Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

Gaurav More : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर फिल्टर पाड्याच्या बच्चनची नवी इनिंग सुरु होणार!
काही कलाकार नाटक, मालिका किंवा चित्रपटांमुळे लोकप्रिय होतात आणि प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य होतात… मात्र, एका हास्य कार्यक्रमातून रातोरात स्टार झालेला गौरव मोरे (Gaurav More) आज स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करु शकला आहे… महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला रामराम केल्यानंतर आता लवकरच गौरव मोरे एका नव्या वाहिनीवर दिसणार आहे… नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या नव्या प्रवासाबद्दल माहिती दिली…(Marathi Entertainment News)

फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याने गेल्या काही काळात महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केली आहेत… आणि आता लवकरच तो झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) मालिकेत दिसणार आहे… नव्या अंदाजात कॉमेडी करण्यासाठी गौरव सज्ज झाला असून याबद्दल लोकमत फिल्मीशी संवाद साधताना त्याने नव्या कार्यक्रमाबद्दल स्वत:ची मतं व्यक्त केली…
गौरव मोरे याने चला हवा येऊ द्या कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हटलं की, “‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने १० वर्ष महाराष्ट्राला हसवलं आहे. मीही या कार्यक्रमाचा मोठा चाहता होतो. सर्वात जास्त टीआरपी मिळवणारा हा शो होता. मला ‘चला हवा येऊ द्या’ बद्दल विचारण्यात आलं. नव्या फॉर्मॅटमध्ये हा शो असणार आहे म्हटल्यावर मीही विचार केला की करायला हरकत नाही. ऑडिशन प्रोसेस सुरु झाली, मीटिंग झाली आणि माझी नव्या पर्वात एन्ट्री झाली“.(Latest Bollywood News)
पुढे गौरव म्हणाला की, “या आधीच्या’चला हवा येऊ द्या’च्या पर्वात मी नव्हतो. आता मी यामध्ये नवीन खेळाडून म्हणून जातोय. आता माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. नवं वर्ष, नवीन चॅनल, नवी माणसं त्यामुळे माझी पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात होणार आहे. फ्रेश सुरुवात असं खरं तर मी म्हणेन. त्याच हिशोबाने मला काम करावं लागेल. लोकं मला ओळखतात, सगळं चालून जाईल असा विचार करुन चालत नाही”.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाबद्दल बोलताना गौरव म्हणाला की,”कोरोना काळात हास्यजत्रेला लोकांनी खूप उचलून धरलं. आम्ही सगळे या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. ५ वर्ष काम केल्यानंतर अभिनयासोबतच इतर गोष्टींबाबतीतही माझ्याकडून तोचतोचपणा आला होता. कंफर्ट झोन आला होता. माझ्याकडून काहीही वेगळं घडत नव्हतं. ५ वर्ष झाली आहेत आणि आता आपण स्वत:साठी ब्रेक घेतला पाहिजे असं वाटलं. तेव्हा मी तो ब्रेक घेतला. या दरम्यान ‘मॅडनेस मचाएंगे’ ही हिंदी मालिकाही केली. मधली काही वर्ष मी कोणताही कॉमेडी शो केला नाही”.
तसेच, झी वाहिनीबद्दल बोलताना गौरव म्हणाला की,”झी चा प्रेक्षक वर्ग कसा आहे? त्यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? हे बघण्यासाठी मला महिना-दोन महिने तरी लागतील. त्यानंतरच मला अंदाज येईल. लोकांना काय पटतंय काय नाही? हे मी बघेन. मग जे पटतंय त्या गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा मी प्रयत्न करेन. दिग्दर्शकाला काय आवडतंय, चॅनलला काय हवंय, प्रेक्षकांना काय पाहायचंय, तीच गोष्ट लेखक कशा पद्धतीने लिहित आहेत याचं निरीक्षण करुन मला तशा पद्धतीने काम करावं लागेल. यासाठी एक-दोन महिने जातील”. शेवटी गौरव असं म्हणाला की, “विनोदी कामचं करायचं आहे पण त्यासोबतच प्रत्येकाचे विचार आणि मानसिकता पाहून काम करावं लागेल”.
================================
=================================
दरम्यान, गौरव मोरे याने आजवर ‘अल्याड पल्याड’, ‘बॉईज ४’, ‘लंडन मिसळ’, ‘अंकूश’ या चित्रपटांमध्ये कामं केली आहेत…याशिवाय, लवकरच तो ‘महापरिनिर्वाण’, ‘संगी’, ‘जयभीम पॅंथर’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे… त्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानंतर आता ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये गौरव त्याच्या कॉमेडीत कोणतं वेगळेपण आणणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi