Dilip Prabhavalkar : होय महाराजा! ‘दशावतार’ चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस!

Disha Patani हिच्या घरावर गोळीबार; २ गॅगस्टर्सने घेतली हल्ल्याची जबाबदारी
गेल्या काही महिन्यात बॉलिवूड कलाकारांवरील हल्ले होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे… सलमान खानच्या घरावर बिश्नोई गॅंगने केलेला हल्ला ताजा असतानाच आता अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेलीच्या घरी गोळीबार करण्यात आला आहे.. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नसून पोलिसांनी ताबडतोब सुरक्षा वाढवली असून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे… मिळालेल्या माहितीनुसार दिशा पटानीच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गॅँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी घेतली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दिशा पटानीचे वडील, निवृत्त उपअधीक्षक जगदीश पटानी हे बरेलीतील घरात राहतात. पहाटे गुरुवारी ४.३० च्या सुमारास, सिव्हिल लाईन्स येथे असलेल्या दिशाच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि भिंतीवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार-पाच राउंड गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतल्याचे समोर आले आहे. या गॅँगने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांनी दिशाची बहीण खुशबू पटानीने प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल केलेल्या कमेंटचा हा असा बदला घेतला आहे. पोस्टमध्ये धमकी देत असे लिहिले आहे की, जर कोणी संत आणि धर्मांविरुद्ध कमेंट केली तर त्याने परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे. पण, आता ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.

पोस्टमध्ये असे देखील लिहिले आहे की, ‘भावांनो आज खुशबू पाटणी/ दिशा पाटणी यांच्या घरी झालेला गोळीबार ही एक कारवाई आहे. त्यांनी आमचे पूज्य संत प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराज यांचा अपमान केला. त्यांनी आमच्या सनातन धर्माचे अवमान करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पूज्य देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होते. पुढच्या वेळी जर कोणी किंवा त्यांनी आमच्या धर्माबद्दल अशाप्रकारची असभ्यता दाखवली तर आम्ही त्यांच्या घरात कोणालाही जीवंत सोडणार नाही.’
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दिशा पटाणीची बहीण खुशबू हिने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये ती प्रेमानंद जी महाराजांविरुद्ध तिने काहीतरी बोलल्याची बातमी देणाऱ्यांवर टीका केली होती… खुशबू म्हणाली होती की, तिचा व्हिडिओ प्रेमानंद जी महाराजांसाठी नाही तर अनिरुद्धाचार्य यांच्याविरुद्ध आहे. अनिरुद्धाचार्य यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांवर कमेंट केली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर खुशबू संतापली आणि तिने अनिरुद्धाचार्य यांना खूप सुनावले होते.
====================================
हे देखील वाचा : Bobby Deol ‘या’ अभिनेत्रीच्या होता प्रेमात; ५ वर्षांचं रिलेशनशिप, लग्नही ठरलेलं पण…
====================================
दिशा पटानीच्या घराबाहेर गोळीबार होण्याआधी कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडातील रेस्टोरंटवपही गोळीबार झाला होता.. तर दुसरीकडे सैफ अली खान याच्या घरात चोराने शिरुन चोरी करण्याचा प्रकार घडला होता… एकूणच कलाकार आणि त्यांच्या घरावर होणाऱ्या हल्ल्याचं वाढतं प्रमाण दहशत निर्माण करत आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi