपरहिट चित्रपट दिले नाही पण आजही ‘जन्नत’ (Jannat) चित्रपटातील “जरासी दिल में दे जगा तु” या गाण्यात त्याने आफल्या प्रेयसीला जसं प्रपोज केलं होतं ते प्रपोजल आजही आयडिअल प्रपोजल म्हणून कपल्समध्ये प्रसिद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इम्रानला ‘मर्डर’ (Murder), ‘आशिक बनाया आपने’, ‘झेहेर’ अशा अनेक चित्रपटामुळे ‘सिरीयल किसर’ ही ओळख मिळाली. पण ज्यावेळी त्याच्या मुलाला कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्यानंतर त्याने ऑन स्क्रिन किसींग सिन्सला नकार देण्यास सुरुवात केली होती. (Entertainment)
खरं तर, ऑन स्क्रिन रोमॅंटिक असणारा इम्रान त्याच्या वैयक्तिक जीवनात फारच सालस, शांत आहे. शाळेत त्याची एक प्रेयसी होती आणि तिच्यासोबत त्याने लग्नबाठ बांधून त्याच्या ऑन स्क्रिन इमेजला भेद दिला आहे. इम्रानच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ‘अक्सर’, ‘गॅंगस्टर’, ‘’गुड बॉय बॅड बॉय’, बादशाहो’, ‘सेल्फी’, ‘ए वतन मेरे वत’न अशा अनेक चित्रपटात त्याने विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण चित्रपट हिट न देता केवळ गाण्यांतून आपली पॉप्युलॅरिटी जपणारा हा अभिनेता प्रेक्षकांच्या टॉप लिस्टमध्ये आहे यात शंका नाही. (Bollywood masala)
रसिका शिंदे-पॉल