
Farida Jalal : “भन्साळींनी दारुचा ग्लास हातात घ्यायला सांगितला आणि…”
‘कभी खुशी कभी गम’, ‘क्या केहना’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘कहो ना प्यार है’, ‘कुछ कुछ होता है’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये छोटेखानी पण प्रेक्षकांना कायमस्वरूपी लक्षात राहतील अशा भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal0 यांनी साकारल्या. चित्रपटसृष्टीचे वेगवेगळेप्रयोग पाहिलेल्या फरीदा जलाल अलीकडेच संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) दिग्दर्शित ‘हीरामंडी’ (heeramandi) वेबसीरिजमध्ये दिसल्या होत्या. या वेब सीरीजची प्रचंड चर्चा झाली. अशातच ‘हीरामंडी’ मध्ये कुदसिया बेगमच्या भूमिकेत झळकलेल्या फरीदा जलाल यांनी जेव्हा दिग्दर्शक भन्साळींनी फरीदा यांना एका सीनसाठी दारुचा ग्लास आणि सिगारेट धरायला सांगितल्यावर त्यांना काय वाटलं, याविषयी त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. (Farida Jalal movies)
फरीदा जलाल गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, “वेबसीरिजमध्ये मला नवाबांच्या एका ग्रुपसोबत बसायचं होतं. माझा मुलगा परदेशातून पुन्हा भारतात येतो आणि एका शानदार पार्टीचं आयोजन केलं असतं. त्यावेळी माझ्या एका हातात दारुचा ग्लास आणि दुसऱ्या हातात सिगारेट असेल, असं मला सांगण्यात आलं होतं. हे ऐकताच मी सुन्न झाले. मी भन्साळींना (Sanjay Leela Bhansali) म्हणाले की, सर मी याआधी कधीही असं केलं नाही. माझ्या जीवनात अशा अनेक संधी आल्या परंतु असे सीन्स करायला मी कायम नकार दिला आहे. जर मी सिगारेट पकडली असती तर ते खोटं दिसलं असतं. भन्साळींनी हे ऐकल्यावर कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या म्हणण्याला मान दिला होता”.(Bollywood gossip)

पुढे फरीदा म्हणाल्या की, “हातात दारु, सिगरेट धरुन हा सीन करायला मी अस्वस्थ आहे हे त्यांनी ओळखलं. भन्साली खूप महान व्यक्ती आहेत. जर माझ्या व्यक्तिरेखेने धुम्रपान आणि मद्यपान केलं असतं तर ‘हीरामंडी’च्या बाकीच्या व्यक्तिरेखा आणि माझ्यामध्ये काहीच फरक दिसला नसता. त्यामुळे जेव्हा वेबसीरिजमध्ये मी स्वतःला पाहिलं तेव्हा मला आनंद झाला,”अशी शुटींगची आठवण फरीदा यांनी सांगितली. (Heeramandi untold stories)
===========
हे देखील वाचा : Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….
===========
हीरामंडी या वेब सीरीजमध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजीदा शेख, Aditi Rao Hydari, रिचा चड्डा, शर्मिन सेहगल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या हीरामंडी या वेब सीरीजमध्ये लाहौरमधील तवायफ आणि त्यांचं आयुष्य कसं होतं यावर कथा सादर करण्यात आली आहे. दरम्यान, लवकरच हीरामंडी २ येईल असं देखील म्हटलं जात आहे. पण सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी विकी कौशल, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत लव्ह अॅण्ड वॉर चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. (Love And War Movie)