Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनयाचा वटवृक्ष!

 अभिनयाचा वटवृक्ष!
कलाकृती तडका बात पुरानी बडी सुहानी

अभिनयाचा वटवृक्ष!

by धनंजय कुलकर्णी 12/10/2020

आपल्या अभिनय प्रवासात तब्बल साठ वर्षे कायम रसिकाभिमुख राहिलेला कलावंत म्हणजे अशोककुमार! बॉम्बे टॉकीजच्या १९३६ साली आलेल्या ’जीवन नैय्या’ पासून सुरू झालेली त्यांची अभिनयाची यात्रा १९९७ साली आलेल्या ’ऑंखो में तुम हो’ पर्यंत चालू होती. साठ वर्षाची प्रदीर्घ खेळी खेळताना या नटसम्राटाने रसिकांना आपल्या अभिनयाच्या मोहीनी अस्त्रात गुंगवून ठेवले. एवढे नाव कमावलेला, किर्ती/ऐश्वर्याची शिखरे केंव्हाच पादाक्रांत केलेला, मायावी दुनियेतील अनेकानेक स्थित्यंतरे पचविलेला हा कलाप्रेमी कचकड्याच्या भपकेबाज, कृत्रिम, बेगडी वातावरणापासून अलिप्त राहूनही रसिकांच्या मनात घर करून राहिला. अनुभव समृध्द व श्रेष्ठ श्रेणीचा मनस्वी कलाकार रसिकांनी त्यांना आदराने नाव दिले  दादामुनी!

आज १३ ऑक्टोबर. आजच्याच दिवशी १९११ साली त्यांचा जन्म झाला. त्यांच खरं नाव कुमुदलाल गांगुली. घरात सर्वच वकील. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर वकीली पेशा स्विकारण्याचा दबाव होता. पण त्यांची नजर मुंबईकडे होती. त्यांचे मेहुणे शशीधर मुखर्जी त्यावेळी बॉम्बे टॉकीज मध्ये होते. घरचा विरोध पत्करून ते मायानगरीत दाखल झाले. बॉम्बे टॉकीजच्या लॅबोतेटरीत ते टेक्नीशियन म्हणून रूजू झाले. त्यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. त्यांच्या रूपेरी पडद्यावरील प्रवेशाचा किस्सा मशहूर आहे. बॉम्बे टॉकीजचे त्या कालचे सर्वेसर्वा होते हिमांशू रॉय आणि त्यांची पत्नी देविकारानी. देविका सिनेमाची नायिका असायची. तिचा नायक होता नजमल हुसेन. १९३६ साली त्यांचा ’जीवन नैय्या’ हा सिनेमा फ्लोअर वर होता. हा नजमल हुसेन आपली पत्नी देविकावर जरा जास्तच फिदा आहे हा संशय हिमांशू रॉय यांच्या मनात होताच. या सिनेमाच्या वेळी हा नजमल आजारी पडला. रॉय यांना निमित्तच मिळाले.त्यांनी ताबडतोब त्याची सुट्टी केली. मग आता नायकाची भूमिका करणार कोण? रॉय यांनी एकदा अशोककुमारला लॅब मध्ये गुणगुणताना बघितले होते. लगेच त्यांनी त्याला बोलावले व त्याच्या नव्या अवताराची कल्पना दिली. अशोकची बोबडीच वळाली.

’जीवन नैय्या’ चित्रपटातील दृश्य

सिनेमा करायचा तो देखील नायकाच्या रूपात आणि समोर नायिका कोण तर मालकीण दिविका रानी! काहिशा नाराजीने घाबरत, घाबरतच तो सिनेमा पूर्ण केला. त्याचे अशोककुमार हे रूपेरी बारसे देविकानेच केले. या सिनेमातील गाणी अशोकनीच गायली. हळूहळू अशोक तिथे रूळला व त्याची अभिनयाचे जीवन नैया मार्गी लागली. त्याच्या या अभिनयाच्या प्रवासाचे पाच भागात विभाजन करता येईल. ’जीवन नैया’ ते ’बंधन’ पर्यंतचा लाजरा बुजरा गाणारा अशोककुमार, चाळीसच्या दशकातील ’नया संसार’,’किस्मत’ पासून ’हावडा ब्रिज’,’डार्ख स्ट्रीट पर्यंतचा ड‘शींग हिरो,साठच्या दशकातील ’आरती’, ’गुमराह’पासून ज्वेल थीफ पर्यंतचा मधील मध्यवर्ती थाटाच्या चरीत्र भूमिका, आणि पुढे ऋशिदांच्या ’आशिर्वाद’,’गुड्डी’ पासून सदासतेज दादाजी! १९८५ सालच्या ’हमलोग’या दूरदर्शन मालिकेपासून सुरू झालेला प्रवास पुढे ’बहादूर शहा जफर’पर्यंत गेला. अभिनयाच्या या वटवृक्षाचे १० डिसेंबर २००१ साली निधन झाले.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood bollywood movie Bollywood Topics Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.