Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

पन्नासच्या दशकातील पार्श्वगायिका Asha Bholse यांचा संघर्ष!

राजू, रँचो अन् फरहान हे त्रिकूट पुन्हा एकत्र येणार?; 3

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत दिसणार Tamannaah Bhatia

“आयुष्यात त्यांना कोणीही कमकुवत झालेलं किंवा…”; Hema Malini यांनी चाहत्यांना

Dhurandhar चं ‘हे’ गाणं धुमाकूळ घालतयं… पण ते आहे कोणाचं

Bigg Boss 19 मध्ये सर्वांची मनं जिंकणाऱ्या Pranit More ने

अभिनेत्री Ashwini Mahangde ने दिला ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’च्या अध्यक्ष पदाचा

Gotya Gangster Teaser:  दिग्दर्शक राजेश पिंजानी यांचा अखेरच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित;  प्रथमेश

“तुमच्या मिठीत मला कायम सुरक्षित वाटायचं”; Esha Deol हिची धर्मेंद्रंसाठी

R.D.Burman : ‘मेरी भीगी भीगी सी पलको पे रह गई…’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

इम्रान हाश्मी-यामी गौतम यांच्या Haq चित्रपटाची कथा ‘या’ ऐतिहासिक न्यायालयीन निकालावर आहे आधारित!

 इम्रान हाश्मी-यामी गौतम यांच्या Haq चित्रपटाची कथा ‘या’ ऐतिहासिक न्यायालयीन निकालावर आहे आधारित!
मिक्स मसाला

इम्रान हाश्मी-यामी गौतम यांच्या Haq चित्रपटाची कथा ‘या’ ऐतिहासिक न्यायालयीन निकालावर आहे आधारित!

by रसिका शिंदे-पॉल 28/10/2025

मोजक्या पण ठसठशीत भूमिका साकारणारी अभिनेत्री अशी यामी गौतम (Yami Gautam) हिची इंडस्ट्रीत ओळख निर्माण झाली आहे… ‘विकी डोनर’ या चित्रपटापासून सुरु झालेला तिचा प्रवास आता ‘हक’ (Haq) या चित्रपटापर्यंत येऊन ठेपला आहे… हक या चित्रपटाची कथा साधीसुधी नसून १९८५ सालच्या ऐतिहासिक निर्णयावर चित्रपटाचं कथानक आधारित आहे आणि ते म्हणजे शाह बानो केस (Shah Bano Case)… ४० वर्षांपूर्वी शाह बानो केसने देशाच्या कायदा, राजकारण आणि समाजव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला होता…. काय आहे हक चित्रपटात दाखवली जाणारी भारतीय न्यायव्यवस्थेतील महत्वाची केस जाणून घेऊयात… (Bollywood News)

बानो तो बहाना है, हम पर हमला पुराना है। कोण होत्या शाह बानो?.

तर, शाह बानो या मध्यप्रदेशातील ६२ वर्षीय मुस्लिम महिला होत्या. त्यांचे पती मोहम्मद अहमद खान, जे स्वतः एक वकील होते, त्यांनी ४३ वर्षांचं वैवाहिक आयुष्य आणि पाच मुलांनंतर बानो यांना १९७२ मध्ये घटस्फोट दिला… घटस्फोटानंतर शाह बानो यांना पतीने कुठलाही खर्च देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याकडे जगण्याचा कोणता आधार शिल्लक नव्हता… यामुळेच न्यायालयाचे दरवाजे ठोठावत शाह बानो यांनी CRPC कलम १२५ अंतर्गत पोटगीची मागणी केली. (Shah Bano Case News)

शाह बानो यांनी ज्या कलमांतर्गत पोटगीची मागणी केली होती तो सर्व नागरिकांसाठी लागू होतो, मग त्या व्यक्तीचा धर्म कोणताही असो. तर, मुस्लिम पर्सनल लॉनुसार (‘इद्दत’) तलाकानंतर तीन महिने इतक्याच काळासाठी पतीकडून पत्नीला खर्च दिला जाऊ शकतो… कनिष्ठ न्यायालयातून पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायानयापर्यंत पोहोचलं आणि तो धर्मनिरपेक्ष कायदा विरुद्ध धार्मिक कायदे असा मोठा प्रश्न बनला.

पुढे २३ एप्रिल १९८५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अखेर शाह बानो यांच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की, कलम १२५ हे सर्वांसाठी लागू आहे आणि पतीने घटस्फोटानंतरही पत्नीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेतली पाहिजे. या निर्णयात न्यायालयाने समान नागरी संहितेची गरज असल्याचंही अधोरेखित केलं होतं.. सर्वोच्च न्यायालयाचा शाह बानो केसमधील हा निकाल महिलांच्या हक्कांसाठी महत्वाचा आणि मोठा टप्पा ठरला होता…

मात्र, मुस्लिम संघटनांनी या निकालाचा तीव्र निषेध करत सरकारवर दबाव टाकला… मुस्लिम समाजाचा रोष अधिक वाढल्यामुळे १९८६ मध्ये मुस्लिम महिला (तलाकावर अधिकारांचे संरक्षण) अधिनियम कायदा पारित करण्यात आला. परिणामी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्यात आला आणि मुस्लिम महिलांना केवळ इद्दत कालावधीपुरताच म्हणजे तलाकनंतर ३ महिनेच भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली… शाह बानो प्रकरण हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक ऐतिहासिक टप्पा मानले जाते.

================================

हे देखील वाचा : दिग्दर्शक एस.एस.राजामौलींच्या Bahubali Franchiseच्या अद्भूत गोष्टी!

================================

दरम्यान, नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचवेळी अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याने फार महत्वाचं विधान केलं होतं.. तो म्हणाला होता की, “हा चित्रपट प्रत्येक मुस्लिम बांधवाने पाहायला हवा”…. सुपर्ण वर्मा दिग्दर्शित ‘हक’ या चित्रपटात शाह बानो यांची भूमिका यामी गौतम साकारणार असून तिच्यासोबत इम्रान हाश्मी, शिबा चड्डा, वर्तिका सिंग, दानिश हुसैन यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत… हक हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरात रिलीज होणार आहे… (Haq movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Emraan Hashmi Entertainment Entertainment News shah bano case
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.