
‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी दिसणार?; Gashmeer Mahajani म्हणाला…
९०च्या दशकातील मराठी चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांना भूरळ घालतात… ‘छकुला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माहेरची साडी’ अशा बऱ्याच चित्रपटाची क्रेझ २०-२५ वर्ष उलटून गेली तरी आजही कायम आहे… याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे ‘मुंबईचा फौजदार’ (Mumbaicha Faujdar marathi movie)… अभिनेत्री रंजना (Ranjana Deshmukh) आणि अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या जोडीचा हा गाजलेला चित्रपट १९८४ मध्ये रिलीज झाला होता… आता या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक गश्मीर रवींद्र महाजनी करणार असल्याचं सांगितलं जात असून यात रंजना यांची भूमिका प्राजक्ता माळी साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत… यावर गश्मीर महाजनी नेमकं काय म्हणाला आहे? जाणून घेऊयात.(Entertainment news)

गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) २०२४ मध्ये रिलीज झालेल्या फुलवंती चित्रपटात दिसले होते… यावरुनच आगामी चित्रपटातही त्यांची जोडी पुन्हा दिसेल असं प्रेक्षकांचं म्हणणं होतं.. अशातच ‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाचा रिमेक करणार असल्याचं गश्मीरने त्याच्या सोशल मिडियावर जाहिर केलं होतं… यात एका नेटकऱ्याने त्याला प्राजक्ता चित्रपटात असेल का? असा प्रश्न विचारला असता त्याने उत्तर दिलं होतं की, “मी ‘मुंबईचा फौजदार’ चित्रपट नक्की करणार आहे… पण त्यात प्राजक्ता काम करेल की नाही मला माहित नाही…”.(Marathi movies)
============================
============================

‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाचं दिग्दर्शन राजदत्त यांनी केलं होतं… यात रंजना देशमुख, रवींद्र महाजनी, प्रिया तेंडूलकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या… तसेच, या दोघांनी एकत्र ‘झुंज’, ‘लक्ष्मीची पाऊले’, ‘सुळावची पोळी’, ‘हिच खरी दौलत’, ‘जखमी वाघिण’, ‘दुनिया करी सलाम’, ‘हे दान कुंकवाचे’, ‘कशाला उद्याची बात’ या चित्रपटांत स्क्रिन शेअर केली होती. (Marathi Classic movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi