लव्हली…प्रेमाची कहाणी – गीता गोविंदम
पास जबसे तेरी आई….तुझको जाना है मैने….किंवा येंती…येंती…ही गाणी कोणाला आठवतात का….15 ऑगस्ट 2018 मध्ये रिलीज झालेल्या तेलगु चित्रपटातील लोकप्रिय गाणी….गीता गोविंदम…हो, गीता गोविंदम…एक रोमॅंटीक कॉमेडी चित्रपट….या चित्रपटाच्या गाण्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता. एकतर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे गुड लूक…आणि त्यात चित्रपटाचे अफलातून शूट….यामुळे ही गाणी जेवढी ऐकायला चांगली….तेवढीच बघायलाही…त्यामुळे गीता गोविंदमची गाणी हिंदीमध्ये यायच्या आधीही लोकप्रिय झाली होती. त्याचे बोल समजत नव्हते, पण लोकेशन आणि गाण्यांचे चित्रिकरण यावर ही तेलगू गाणीही भारतभर गाजली. परदेशातही लोकप्रिय झाली. हिंदी गाणीही तशीच गाजली…चित्रपटाची कथा एकदम मनाला भावणारी….काही मारामारी नाही…की हेवेदावे नाही…एक खरी रोमॅंटीक स्टोरी….प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी प्रेमकहाणी…
आता नुकताच हा चित्रपट झी वाहिनीवर दाखवण्यात आला. बनी वासु हे निर्माता आणि परशुराम यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. गोपी सुंदर यांची गाणी आणि एस. मणिकंदन यांचे छायाचित्रण…या चौकडीने किती कमाल केली आहे, हे पुन्हा एकदा बघता आले. यापू्र्वीही हा चित्रपट बघितला आहे. पण कितीही वेळा पाहिला तरी पहिल्यांदाच चित्रपट बघतोय अशीच भावना…
नायिकेला पहिल्यांदा बघितल्यावरच प्रेमात पटणारा नायक…लव्ह अॅट फर्स्ट साईट…मग त्या दोघांमध्ये आलेला क्लायमॅक्स…त्यात नायकाच्या बहिणीचं आणि नायिकेच्या भावाचं ठरलेलं लग्न…हे लग्न आपल्या नकळत घडलेल्या चुकीमुळे मोडू नये म्हणून नायकाची धावपळ…अगदी नायिका सांगेल ती काम तो गपचूप करत रहातो…मग तिचे सामान उचलतो…तिची सर्व कामे करतो…गाडी बंद पडली तरी तिला गाडीवर बसवून गाडी ओढत नेतो…मग नायिकेला त्याच्या प्रेमाचा साक्षात्कार होतो….त्यात त्या दोघांचे लग्न घरातील मंडळी ठरवतातही…पण मग नायक अडतो…अर्थात त्याला जेव्हा नायिका आपल्या प्रेमात आहे, हे समजत, तोपर्यंत त्या नायिकेचं लग्न घरचे दुस-याच मुलाबरोबर ठरवून मोकळे झालेले असतात …मग नायिका अगदी लग्नमंडपापर्यंत नवरी म्हणून गेल्यावर नायक ड्रामा करतो…शेवटी काय गोड गोड…पण या सर्वांत सुंदर आहे ती फोटोग्राफी…कॅमे-याची कमाल…आणि विजय, रश्मिका यांचा अप्रितिम पण सहज असा अभिनय…एकतर दोघेही खूप छान दिसतात…त्यांच्या चेह-यावरील गोडवा या रोमॅंटीक चित्रपटाला बरोबर जोडला गेला आहे. त्यामुळेच हा चित्रपट तुफान चालला. तब्बल 132 करोडचा गल्ला या चित्रपटानं जमवला असं बोललं जातं.
आता या लॉकडाऊनच्या काळात डोक्याला खूप ताप झालाय…वैताग आलाय…चिडचिड होतेय…अशावेळी असे मस्त चित्रपट नक्की बघा…काही सू-या, तलवारी घेऊन मारामारी नाही. की प्रेमात कोणाची अडकाठी नाही. सारा गोडीचा मामला…शिवाय नेत्रसुखद चित्रपट…त्यामुळे सगळा ताण झटक्यात निघून जाईल…टीव्हीवर नाहीतर झी 5 वर गिता गोविंदम फ्री उपलब्ध आहे. नक्की बघा….
सई बने