Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘मला माहीत नाही मी परत येईल की नाही…’ Neha Kakkar

Punha Ekda Saade Maade 3 Trailer : कुरळे बंधू परतले…

Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट;

रणजीत गजमेर यांचे मादल वाद्य आणि त्यावरची R.D.Burmanची बेहतरीन गाणी!

Big Boss Marathi Season 6 च्या घरातील चावी चोराचा रितेश

Rajkumar Rao-Patralekha यांनी लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, हिंदू संस्कृतीशी नावाचं

“Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

फिरोज खानची रुपेरी पडद्यावरील ‘वेलकम’मधील शेवटची भूमिका !

 फिरोज खानची रुपेरी पडद्यावरील ‘वेलकम’मधील शेवटची भूमिका !
बात पुरानी बडी सुहानी

फिरोज खानची रुपेरी पडद्यावरील ‘वेलकम’मधील शेवटची भूमिका !

by धनंजय कुलकर्णी 13/08/2024

भारतीय सिनेमातील स्टायलिश हिरो म्हणून ज्याचा कायम उल्लेख होतो ते म्हणजे अभिनेता फिरोज खान(Feroz Khan). हॉलीवुडची स्टाईल आणि इंडियन इमोशन्स या दोघांची सुंदर मेळ घालत फिरोज खान यांनी चित्रपट बनवले. १९७२ साली आलेल्या ‘अपराध‘ या चित्रपटापासून ते निर्माता व दिग्दर्शक बनले. पहिल्या सिनेमा पासूनच सिनेमाचा स्टायलिश लूक, कथानकातील थरार, चकाचक लोकेशन्स आणि हटके संगीत यामुळे प्रेक्षक फिरोज खान यांच्या चित्रपटाला गर्दी करू लागले. ‘अपराध’ या चित्रपटातील कार रेस तर काळजाचा ठोका चुकणारी होती.

त्यानंतर आला ‘धर्मात्मा’. गॉडफादरची कम्प्लीट छाया असलेला हा चित्रपट अफगाणिस्तानमध्ये शूट केला होता. त्या देशात शूट केलेला हा पहिला भारतीय सिनेमा होता. त्यानंतर १९८० साली फिरोज खानचा सर्वाधिक यशस्वी ‘कुर्बानी’ हा चित्रपट आला. या चित्रपटाने भारतीय सिनेमाची सर्व गणितच बदलून टाकले. त्यानंतर ‘जांबाज’, ‘दयावान’, ‘एल्गार’ हे त्यांचे सिनेमे आले. या सर्व सिनेमांना त्यांनी एक स्टायलिश लुक दिला होता. हॉलीवूडच्या काऊ बॉय इमेजच त्यांना आकर्षण होतं. त्यामुळे फिरोज खानचा सिनेमातील लूक, त्याची हॅट, लेदरच जाकीट, पिस्तोल…. सर्वच भारी होतं.

नव्वदच्या दशकामध्ये मात्र फिरोज खान यांनी कामे करणे कमी केलं होतं. काही गेस्ट अपियरंस त्यांनी चित्रपटातून केले होते. त्यांचा मुलगा फरदीन खान याचा ‘नो एन्ट्री’ हा सिनेमा २००५ साली प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्यासोबत फिरोज खान (Feroz Khan) यांची मिटिंग झाली. फिरोज खानचा लूक बघून बज्मी यांनी त्यांना आपल्या आगामी ‘वेलकम’ या चित्रपटात काम करणार का? असे विचारले. त्यावर फिरोज खान यांनी सांगितले की,” मी आता चित्रपटात काम करणे कमी केले आहे. त्यामुळे मी सिनेमात काम करू शकत नाही.”  पण बज्मी यांनी फिरोज खान यांना सिनेमात काम करायला राजी केले.

‘वेलकम’ या चित्रपटात अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या बॉसच्या भूमिकेत तितकाच तगडा कलाकार त्यांना हवा होता आणि ही भूमिका फिरोज खान (Feroz Khan) यांनी करावी अशी त्यांची इच्छा होती. फिरोज खान राजी झाल्यानंतर त्यांनी काम सुरु केले. या सिनेमात त्यांना फक्त चार सीन होते आणि क्लायमॅक्स सीन होता. पण आज आपण ‘वेलकम’ हा चित्रपट आपण फिरोज खान शिवाय विचार देखील करू शकत नाही. इतका इम्पॅक्ट फिरोज खानचा या चित्रपटावर होता. फिरोज खानची चित्रपटातील एन्ट्रीच्या वेळी जे बॅकग्राऊंड म्युझिक होतं ते अनीस बज्मी यांनी काढलं आणि तिथे फिरोज खानच्या चित्रपटातील गाणे बॅकग्राऊंडला टाकले.

त्यामुळे सिनेमाला एक वेगळा उठाव आला.  संपूर्ण टक्कल असलेला स्टायलिश फिरोज खान आरडीएक्स नावाने चित्रपटात वावरला आणि हा सिनेमा त्याने अक्षरशः खाऊन टाकला! या सिनेमाचे डबिंग होत असताना फिरोझ खान यांच्या लक्षात आलं यातील एक डायलॉग एडिट झाला आहे. त्याने अनीस यांना फोन लावला. तेंव्हा ते त्या ऑस्ट्रेलियात शूटिंग करत होते. त्यावेळी फिरोज खान यांनी विचारले, ”अरे माझा तो डायलॉग कुठे गेला? तो डायलॉग तर चित्रपटाची जान आहे.” अनीस यांनी तिथून आपल्या एडिटरला फोन करून चौकशी केली आणि तो डायलॉग पुन्हा सिनेमात राहिला!

========

हे देखील वाचा : ‘या’ सिनेमातील गाणे चित्रित करायला दिग्दर्शक राजू हिरानी तयार नव्हते.

========

“आपल्या सिनेमाविषयी इतकं पॅशन असला माणूस मी पाहिला नाही” असं अनीस बज्मी यांनी सांगितलं होतं. ‘वेलकम’ हा चित्रपट २१ डिसेंबर २००७  ला  प्रदर्शित झाला. त्यानंतर मात्र फिरोज खान चित्रपटापासून लांबच राहिला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला फिरोज खान (Feroz Khan) पुढे कॅन्सरचा शिकार झाला आणि २७ एप्रिल २००९  रोजी  त्यांचे निधन झाले. एखाद्या राजाची एक्झिट त्याच्या शान प्रमाणे व्हावी असा त्याचा आरडीएक्स हा रोल होता!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.