VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Fawad Khan-Vaani Kapoor यांच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला भारतात हिरवा सिग्नल!
कश्मिरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार आणि त्यांच्या कुठल्याही कलाकृतीला भारतात रिलीज होण्यास बंदी घालण्यात आली होती… यात वाणी कपूर आणि फवाद खान यांच्या ‘अबीर गुलाल’ (Abeer Gulal) या चित्रपटाचा देखील समावेश होता… पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजला भारतात बंदी होती, परंतु, आता ‘अबीर गुलाल’च्या भारतातील रिलीजला हिरवा झेंडा मिळाला आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, भारत वगळता ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट जगभरात १२ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झाला आहे… भारतात बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, फवाद आणि वाणी कपूरचा हा चित्रपट २६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता खरंच हा चित्रपट रिलीज होणार की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे… (Fawad Khan And Vaani Kapoor)
====================================
हे देखील वाचा : Karishma Kapoor : “संजय कपूरच्या संपत्तीतील एकही रुपया मला नको पण माझ्या…”
====================================
दरम्यान, २०२५ मध्येच पहलगाम हल्ला झाला होता… भारत-पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थीती निर्माण झाली होती… भारताने ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडा शिकवला होताच… यानंतर, आता एशिया कप क्रिकेट सामन्यात १४ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळावा ही परवानगी मिळत असेल तर चित्रपट रिलीज करायला काय हरकत आहे अशीही चर्चा झाली होती… त्यामुळे आता ‘अबीर गुलाल’ आता २६ सप्टेंबर रोजी भारतातही रिलीज होणार आहे… ‘अबीर गुलाल’ ची निर्मिती विवेक अग्रवाल, अवंतिका हरी, राकेश सिप्पी यांनी केलं आहे. आरती बागडी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. (Bollywood movies 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi