Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गणेशउत्सव जल्लोषात साजरा होणार…

 सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गणेशउत्सव जल्लोषात साजरा होणार…
Sony Marathi Serial Ganpati Festival
टीव्ही वाले मिक्स मसाला

सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये गणेशउत्सव जल्लोषात साजरा होणार…

by रसिका शिंदे-पॉल 08/09/2024

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच विविध गोष्टी करू पाहते. मालिकेचे निराळे विषय आणि रंजक कथानकं प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकतात. सध्या सर्वत्र गणेशउत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन ही झाले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील सगळ्या मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. सगळ्यांची लाडकी ‘तुज माजं सपान’ ह्या मालिकेत वीरू आणि प्राजक्ता हे ओझरला गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मालिकेच्या विशेष भागात त्यांनी ओझरला जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. मालिकेचा संपूर्ण चमू तिथं उपस्थित होता आणि तिथे चित्रीकरण करून बाप्पांचे आशीर्वाद घेतले आहेत. बाप्पांच्या विशेष दर्शनाने त्यांच्या नात्यात आलेले दुरावे संपतील का आणि ते पुन्हा एकत्र येऊन त्यांचा संसार सुरळीत चालेल का?हे पाहण महत्वाच ठरेल.( Sony Marathi Serial Ganpati Festival)

Sony Marathi Serial Ganpati Festival
Sony Marathi Serial Ganpati Festival

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी‘ या मालिकेत यामिनी सराफ आणि राजवीर सराफ यांच्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्याशिवाय राजवीर आणि मयूरी हे दोघं पालीच्या गणपती दर्शनालाही जाणार आहेत. पालीच्या गणपती मंदिराला भेट देऊन तिथलं दर्शन मालिकेतून प्रेक्षकांना घडवणार आहेत!राजवीर आणि मयूरी यांच्या लग्नानंतर बाप्पांचं आगमन पहिल्यांदाच होणार आहे. मालिका सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोचली आहे, पण सराफांच्या घरी बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहात साजरं केलं जाणार आहे. सराफांच्या घरी चक्क सोन्याच्या गणपतीची मूर्ती बसवणार आहेत. मयूरी आणि राजवीर घरच्या बाप्पांचं आगमन करतील. त्यांचं बाप्पांकडे एकच मागणं आहे की त्यांचं एकमेकांवरलं प्रेम असंच राहू दे आणि दिवसेंदिवस वाढू दे आणि त्यांच्या आयुष्यातले अडथळे दूर होऊ देत.

Sony Marathi Serial Ganpati Festival
Sony Marathi Serial Ganpati Festival

‘भूमिकन्या‘ मालिकेत लक्ष्मी आपले वडील बळी यांच्याबरोबर बाप्पांची मूर्ती साकारताना दिसणार आहेत. बळी आणि लक्ष्मी यांनी ती मूर्ती एकत्र सेटवरच साकारली आहे आणि मालिकेतले सगळे कलाकार याच मूर्तीची पूजा करताना दिसणार आहेत. शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं आणि त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी लक्ष्मी गणपती बाप्पांपुढे प्रार्थना करणार आहे. त्याशिवाय लक्ष्मी टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. मालिकेचा चमू टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात जाऊन चित्रीकरण करणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना तिथले दर्शनही आपोआपच घडणार आहे.(Sony Marathi Serial Ganpati Festival)

===============================

हे देखील वाचा: कलाकार ही बाप्पाच्या सेवेत झाले मग्न; मालिकेत ही होणार बाप्पाचं जल्लोषात स्वागत !

===============================

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत बयो आणि इरा चक्क मुंबईतून कोकणात बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यामुळे मालिकेत कोकणातल्या गणेशउत्सवाचे दर्शन प्रेक्षकांना घेता येईल. या वर्षी गणपती बाप्पांचे आगमन सर्वत्र जोरदार पद्धतीने करण्यात येते आहे. गणेशउत्सवाच्या काळात सर्वत्र गणपतीचा जल्लोश असणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरसुद्धा गणेशउत्सवाचा जल्लोश सगळ्या मालिकांत पाहायला मिळेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abol preetichi ajab kahani Celebrity Celebrity News Entertainment ganpati festival 2024 Marathi Serial sony marathi serial Sony Marathi Serial Ganpati Festival Tuja majh sapan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.