Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नॅशनल क्रश Girija Oak हिला आहे पिळगांवकरांच्या ‘या’ गाण्याचा ट्रॉमा

 नॅशनल क्रश Girija Oak हिला आहे पिळगांवकरांच्या ‘या’ गाण्याचा ट्रॉमा
मिक्स मसाला

नॅशनल क्रश Girija Oak हिला आहे पिळगांवकरांच्या ‘या’ गाण्याचा ट्रॉमा

by रसिका शिंदे-पॉल 23/12/2025

सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील २ नावं विशेष चर्चेत आहेत, ती म्हणजे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आणि गिरीजा ओक (Girija Oak)… हिंदीत तर नॅशनल क्रशन म्हणून ओळख मिळवणारी गिरीजा सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाली आहे, आणि महागुरु त्यांच्या आठवणींच्या किस्स्यामुळे कायमच ट्रेण्डिंग असतात… आता झालंय असं की गिरीजा ओक हिने चक्क तिला सचिन पिळगांवकरांच्या एका गाण्याचा ट्रॉमा असल्याचं विधान केलं आहे… आता ते नेमकं कोणतं गाणं आहे आणि त्याचं कारण काय आहे जाणून घेऊयात…(Marathi Movie)

तर, सचिन पिळगांवकरांनी आजवर मराठीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत… दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांनी ९०चं दशक विनोदी मराठी चित्रपटांनी भरुन टाकलं होतं… आणि त्यातलाच ऑल टाईम फेव्हरेट चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकुटाने मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दाखवला आहे… शिवाय या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील बरेचसे रेकॉर्ड्सही मोडले होते… आणि याच चित्रपटातील एक गाणं गिरीजाला ट्रॉमटाईज करणारं आहे… (Laxmikant Berde and Ashok Saraf)

गिरिजा ओक हिने ‘इसापनिती’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाच्या एका प्रयोगातील अनुभव सांगितला. यावेळी ती म्हणाली की, ‘दोन स्पेशल’ या नाटकाचा प्रयोग सुरु होता. या नाटकातील एका भागात भागात माझ्या बहिणीवर अतिप्रसंग झालेला असतो आणि त्या दुःखात माझी बहीण आत्महत्या करते. तर तो अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सीन रंगमंचावर सुरू होता. मी पूर्णपणे त्या पात्रात शिरली होती आणि मला रडू कोसळणार इतक्यात मी स्वतःला सावरण्यासाठी एक ‘पॉज’ घेतला. पण, तो भावनिक सीन करत असताना दुसऱ्या रांगेत बसलेल्या एका प्रेक्षकाचा फोन वाजला. त्या फोनची रिंगटोन होती… ‘हृदयी वसंत फुलताना’. एका बाजूला मी प्रचंड वेदनेत होते, डोळ्यांत अश्रू होते आणि समोर मात्र हे अत्यंत आनंदी आणि रोमँटिक गाणं वाजत होतं”. (Girija Oak News)

पुढे गिरीजाने सांगितले की, “नाटकातील अत्यंत गंभीर प्रसंगी वाजलेल्या त्या गाण्यामुळे माझ्या मनावर असा काही परिणाम झाला की, मला आता त्या गाण्याची प्रचंड भीती वाटते. मी माझ्या भावना कंट्रोल करत होते, पण त्या गाण्याने सगळं विस्कळीत केलं. तेव्हापासून मला त्या गाण्याचा ‘ट्रॉमा’ बसला आहे. मी त्यानंतर ते गाणं कधीच ऐकलं नाही आणि आजही ते ऐकलं की मला धडधडायला होतं”, अशी कबुली यावेळी गिरीजाने दिली. (Bollywood)

================================

हे देखील वाचा : “लक्ष्मीकांत मला सेटवर त्याच्या धाकट्या बहिणीसारखाच”; Renuka Shahane यांनी सांगितली जुनी आठवण

================================

१९८८ मध्ये रिलीज झालेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banawa Banawi Movie) चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स केले आहेत… त्या वर्षात तो सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला होता…इतकंच नाही तर आज जवळपास ३० वर्ष उलटून गेली असली तरीही टीव्ही किंवा ओटीटी किंवा अन्य ओटीटी माध्यमांवर तो चित्रपट आवर्जून पाहिला जातो… दरम्यान, १९८८ मध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटींची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत कल्ट क्लासिकचा दर्जा मिळवला… अभिमानाची बाब म्हणजे या चित्रपटाच्या कथेवर आधारित कन्नड, पंजाबी आणि बंगालीमध्ये रिमेक करण्यात आले पण ‘अशी ही बनवाबनवी’ने जी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली ती अबाधित आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress ashi hi banavabanavi ashi hi banawa banawi Entertainment News Girija Oak national crush girija oak sachin pilgoankar sachin pilgoankar memes
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.