Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Munnabhai MBBS मधला ‘तो’ सीन ‘3 Idiots’ मध्ये कसा आला?

Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar;

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं

Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

फक्त दोन हजार रुपयाचे तिकीटही हाऊसफुल्ल

 फक्त दोन हजार रुपयाचे तिकीटही हाऊसफुल्ल
कलाकृती विशेष

फक्त दोन हजार रुपयाचे तिकीटही हाऊसफुल्ल

by दिलीप ठाकूर 03/12/2024

मी आयुष्यात पहिला चित्रपट पाहिला त्याचे तिकीट दर किती होते माहितीये?
पासष्ट पैसे. एक पैसा, दोन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, पावली अर्थात चार आणे वापरात असल्याचा तो काळ. खिशात चिल्लर वाजतेय हे एकदम भारी वाटे. तिकीटाची ही किंमत सांगताना त्यामागे मी फक्त असे म्हणालो नाही. यामागेही एक कारण आहे.
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात पहिला चित्रपट आपल्या कुटुंबासोबत पाहतो. फरक इतकाच की अनेक पिढ्यांतील लहान मुले सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जात होती आता “घरोघरी दूरचित्रवाणी संच” असल्याने आजची मुले घरबसल्या चित्रपट पाहत पाहत मोठी होतात. (काही मुलांना जेवताना टी. व्ही. पाह्यचा असतोच) (Pushpa 2)

गिरगावातील आमच्या खोताची वाडीच्या समोर मॅजेस्टिक थिएटर होते. (त्या वास्तूला चित्रपट इतिहासात ऐतिहासिक मूल्य होते). मी लहान असताना कुटुंबासोबत तेथे १९६७ साली ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते‘ हा चित्रपट पाहिला.. त्या वयात तिकीट दराची कल्पना असणे शक्य व आवश्यकही नव्हते. कळत्या वयात घरातल्या गप्पांत एकदा मॅजेस्टिक थिएटरला स्टाॅलचे तिकीट पासष्ट पैसे होते (महिला प्रेक्षकांसाठी वेगळी रांग असे) याची माहिती मिळाली. इतकेच नव्हे तर सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात मध्यमवर्गीय कुटुंबात मासिक सहाशे सातशे रुपये पगार पुरेसा ठरे (घरातील वयोवृद्ध याबाबत छान आठवणीत जात माहिती देतील.)

आपल्या देशात अनेक वर्ष तरी चित्रपट हे मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा कष्टाळू, मेहनती, स्वप्नाळू, आशावादी वर्गाचे हुकमी मनोरंजन होते. त्यांना कधीच “चित्रपट कसा पहावा” हे सांगावे लागले नाही. पिक्चर आवडला, डोक्यावर ( व डोक्यातही) घेतला आणि समजा आवडला नाही पडद्यावर ठेवला (रिळे गोडाऊनमध्ये गेली देखिल). (Pushpa 2)

हे आजच का आठवले?
सुकुमार दिग्दर्शित “Pushpa 2” (Pushpa 2) चे तिकीट दर काही मल्टीप्लेक्समध्ये दोन हजार रुपये असूनही बुक माय शोवर हाऊसफुल्ल. आणि याची मिडियात बातमीही झाली. नवी दिल्लीतील एका मल्टीप्लेक्समध्ये तर २४०० रुपये तिकीट दर आहे. मूळ तेलगू भाषेतील हा चित्रपट कन्नड, तमिळ, मल्याळम व हिंदी भाषेत आहे. आपल्या देशात याचे दिवसाला १६००६ इतके खेळ आहेत. विदेशातही हा चित्रपट पहिल्या दिवशी धूम मचवणार हे आकडेवारीत दिसतेय. अल्लू अर्जुन, रक्ष्मिका मंदाना, फहद फासिल असे ग्लोबल स्टार आहेत हो. जे प्रेक्षकांना महागडे तिकीट काढून मल्टीप्लेक्सकडे आकर्षित करु शकतात ते स्टार. मिडियात स्टार असणे आणि रसिकांत स्टार असणे या वेगळ्या गोष्टी बरं का? … पैसा बोलता है! चित्रपट निर्मिती अवाढव्य महागडी झाल्याने आणि मल्टीप्लेक्स हायफाय सोसायटीसाठी प्रामुख्याने असल्यानेच असे चढते दर परवडणारे वाटतात.

या तिकीट दरावरुन मला सत्तरच्या दशकात दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये स्टाॅलचे तिकीट दर एक रुपया पासष्ट पैसे असे होते हे त्या रंगीत तिकीटासह आठवले. मॅटीनी शोला तर स्टाॅलचे तिकीट दर एक रुपया पाच पैसे असे होते हे देखील आठवले आणि दिवसा तीन खेळ याप्रमाणे सुरु असलेला चित्रपट पंधरा अथवा पंचवीस आठवड्यानंतर मॅटीनी शोला कधी शिफ्ट होतोय याची मी वाट पाह्यचो. माझ्या सगळ्या सवयी अनुभवातून होत्या आजही आहेत.

तेव्हा ताडदेवच्या डायना थिएटरमध्ये प्रत्येक शुक्रवारी जुने चित्रपट प्रदर्शित होत आणि माझ्यासारख्याला ती जणू पर्वणीच होती. राहिलेल्या पिक्चर्सचा बॅकलाॅग भरुन काढता आला. एक म्हणजे कधी वडीलांकडून अथवा माझ्या मागील पिढीकडून जुन्या चित्रपटाच्या आठवणी ऐकायला मिळत अथवा तेव्हा दैनिक अथवा साप्ताहिकात जुन्या चित्रपटावर वाचायला मिळे. त्यामुळे ते चित्रपट कधी बरे पाहतोय असं व्हायचं आणि त्यासाठी धोबीतलावचे एडवर्ड, ताडदेवचे डायना, सात रस्ताचे न्यू रोशन अशी आवर्जून जुने चित्रपट रिलीज करणारी थिएटर आपलीशी वाटत. (Pushpa 2)

अधेमधेच कधी येथे नवीन चित्रपट प्रदर्शित होत. डायना थिएटरमध्ये स्टाॅलचे तिकीट पासष्ट पैसे असे होते. डायना थिएटरमध्ये अॅडव्हास बुकिंगची खिडकी नव्हती अर्थात त्या संस्कृतीची तेथे गरज नव्हती. त्यामुळे करंट बुकिंगसाठी लांबलचक रांगेत उभे राहून स्टाॅलचे तिकीट काढून ते मुठीत घट्ट पकडावे लागे. मग आत गेल्यावर जाळीचा दरवाजा कधी उघडतोय आणि त्या पहिल्या चार रांगातील मिळेल ती सीट पकडतोय असे व्हायचं. कारण सीट नंबर नसायचा. केवढे तरी थ्रील होते त्यात. मोठ्या प्रमाणावर लठ्ठालठ्ठी ठरलेली. बरं, डायनात अप्पर स्टाॅलचे तिकीट काढायचे तर आणखीन चाळीस पैसे हवेत. ते दोनदा वाचवले तर आणखीन एक चित्रपट पाह्यला मिळे असा सरळ हिशोब.

मला आठवतय, ‘शोले‘ प्रदर्शित होताना मिनर्व्हा थिएटरमध्ये अप्पर स्टाॅलचे तिकीट चार रुपये चाळीस पैसे तर बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे होते आणि ते महाग वाटत. पण प्रेक्षकांनी “शोले” बघता बघता असा काही सुपर हिट ठरला की, हे तिकीट दर परवडायला लागले. ब्लॅक मार्केटमध्ये चढ्या दरात तिकीट हा एक वेगळा विषय आहे. ती देखिल एक चित्रपट संस्कृती आहे. चित्रपट फक्त पडद्यावर नसतो, आजूबाजूच्या अनेक घटकांतही असतोच. (Pushpa 2)

हे तिकीट दराचे गणित हे त्या काळातील प्रामुख्याने मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय रसिकांना परवडणारे . त्या काळात आपल्या देशात चित्रपट रुजवला तो प्रामुख्याने श्रमजीवी, कष्टकरी, स्वप्नाळू, आशावादी अशा वर्गाने अथवा मासने. त्यांनी डोक्यावर घेतलेले चित्रपट पंचवीस अथवा पन्नास आठवडे मुक्काम करीत (याची उदाहरणे अनेक. त्यामुळे राजेन्द्र कुमार ज्युबिली कुमार झाला, राजेश खन्ना सुपर स्टार झाला) आणि त्यांना न आवडलेला चित्रपट काही मोजक्याच आठवड्यात गाशा गुंडाळे.

देवेंद्र गोयल दिग्दर्शित आणि धर्मेंद्र , शर्मिला टागोर, लीना चंदावरकर यांच्या भूमिका असलेल्या ‘एक महलो हो सपनो का‘ या चित्रपटाचे असेच झाले. देव आनंद आणि शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आत्माराम दिग्दर्शित ‘यह गुलिस्ता हमारा‘ या चित्रपटाचेही तेच झाले. फस्ट डे फर्स्ट शो पासूनच रसिकांनी या चित्रपटांना नाकारले.

त्या काळात मुंबई उपनगरात आणि ग्रामीण भागातील थिएटरमध्ये आणखीन कमी कमी असे तिकीट दर होते. ग्रामीण भागात अगदी पन्नास पैसे असेही होते. एव्हाना तुम्हा वाचकांनाही आपण एकेकाळी किती रुपये तिकीटात चित्रपट पाहिले हे आठवले असेलच.

ऐशीच्या दशकात हळूहळू हे तिकीट दर वाढू लागले. सगळ्याच बाबतीत महागाई होत असताना चित्रपटाच्या तिकीटाचाही दर वाढणार. याच काळात देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ कॅसेट यांचे आगमन झाले आणि एका दिवसाचे दहा रुपये भाडे याप्रमाणे लायब्ररीतून नवीन चित्रपटाची व्हिडिओ कॅसेट उपलब्ध होऊ लागली आणि स्वस्तात चित्रपट पाहण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला. तेव्हा कळत नकळतपणे मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय चित्रपटगृहापासून दूर जाण्याची प्रक्रिया हळूहळू सुरु झाली. पण चित्रपटसृष्टीकडून ती दुर्लक्षित राहिली. अशातच सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर‘ (१९९१) साठी मेट्रो थिएटरमध्ये बाल्कनी तिकीट दर पंचवीस रुपये अशी एका मराठी वृत्तपत्रात पहिल्या पानावर बातमी आली. (Pushpa 2)

त्यात ‘चित्रपट महाग होत चालला आहे’ असाच सूर होता आणि मग यात महत्वाचे पाऊल पडले ते राजश्री प्राॅडक्सन्सच्या “हम आपके है कौन” (१९९४) साठी लिबर्टी थिएटरमध्ये सोमवार ते शुक्रवार बाल्कनीचे पंचाहत्तर रुपये असलेले तिकीट शनिवार व रविवारी शंभर रुपये असे आणि ती एका सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराची ती सुरुवात होती. एक म्हणजे व्यावसायिक स्ट्रॅटेजी म्हणून राजश्री प्राॅडक्सन्सच्या वितरण विभागाने देशातील सर्वच मोठ्या शहरात एकाच थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला. ते करताना थिएटर डेकोरेशनला कमालीचे महत्व दिले. आकर्षक ग्लॅमरस रोषणाई केली.

त्याच वेळी देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण यांचे वारे रुजत होते. एकमेकांना पूरक गोष्टी घडल्या. शहरात नवश्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गात वाढ होत गेली आणि त्यांना ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे‘ (१९९५), ‘दिल तो पागल है‘ (१९९७), ‘कुछ कुछ होता है‘ ( १९९८) असे चकाचक चित्रपटाचे आकर्षण वाढू लागले. असे चित्रपट खास दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होऊ लागले. दिवाळीच्या आनंदात जणू भरच पडली. आता जगभरातील अनेक देशात हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ लागला. त्याचा व्यावसायिक विस्तार झाला. त्याचे अर्थकारण अतिशय महत्वाचे ठरु लागले आणि या सगळ्याचे पुढचे पाऊल नवीन शतकाच्या सुरुवातीला पडले. ते होते, मल्टीप्लेक्स! एकाच काॅम्प्लेक्समध्ये चार पाच छोटी पाॅश थिएटर. ऐषआरामात, वातानुकूलित स्थितीत आणि प्रशस्त खुर्चीत बसून चित्रपट बघा. सगळा कसा कार्पोरेट लूक. (Pushpa 2)

पारंपरिक मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय आता आपल्या जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे यातच राहिला. यात ज्याच्या पुढील पिढीत आर्थिक प्रगती झाली तो मल्टीप्लेक्समध्ये जाऊ लागला. यात मल्टीप्लेक्सची संख्या वाढत गेली आणि जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची संख्या कमी कमी होत गेली.

आता तुम्हीच सांगा, महिना वीस बावीस हजार रुपये पगार असणारा वर्ग अशा मल्टीप्लेक्समध्ये जाऊ शकतो का? आणि महिन्याला सत्तर ऐशी हजार रुपये पगार असणारा वर्ग ‘रुपेरी पडद्यावर गरीब नायकाची गोष्ट’ पाहू शकतो का? मोठ्या शहरातील उच्चभ्रू वर्गात महिन्यात तीन अथवा चार पगार मिळून (आई बाबा आणि दोन मुले मिळून चार पगार) जवळपास दोन लाख रुपये येत असतील तर ते ‘डोक्याला शाॅट नको’ असा विचार करत बाहुबली, पुष्पा, आर आर आर, देवरा अशा चमकदार चित्रपटांना जास्त पसंती देणार.

महागड्या तिकीटापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट पाहिलेला उत्तम असा पर्याय उपलब्ध आहे. दीड दोन हजाराचे एक तिकीट काढण्यापेक्षा ओटीटी परवडतो. घरबसल्या आणि आपल्या वेळेनुसार चित्रपट पाह्यचा. कंटाळा वाटल्यास फाॅरवर्ड करावा. (Pushpa 2)

महागडे तिकीट परवडणारा “हाय क्लास” आहे ( माॅलमधील गर्दी त्यासाठी बॅरोमीटर आहे आणि काही चित्रपटांचे उत्पन्नाचे अवाढव्य आकडे त्याला सपोर्ट सिस्टीम आहेत) आजचा चित्रपट हा कष्टकरी, स्वप्नाळू वर्गाला आपलासा वाटत नाही. तो हातातल्या मोबाईलवरील यू ट्यूबवरचे बहुरंगी मनोरंजन आपले मानतोय. ते कधीही, कुठेही, कितीही पाहता येतेय.

============

हे देखील वाचा : विनोदवीर जेव्हा डोळ्यात अश्रू आणतो….

============

पन्नास वर्षांपूर्वी ‘थिएटरमध्ये सिनेमा पाह्यला जायचे’ म्हणजे जणू एक कौटुंबिक सहल. मग मध्यंतरमध्ये त्या चित्रपटावर गप्पा मारत उत्तरार्धात काय घडेल याची उत्सुकता आणि मग त्या चित्रपटावर घरात, मजल्यावर, मित्रांत, चाळीत केवढ्या गप्पा काही विचारु नका आणि हे सगळे त्या रुपया, दीड रुपयाच्या तिकीटापासून सुरु होत असे. (Pushpa 2)

आपला चित्रपट आता ‘गरीबांचे थिएटरमधले मनोरंजन’ राहिलेला नाही. त्यामुळे आता टॅक्सी ड्रायव्हर, तांगेवाला, कुली, रिक्षावाला, टॅक्सी टॅक्सी या नावाचे चित्रपट निर्माण होणे अवघड तसेच चित्रपटाचा नायकही असा असल्याचे दिसणेही मुश्किल…. ब्रेड बटरसह सगळ्याच गोष्टी महाग झाल्यात म्हटल्यावर मुव्हीजचे तिकीटही दोन हजार झाले यात आश्चर्य ते कसले? यापेक्षाही कमी दराची (पाचशेपासून पुढे) तिकीटे असली तरी ती मध्यमवर्गीयांसाठी महागच…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Allu Arjun Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured pushpa 2 Rashmika Mandanna
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.