Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Sushmita Sen to Raveena Tondon : ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी दत्तक घेतल्या आहेत मुली
मुलं असूनही मुल दत्तक घेणं याकडे लोकं वेगवेगळ्या दृष्टीकोनाने पाहतात… काही वर्षांपूर्वी फिल्मी इंडस्ट्रीत मुलं दत्तक घेणं जरा अडचणीचं समजलं जायचं… पण तरीही इंडस्ट्रीतील नावाजलेल्या कलाकारांनी मुलं स्पेसिफकली मुली दक्क घेतल्या आहेत… यात असे देखील कलाकार आहेत ज्यांना स्वत:ची मुलं असूनही त्यांनी या मुलींना एक नवं आयुष्य दिलं आहे… कोण आहेत हे कलाकार जाणून घेऊयात…

अभिनेत्री सुश्मिता सेन हिने लग्न न करता २ मुलींना दत्तक घेतलं आहे… तिने पहिली मुलगी २००० मध्ये दत्तक घेतली होती तिचं नाव आहे रिनी आणि त्यानंतर तिच्यासोबत खेळायला भावंडं हवं म्हणून तिने दुसरी देखील मुलगी २०१० मध्ये दत्तक घेतली तिचं नाव आहे अलिसा… यानंतरची अभिनेत्री आहे मनिषा कोईराला… कर्करोगावर मात केल्यानंतर तिने मुलीला दत्तक घेतलं…

पुढची अभिनेत्री आहे रविना टंडन… रविनाने तर वयाच्या २१ व्या वर्षी पूजा आणि छाया यांना दत्तक घेतलं होतं… तर प्रिती झिंटा हिने ऋषिकेशच्या एका शाळेतील ३४ मुलींना दत्तक घेत त्यांच्या शिक्षणाची आणि संपूर्ण जीवनाची जबाबदारी घेतली आहे…. या पुढचे अभिनेते आहेत मिथुन दादा… मिथुन चक्रवर्ती यांनी तीन मुलं असतानाही मुलगी दत्तक घेतली. रस्त्यावर कचरा वेचत असताना मिथुनदांचे या मुलीकडे लक्ष गेले आणि त्यांनी ही मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता… तर, दिग्दर्शक सुभाष घई आणि त्यांची पत्नी रेहाना यांनी काही वर्षांपूर्वी मुलगी दत्तक घेतली होती जिचं नाव आहे मेघना. ती त्यांची पुतणी असूनहगी त्यांनी तिला दत्तक घेतलं आहे…
================================
हे देखील वाचा : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ – डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा चित्रपट; पण तरीही…
================================
एकीकडे या ग्लॅमरस दुनियेतील कलाकारांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल वेगवेगळे पैलु समोर येत असतात… म्बणजे कुणाचं कुणाशी अफेअर आहे किंवा कुणाचा घटस्फोट झाला आहे.. पण त्यांची ही वेगळी बाजू सहसा मांडली जात नाही…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi