Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

सोशल मीडियावर रंगलेय ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘या’ नव्या लूकची चर्चा!
विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन काही वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर थेट राणीच्या भूमिकेतून एन्ट्री घेणार आहे. ऐश्वर्यानं मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एन्ट्री घेतली ती प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 1987 मध्ये आलेल्या ईरुवर या तमिळ चित्रपटातून. आता ऐश्वर्या काही वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मणिरत्नम यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे.
ऐश्वर्याचा पोन्नियन सेल्वन हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचा ऐश्वर्याचा लूक नुकताच सोशल मिडीयावर झळकला. एका राणीच्या भूमिकेत असलेल्या ऐश्वर्याच्या या लूकने चाहत्यांची पोन्नियन सेल्वन चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.
हा चित्रपट ‘पोन्नियान सेलवन’ या गाजलेल्या तमिळ कादंबरीवर आधारीत आहे. या कादंबरीचे लेखक होते ज्येष्ठ लेखक कल्कि कृष्णमूर्ति. 1995 मध्ये आलेल्या या पुस्तकांनं वाचकांची मने जिंकली होती. यामध्ये 10 व्या शतकातील चोल साम्राज्याच्या काळ दाखवण्यात आला आहे.
एका साम्राज्याचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी झालेल्या घडामोडी, त्यामागचे राजकारण, कटकारस्थान, शाही परिवारातील वाद विवाद आणि त्यातून झालेला रक्तपात या सर्वांचा यात समावेश आहे. मणिरत्नम हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असल्याने चित्रपट भव्यदिव्य असेल यात शंका नाही.
हा चित्रपट दोन भागात येणार असून पहिला भाग यावर्षी 30 सप्टेंबरला तर दुसरा भाग पुढील वर्षी मोठ्या पडद्यावर येईल अशी आशा आहे. कारण या दुस-या भागाचे शुटही पहिल्या भागासोबत करण्यात आले आहे.
या चित्रपटात ऐश्वर्या राय राणीच्या भूमिकेत असून राणीच्या वेशातील आपले छायाचित्र सोशल मिडायावर शेअर करतांना ऐश्वर्यानं पुन्हा सुवर्ण युगाची चाहूल! असं कॅप्शन दिलं आहे. चित्रपटात ऐश्वर्यासह विक्रम, प्रकाश राज, जयराम रवी, कार्ती, तृषा आणि शोभिता धुलिपाला हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पोन्नियन सेलवन तमिळ, हिंदी, तेलुगु, मलयालम आणि कन्नड भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी 500 करोडचे बजेट असून आतापर्यंतचा सर्वात बिगबजेट चित्रपट म्हणून पोन्नियन सेल्वन चित्रपटाचा उल्लेख होत आहे.
विशेष गोष्ट म्हणजे ऐश्वर्या यामध्ये नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. पोन्नियन सेल्वन चित्रपटाचे संपूर्ण शुटींग दक्षिण भारतात पूर्ण करण्यात आले आहे. ऐश्वर्या यापूर्वी 2018 मध्ये फन्ने खां या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर म्हणजे, तब्बल चार वर्षींनी ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर येत आहे.
बच्चन कुटुंबाची सूनबाई असलेली ऐश्वर्या आई झाल्यावर ‘जज्बा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकली. त्यानंतर सरबजीत आणि ऐ दिल है मुश्किल चित्रपटात ऐश्वर्या दिसली. मात्र 2018 मध्ये आलेल्या ‘फन्ने खां’ चित्रपटानंतर ऐश्वर्या मोठ्या पडद्यावरु गायब झाली होती. नंतर बातमी आली की, ती मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वनसाठी तयारी करत आहे.
====
हे देखील वाचा : ऐश्वर्याच्या कारकिर्दीची सिल्व्हर ज्यूबली
====
मणिरत्नम यांच्यासाठी ऐश्वर्या लकी अभिनेत्री ठरली आहे. यापूर्वी ऐश्वर्यानं मणिरत्नम यांच्या ईरुवर, गुरु, रावण या चित्रपटात लक्षवेधी भूमिका केल्या असून हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरले आहेत.

सहा राष्ट्रीय पुरस्कार, हिंदी आणि दाक्षिणात्य फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या प्रत्येक चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. आता हा पोन्नियन सेल्वन ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
या व्यतिरिक्त ऐश्वर्या ‘द लेटर’ या इंग्रजी चित्रपटातही दिसणार आहे. रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘थ्री वुमन’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. रविंद्रनाथ टागोर यांची वहिनी, कादंबरी देवी यांच्यावर आधारीत ही कथा आहे.
=====
हे देखील वाचा: ऐश्वर्या राय बच्चन ने नाकारलेले पाच चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का??
=====
याबरोबरच ऐश्वर्या ‘थलाइवार 169’ या चित्रपटातही झळकणार आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांतही प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ऐश्वर्या आणि रजनीकांत ही जोडी यापूर्वी रोबोट चित्रपटात दिसली होती.
ऐश्वर्याच्या चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे ती, पोन्नियन सेल्वन या चित्रपटाची आणि यामधील तिच्या विशेष लक्षवेधी लूकची!