
Bollywood and South Sequels : ‘आरआरआर’ ते ‘जवान’; हे गाजलेले सीक्वेल्स आहेत लांबणीवर?
बॉलिवूडमध्ये सध्या एकामागून एक ऐतिहासिक, थ्रिलर, क्राइम, हॉरर चित्रपट येताना दिसत आहेत… यात सीक्वेल्सही नक्कीच आहेत… खरं तर प्रेक्षक नव्या चित्रपटांच्या कथा पाहण्यापेक्षा गाजलेल्या हिंदी आणि साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत… मग यात ‘केजीएफ’, ‘सालार’, ‘दृष्यम ३’ या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख व्हायला हवाच… पण सध्या काही स्टार कलाकार त्यांच्या इतर चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे ‘अॅनिमल’ किंवा ‘जवान’ चित्रपटांचे सीक्वेल्स सध्या लांबणीवर पडले आहेत असं चित्र दिसून येत आहे…(Bollywood Sequels News)

सध्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटामुळे खास चर्चेत असणाऱ्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याची येणारी काही वर्ष चित्रपटांच्या बाबतीत समृद्ध असणार असं दिसतंय… ‘रामायण’ तर येतोच आहे पण त्यासोबतच तो ‘लव्ह अॅंण्ड वॉर’ या चित्रपटाच्या कामातही लवकरच अडकणार आहे… त्यामुळे ‘ब्रम्हास्त्र २’ आणि ‘अॅनिमल पार्क’ हे या दोन्ही गाजलेल्या चित्रपटांचं काम अडकलं आहे… शिवाय, ‘धुम ४’ मध्येही तो असणार अशा चर्चा असून रणबीरचे थकलेले चित्रपट येणार तरी कधी असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय…(Ranbir Kapoor Movies)

याशिवाय, शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादूकोण यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘जवान’ (Jawan Movie) चित्रपटाचा सीक्वेलही प्रतिक्षेतच आहे… याव्यतिरिक्त ‘टायगर वर्सेस पठाण’ (Tiger Vs Pathan) चित्रपट येणार होता खरा मात्र सलमान खानच्या वक्तव्यानुसार सध्या तो येईल की नाही या द्वंधावस्थेत आहे… आणि तसंही सध्या शाहरुख मुलगी सुहाना खान हिच्या ‘किंग’ चित्रपटात गुंतलेला असल्यामुळे जवान २ लवकर येईल असं वाटत तरी नाही आहे…(Shah Rukh Khan Movies)

बरं, केवळ हिंदीच नाही तर साऊथ प्रेक्षकही ‘कल्की’, ‘सालार’, ‘केजीएफ’ या चित्रपटांच्या सीक्वेलची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत… मात्र, प्रभास (Prabhas) सध्या ‘राजा साब’ चित्रपटात बिझी असल्यामुळे ‘सालार २’ आणि ‘कल्की २’ चित्रपटांची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर, यश(Yash) ‘रामायण’ आणि टॉक्सिक या चित्रपटांत गुंतला असल्याकारणाने केजीएफ ३ देखील प्रतिक्षेत आहे… (Yash Movies)
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?
=================================
शिवाय, ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) ‘वॉर २’, आणि प्रशांक नील यांच्यासोबत एका चित्रपटामुळे अडकला असल्यामुळे देवारा २ कधी येईल हे सांगणं कठिण आहे…शिवाय, ‘आरआरआर २’ ची देखील घोषणा झाली असली तरी ज्युनिअर एनटीआर आणि स्वत: दिग्दर्शक एस.एस.राजामौली ‘SSMB29’ चित्रपटाच्या कामात कामात अडकल्यामुळे या चित्रपटाचंही कधी लाईनअप होईल सांगता येत नाही… एकूणच काय तर बॉलिवूड आणि साऊथच्या रसिक प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या चित्रपटांचे सीक्वेल्स पाहण्यासाठी काही वर्ष वाट पाहावी लागेल यात शंका नाही…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi