Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गश्मीर महाजनीची ‘त्या’ कलाकारांवर सडकून टीका

 गश्मीर महाजनीची ‘त्या’ कलाकारांवर सडकून टीका
कलाकृती तडका

गश्मीर महाजनीची ‘त्या’ कलाकारांवर सडकून टीका

by Jyotsna Kulkarni 08/07/2024

अनेकदा कलाकार त्यांच्या मुलाखतींमध्ये, विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रायव्हसी मिळत नसल्याची तक्रार करताना दिसतात. त्यांच्या अवतीभोवती असणारे पापराझी आणि फॅन्स यांच्यामुळे त्यांना त्यांचे वैयक्तिक जीवनच राहिले नसल्याचे ते अनेकदा बोलतात. सोशल मीडिया, मोबाइल, कॅमेरा आदी अनेक गोष्टींमुळे त्यांच्यावर सतत एक तिसरा डोळा लक्ष ठेऊन असतो. (gashmeer on actors fake attitude)

अनेकदा कलाकार त्यांच्या मुलाखतींमध्ये, विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रायव्हसी मिळत नसल्याची तक्रार करताना दिसतात. त्यांच्या अवतीभोवती असणारे पापराझी आणि फॅन्स यांच्यामुळे त्यांना त्यांचे वैयक्तिक जीवनच राहिले नसल्याचे ते अनेकदा बोलतात. सोशल मीडिया, मोबाइल, कॅमेरा आदी अनेक गोष्टींमुळे त्यांच्यावर सतत एक तिसरा डोळा लक्ष ठेऊन असतो.

Gashmeer On Actors Fake Attitude

फॅन्स हे नेहमीच आपल्या आवडत्या कलाकाराला बघण्यासाठी, भेटण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र यामुळे कलाकार वैतागतात. ‘कलाकार देखील एक माणूस आहे’, ‘सगळ्यांनाच वैयक्तिक आयुष्य असते’, ‘आमच्या प्रायव्हसीचा मान ठेवा’ आदी अनेक वक्तव्य करताना दिसतात. असे असले तरी फॅन्स आणि मीडिया त्यांचा पिच्छा सोडत नाही. अनेकदा काहींना त्याचे म्हणणे पटते तर काहींना नाही. मात्र कलाकारांचे हे असे वक्तव्य आणि त्यांचे खासगी जीवन याबद्दल अभिनेता गश्मीर महाजनीने त्याचे परखड मत मांडत ‘कलाकार आयुष्य खासगी ठेवण्याचे नाटक करतात.’ असे म्हटले आहे. (gashmeer on actors fake attitude)

मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गश्मीरने हिंदीमध्ये देखील मोठे नाव कमावले आहे. आपल्या लुक्ससोबतच तो फिटनेसमुळे देखील चर्चेत असतो. लवकरच गश्मीर रोहित शेट्टीच्या सुपरहिट अशा ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये दिसणार आहे. त्याने नुकतेच एका मुलाखतीमध्ये कलाकारांच्या काही गोष्टी जगासमोर आणत त्यांना खडेबोल सुनावले आहेत.

गश्मीरने मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले की, “प्रेक्षकांच्या नजरेसमोर असणे हे अजिबातच आव्हान नाहीये. जेव्हा तुम्ही कलाकार व्हायचे ठरवतात, होतात तेव्हा तुम्हाला सतत लोकांसमोर दिसावेच लागेल. त्यांच्या नजरेत रहावेच लागेल. असे केले नाही तर लोकं तुम्हाला विसरून जातील. तुम्हाला ओळख टिकवून ठेवण्यासाठी असे करणे भाग आहे. हे असे करणे जर तुम्हाला चॅलेंज वाटत असेल, तर कलाकार नका होऊ. तुम्हाला नेहमीच मनात वाटत असते की, लोकांनी तुमहाला ओळखावे, तुमच्याजवळ यावे, सेल्फी काढावेत. पण जेव्हा असे घडते तेव्हा तुम्ही त्याची खिल्ली उडवतात. ‘हे खूप आव्हानात्मक आहे, माझे खासगी आयुष्य लोकांसमोर येत असते.’ अस म्हणतात. जर तुम्ही असाच विचार खरंच करत असाल तर मग तुम्ही या क्षेत्रात का आलात? कलाकार होण्यापूर्वी तुम्हाला माहित असते की हे असेच घडणार आहे. काही लोकं तर यासाठीच याक्षेत्रात येतात. कलाकारांना देखील तेच हवे असते.” (gashmeer on actors fake attitude)

गश्मीर पुढे म्हणाला, “प्रत्येक कलाकारांना लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे हेच पाहिजे असते. या गोष्टींना जे खोटे आहे असे बोलतात तेच खोटं बोलत असतात. सोशल मीडियावर लोकं तर सर्रास आपले खोटा चेहरा दाखवतात. खोटं बोलतात. कलाकारांच्या काही गोष्टी फक्त बोलण्यासाठीच असतात. माझ्यासह प्रत्येक अभिनेत्याला लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे त्यांच्या मागे मागे यावे असेच वाटत असते. ज्या दिवशी लोकं कलाकारांना पाहणे बंद करतील, तुमच्याकडे लक्ष देणार नाही त्यादिवशी तुम्ही संपाल. तुमचे करियर संपेल.”

Gashmeer On Actors Fake Attitude

पुढे गश्मीर म्हणाला, “कलाकार कधीच त्यांचे वैयक्तिक आयु्ष्य, गोष्टी लोकांना दाखवत नाही. त्यांचे हे आयुष्य कोणीही पाहू शकणारही नाही. कलाकारांच्या घरात काय आहे, त्यांच्या बेडरूममध्ये काय आहे, हे सर्व खासगीच तर आहे. ते जोपर्यंत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत नाही तोपर्यंत तोपर्यंत ते कोणीच पाहू शकणार नाही. कलाकार स्वतःच सर्व दाखवता आणि मग आमचे वैयक्तिक आयुष्य खासगी राहू द्या. म्हणतात.”

हे देखील वाचा : ‘लाईफलाईन’ सिनेमात माधव अभ्यंकर किरवंताच्या भूमिकेत दिसणार !

दरम्यान गश्मीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, हिंदीमध्ये अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. (gashmeer on actors fake attitude)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Gashmeer Mahajani gashmir imali fame actor gashmir Marathi Actor Marathi Movie अभिनेता गश्मीर महाजनी गश्मीर महाजनी गश्मीर महाजनी मुलाखत
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.