
Friday release : मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मनोरंजनाचा तडका!
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात थिएटर आणि ओटीटीवर अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित झाले आहेत. नव्या चित्रपट आणि सीरीजसोबत जुन्या रि-रिलीज चित्रपटांचा ट्रेण्ड असूनही सुरु असून काही जुने गाजलेले चित्रपटही या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत जाणून घेऊयात या शुक्रवारी रिलीज झालेल्या कलाकृतींची यादी.(Bollywood movie release)
२१ मार्च रोजी हॉलिवूड चित्रपट ‘स्नो व्हाईट’ (Snow White) आणि ‘लॉक्ड’ (Locked) हे रिलीज झाले आहेत. क्लासिक एनिमेटेड चित्रपट ‘स्नो व्हाईट’ एका नव्या अवतारात समोर आला आहे. यावेळी प्रेक्षकांना हा चित्रपट लाईव्ह-अॅक्शनमध्ये पाहता येणार आहे. स्नो व्हाईटमध्ये राहेल झेगलर स्नो व्हाईटच्या तर गॅल गॅडोट खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर ‘लॉक्ड’ हा चित्रपट अर्जेंटिनाच्या ‘4×4’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यात अॅंथनी हॉपकिन्स आणि बिल स्कार्सगार्ड प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (Friday movie release)

आता वळूयात बॉलिवूडकडे… ‘पिंटू की परी’ (Pintu ki Pappu) हा एक विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला असून यात सुशांत जोशी आणि विकी हे नवे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तर रि-रिलीजचा ट्रेण्ड फॉलो करत ‘द कराटे किड’, ‘सैराट’, ‘लम्हे’ (Lamhe), ‘घातक’, ‘सालार: पार्ट १’ हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.
======
हे देखील वाचा :Archana Joglekar : शूटिंगदरम्यान झाला बलात्काराचा प्रयत्न, हादरलेल्या अर्चना जोगळेकरांनी थेट इंडस्ट्रीच सोडली
======
तर विविध ओटीटी वाहिन्यांवरही काही चित्रपट, सीरीज प्रदर्शित होणार आहेत. यात नेटफ्लिक्सवर ‘खाकी : द बंगाल चॅप्टर’, प्राईम व्हिडिओवर ‘स्काय फोर्स’ आणि जिओस्टारवर ‘Kanneda’ प्रदर्शित होणार आहे.