Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kantara : A Legend Chapter 1 चित्रपटाने बॉलिवूडलाही टाकलं मागे!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Farah Khan बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खानचा संघर्षमयी प्रवास

 Farah Khan बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खानचा संघर्षमयी प्रवास
कलाकृती विशेष

Farah Khan बॉलिवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खानचा संघर्षमयी प्रवास

by Jyotsna Kulkarni 09/01/2025

पूर्वी म्हणजे अगदी ४०, ५०, ६० च्या दशकांमध्ये चित्रपटात गाणे चित्रित करताना दिग्दर्शक कलाकारांनाच ‘तुम्हाला जसे येते तसे नाचा’ असे सांगायचे. हे कितपत खरे आहे माहित नाही. ही फक्त एक ऐकलेली बाब आहे. मात्र कदाचित असे असू देखील शकते. कारण त्याकाळी सिनेमा एवढा विकसित नव्हता. प्रत्येक गोष्टीसाठी दिग्दर्शक किंवा एक मुख्य व्यक्ती असते अशी संकल्पना त्या काळी नव्हती. (Old Hindi Movie)

मात्र कल बदलला तसे सिनेमांचे रुपडे देखील बदलू लागले. चित्रपटाच्या प्रत्येक कामासाठी काही विशिष्ट व्यक्तीच काम पाहू लागल्या. दिग्दर्शक, गायक, संगीतकार यांच्यासोबतच, छायाचित्रकार, सहायक दिग्दर्शक यांच्यासोबतच नृत्यदिग्दर्शक ही संकल्पना हिंदी चित्रपटांमध्ये रुजायला लागली. यामुळे अनेक चांगल्या कलाकारांना चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्रींना डान्स शिकवायची संधी मिळू लागली. आणि यातूनच नृत्यदिग्दर्शक ही नवीन संकल्पना रूढ झाली. (Choreographer)

आज बॉलिवूडमध्ये अनेक नृत्यदिग्दर्शक अर्थात कोरिओग्राफर आहेत. मात्र या सर्वांमध्ये एक नाव सर्वात वर आणि प्रसिद्ध आहे, ते म्हणजे फराह खान. एक उत्तम कोरिओग्राफर असण्यासोबतच ती एक उत्तम दिग्दर्शिका देखील आहे. मागील अनेक दशकांपासून फराह या क्षेत्रात कार्यरत आहे, बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका असणारी फराह खान आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. (Farah Khan)

Farah Khan

बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपल्या तालावर नाचवणाऱ्या फराह खानचा आज ६० वा वाढदिवस आहे. फराह खानचा जन्म ९ जानेवारी १९६५ साली झाला आहे. तिने या क्षेत्रात अनेक मोठ्या आणि दिग्गज कलाकारांना कोरिओग्राफ केले आहे. मात्र तिचा हा डान्सचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. चित्रपटांची पार्श्वभूमी असूनही फराहला या क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. (Happy Birthday Farah Khan)

फराह खान या नावाला आज कोण ओळखत नाही. आपल्या प्रतिभेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर फराह खानने बॉलीवूडमध्ये मोठा नावलौकिक कमावला आहे. एक उत्तम कोरिओग्राफर, दिग्दर्शका आणि निर्माती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फराह खानने एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. (Ankahi Baatein)

फराह खानचा जन्म मुंबईतच झाला. तिने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच पूर्ण केले. फराह कॉलेजमध्ये असताना मायकल जॅक्सनचा ‘थ्रिलर‘ हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता. फराहने त्यावेळी मायकल जॅक्सनच्या डान्सने प्रभावित होऊन एक डान्स ग्रुप तयार केला होता. पुढे नृत्यकलेमध्येच आपले करिअर करण्याचे तिने ठरवले. मुख्य म्हणजे डान्स शिकण्यासाठी फराहने प्रशिक्षण घेतलेले नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने डान्सिंगवर प्रभुत्व मिळवलेले आहे. (Entertainment mix masala)

Farah Khan

फराह खानचे वडील कामरान खान (Kamran Khan) हे मुस्लिम होते तर तिची आई मेनका इराणी (Menka Irani) या पारशी होत्या. विशेष म्हणजे फराह खानच्या वडीलांनी स्टंटमॅन बनून करिअरची सुरुवात केलेली. मग हळूहळू निर्माते आणि दिग्दर्शक बनले होते. कम्रान खान हे बी- ग्रेड चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. (Mix Masala)

फराह लहान असताना त्यांनी ‘ऐसा भी होता है’ या ए-ग्रेड चित्रपटाची निर्मिती केली. मात्र दुर्दैवाने त्यांचा हा प्रयत्न त्यांचा सपशेल अपयशी ठरला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. यानंतरच फराह खानच्या कुटुंबाचे दिवस फिरले. फरहाच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर झाला आणि त्यांच्या संघर्षाचे दिवस सुरु झाले. (Farah Khan Struggle)

एका मुलाखतीमध्ये फराहने सांगितले होते की, तिचे वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत बालपण खूपच छान गेले, मात्र नंतर हळूहळू त्यांची परिस्थिती खराब होऊ लागली. ती १८ वर्षाची असताना तिच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यानंतर फराह तिचा भाऊ साजिद आणि त्यांची आई या तिघांवर कर्जाचा मोठा डोंगर आला. कर्ज फेडण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी तिघांनी वेगवेगळे मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. (Farah Khan Childhood)

Farah Khan

तेव्हा फराहने चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम सुरु केले. अशातच ती कधी कधी कलाकारांना देखील काही स्टेप्स शिकवू लागली. तिची शिकवण्याची आणि बोलण्याची पद्धत अनेकांना आवडली. अशातच एकदा ‘जो जिता वो ही सिकंदर’ या सिनेमांचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान (Saroj khan) यांनी अर्ध्यातच सोडून दिले. इथेच फराहच्या करियरला कलाटणी मिळाली. त्यानंतर फराहला ‘पहला नशा‘ (Pehla Nasha) गाण्याची कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली. (Farah Khan Work)

फराह खानने या संधीचे सोने केले. हे गाणे तुफान गाजले, आणि फराहला देखील ओळख मिळाली. त्यानंतर तिने हळूहळू आपला जम बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर शाहरुख खानच्या (Shahrukh khan) चित्रपटातील ‘कभी हा कभी ना’ ह्या गाण्याची कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली. याच सिनेमाच्या सेटवर तिची आणि शाहरुख खानची भेट झाली आणि त्याची मैत्री झाली. ही मैत्री आजतागायत कायम आहे. (Farah Khan and Shahrukh khan)

फराह खानने शाहरुख खानच्या जवळपास सर्वच चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली आहे. आज फराह खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिकांच्या गणतीत टॉपवर आहे. तिने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘विरासत’, ‘दिल तो पागल है’, ‘दिल से’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कहो ना प्यार है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘पुकार’, ‘मोहबत्ते’, ‘दिल चाहता है’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘कल हो ना हो’, ‘क्रिश’, ‘दबंग’, ‘दोस्ताना’ आदी अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

Farah Khan

फराह खानने आतापर्यंत २०० पेक्षा जास्त गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. तर तिने आतापर्यंत पाच वेळा उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड आणि राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला आहे. यासोबतच फराहने मैं हूं ना, ओम शांती ओम, तीस मार खान, हॅप्पी न्यू इयर या चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील केलेले आहे.

बॉलिवूडसोबतच फराह खान हे नाव टीव्ही इंडस्ट्रीमध्ये देखील खूपच प्रसिद्ध आहे. फराह खानने अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम केले आहे. यात इंडियन आयडॉलच्या सीझन १ आणि २ या सिंगिंग शोसोबतच जीता वही सुपरस्टार, एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा, डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर अशा अनेक डान्स शोमध्ये जजची भूमिका पार पाडली आहे. (Bollywood Masala)

=========

हे देखील वाचा : Sagarika Ghatge राजघराण्यात जन्म, राष्ट्रीय हॉकीपटू, क्रिकेटरशी लग्न असा आहे सागरिका घाटगेचा प्रवास

Actor Yash कन्नड मालिकांचा हिरो ते ग्लोबल स्टार; जाणून घ्या केजीएफ अभिनेता यशचा अभिनय प्रवास

=========

२००४ मध्ये फराहने तिच्याहून ९ वर्ष लहान एडिटर शिरीष कुंदरशी लग्न केले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. ‘मैं हूं ना’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News farah khan Featured Happy Birthday Farah Khan कोरिओग्राफर फराह खान नृत्यदिग्दर्शक फराह खान फराह खान फराह खान प्रवास फराह खान माहिती फराह खान वाढदिवस साऊथ हिंदी
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.