Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh Bachchan यांनी तोडले मौन; Operation Sindoor वर व्यक्त केल्या भावना !
Amitabh Bachchan On Operation Sindoor: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी २८ लोकांचा जीव घेतला होता..त्यानंतर लोकांमध्ये मध्ये याबाबत तीव्र राग व्यक्त केला जात होता आणि याच दरम्यान सरकारने १५ दिवसानंतर भारत सरकार आणि सेनाने ७ मे रोजी पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर लागू केले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणाव सुरू आहे. त्यानंतर कालपासूनच दोन्ही देश सीजफायरवर मान्य झाले आहेत, पण पुढे काय होईल याबद्दल सांगणे खरतर कोणासाठीही कठीण आहे.(Amitabh Bachchan On Operation Sindoor)

आता या सर्व परिस्थितीनंतर अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी रविवारी एक्सवर यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुमारे 20 दिवसांपासून फक्त रिकाम्या नंबरच्या पोस्ट शेअर केल्यावर त्यांनी एक भावनिक आणि देशभक्तीपूर्ण पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तान आणि POK मध्ये केलेल्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ल्यांचे कौतुक केले. पोस्टद्वारे त्यांनी दहशतवादाच्या क्रुरतेची आणि सैनिकांच्या धैर्याची गोष्ट सांगितली.

अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवर लिहिले आहे, ‘FB 4295- छुट्टियां मानते हुए, उस राक्षस ने, निर्दोष पति पत्नी को बाहर खींच कर, पति को नग्न कर, उसके धर्म की पूर्ति करने के बाद, उसे जब गोली मारने लगा. पत्नी ने घुटने पे गिर कर रो-रो अनुरोध करने के बाद भी, कि ‘उसके पति को न मारो’ उसके पति को उस बुजदिल राक्षस ने बेहद बेरहमी से गोली मारकर पत्नी को विधवा बना दिया.’
छुट्टियाँ मानते हुए, उस राक्षस ने, निर्दोष पति पत्नी को बाहर खींच कर, पति को नग्न कर, उसके धर्म की पूर्ति करने के बाद , उसे जब गोली मारने लगा, तो पत्नी ने, घुटने पे गिर कर, रो रो अनुरोध करने के बाद भी, की उसके पति को न मारो ; उसके पति को उस बुज़दिल राक्षस ने, बेहद बेरहमी से , गोली मार कर, पत्नी को विधवा बना दिया !!
जब पत्नी ने कहा “मुझे भी मार दो” !!
तो राक्षस ने कहा “ नहीं !
तू जाके, ” …. ” को बता “ !
================================
================================
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ट्रोल होत होते. त्याचे कारणे म्हणजे त्यांचनी पाळलेले मौन . २२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामुळे देशभरात संताप होता. याच्या प्रतिसादात इंडियन आर्मीने ऑपरेशन सिंदूर चालवले आणि दहशतवाद्यांना भारी प्रत्युत्तर दिले, पण १० मेपर्यंत अमिताभ बच्चन यांनी काहीच मत किंवा पोस्ट लिहिली न्हवती म्हणून त्यांना ट्रोल करण्यात आले होते.