
Filmfare Awards Marathi 2025 : ‘पाणी’ ने मारली बाजी; तर महेश मांजरेकर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते!
यंदाचं फिल्मफेअर पुरस्काराचं हे १० वं वर्ष होतं.. दरवर्षी प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना त्यांच्या कामाची पोचपावती देणारा हा पुरस्कार सोहळा फार मानाचा समजला जातो… या वर्षी ‘पाणी’ (Paani Movie), ‘फुलवंती’, ‘जुनं फर्निचर’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये चुरशीची लढत दिसली.. मात्र, आदिनाथ कोठारे (Aaditnath Kothare) अभिनित आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) निर्मिती पाणी चित्रपटाने १५ पेक्षा अधिक नामांकने मिळवून बाजी मारली होती… आता जाणून घेऊयात Filmfare Awards Marathi 2025 चे विजेते आहेत तरी कोण…
Filmfare Awards Marathi 2025 विजेत्यांची नावे :
- जीवनगौरव पुरस्कार: उषा मंगेशकर
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): महेश मांजरेकर (जून फर्निचर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका): वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट: पाणी
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आदिनाथ कोठारे (पाणी चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक): घात, अमलताश
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक): जितेंद्र जोशी (घात चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (पुरुष): क्षितीज दाते (धर्मवीर २ चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): राहुल देशपांडे – सारले सारे (अमलताश चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): वैशाली माडे – मदनमंजिरी (फुलवंती चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राहुल रामचंद्र पवार (खडमड चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: नवज्योत बांदीवडेकर (घरात गणपती चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला): जुई भागवत (लाईक आणि सबस्क्राईब चित्रपट)

- सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष): धैर्य घोलाप (एक नंबर चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: अविनाश–विश्वजीत (फुलवंती चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: एकनाथ कदम (फुलवंती चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइन: मानसी अट्टार्डे (फुलवंती चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन: अनमोल भावे (पाणी चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: उमेश जाधव – फुलवंती टायटल ट्रॅक (फुलवंती चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: गुलराज सिंग (पाणी चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट संपादन: नवनीता सेन (घात चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: महेश लिमये (फुलवंती चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पटकथा: नितीन दीक्षित (पाणी चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट कथा: छत्रपाल आनंद निनावे (घात चित्रपट)