Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Sanjay Leela Bhansali यांच्या विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?
हिंदी चित्रपटसृष्टीतील लार्जर दॅन लाईफ चित्रपट साकारणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे… त्यांच्या विरोधात बिकानेर शहरात एफआयआर दाखल करण्यात आला असून संजय यांच्यावर फसवणूक, गैरवर्तन आणि विश्वासघाताचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ संजयच नाही तर इतर आणखी दोन लोकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक राज माथूर नावाच्या व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे..(Entertainment News)

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीकानेर सदर सर्कल ऑफिसर विशाल जांगिड याबाबत म्हणाले की, “प्रतीक राज माथूर या व्यक्तीचा दावा आहे की संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटासाठी लाइन प्रोड्यूसर म्हणून त्यांच्यासोबत करार केला होता, परंतु नंतर तो रद्द केला.संजय लीला भन्साळींवर असा आरोप आहे की भन्साळी आणि त्यांच्या टीममधील दोन लोकांनी त्यांच्यावर लाईन प्रोड्यूसरची जबाबदारी सोपवली आणि नंतर पैसे न देता त्यांना प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. याच मुद्द्यावरुन भन्साळी आणि त्या दोघांविरुद्ध बिचवाल पोलिस ठाण्यात फसवणूक, गुन्हेगारी कट आणि इतर अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…
====================================
हे देखील वाचा : तमाशा म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर उलगडणार Zing चित्रपटातून
====================================
दरम्यान, सध्या संजय लीला भन्साळी रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यात व्यस्त आहेत… संजय यांचा ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं जात आहे…(Love and War)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi