Gadar 2 Box Office Collection: गदर 2 सिनेमा ४०० कोटींच्या क्लबमध्ये झाला सामील!
सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस हा अॅक्शन ड्रामा चित्रपट नवा विक्रम करत आहे. ओह माय गॉड 2 सह 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सनी देओलच्या गदर २ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा गाठला आहे. १२ दिवसांत धमाकेदार कमाई करून हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. गदर 2 मध्ये सनी देओलसोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसत असून त्या दोघांची केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे. गदर २ ने बाराव्या दिवशी मोठा विक्रम मोडला असून हा चित्रपट ४०० कोटीक्लबमध्ये सामील झाला आहे. ४०० कोटींच्या एन्ट्रीमुळे लवकरच तो ५०० कोटीक्लबमध्ये सामील होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा वाढली आहे.(Gadar 2 Box Office Collection)
बॉक्स ऑफिसरिपोर्टवर काम करणाऱ्या सॅनिल्क या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ‘गदर २’ या चित्रपटाची कमाई १२ व्या आणि त्याखाली घसरली आहे. दुसऱ्या सोमवारी १३.५० कोटींची कमाई केली होती, पण आता बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्यात आणखी घसरण झाली आहे. ‘गदर २’ने दुसऱ्या मंगळवारी ११.५० कोटींची कमाई केली आहे, जी आतापर्यंतच्या आकडेवारीच्या तुलनेत सर्वात कमी आहे. मात्र या चित्रपटाने 12 दिवसांत 400.10 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.गदर २ च्या कलेक्शनमध्ये आठवड्याच्या दिवसात सातत्याने लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. असे असूनही या चित्रपटाने ४०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘गदर 2’ चे 12 व्या दिवसाचे कलेक्शन जवळपास 11 कोटी होते. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत 399.6 कोटींचा गल्ला जमवला आहे.
म्हणजेच एकूणच हा चित्रपट ४०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. हा आकडा ओलांडणारा ‘गदर २’ हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील दुसरा हिंदी चित्रपट आहे.गदर २ ने बॉक्स ऑफिसवर ‘ओह माय गॉड-२’ आणि रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीला मागे टाकले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘गदर २’ हा यावर्षी भारतात सर्वाधिक कमाई करणारा चौथा हिंदी चित्रपट असल्याची माहिती दिली आहे.(Gadar 2 Box Office Collection)
=====================
=====================
तसेच आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 देखील या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत आधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या गदर २, जेलर आणि ओएमजी २ दरम्यान ड्रीम गर्ल २ किती कलेक्शन करू शकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.