Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेतल्या एका सीनसाठी उतरली थेट चिखलात…
Star Pravah च्या कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.ल़ॉन्चच्या पहिल्याच आठवड्यात ६.७ टीआरपी मिळवत मालिकेची धमाकेदार सुरुवात झालीय. लवकरच मालिकेत एक रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे. कावेरी आणि उदयच्या अपघातानंतर चिमुकल्या चिकूला घेऊन कावेरी धर्माधिकारींच्या घरी येते. मात्र सुलक्षणा तिचा स्वीकार करत नाही. घरात स्थान हवं असेल तर मंदिराजवळ असलेल्या तलावातून कमळ आणण्यासाठी तिला सांगण्यात येतं. त्या तलावात उतरणं म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळण्यासमान आहे. मात्र कावेरी हे आव्हान स्वीकारते आणि तलावत उतरते. कावेरीचा जीव वाचणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल. (Actress Girija Prabhu)

अभिनेत्री गिरीजा प्रभूसाठी हा सीन साकारणं आव्हानात्मक होतं. साडी नेसून तलावात उतरणं म्हणजे तारेवरची कसरत. बॉडी डबल न वापरता गिरीजाने हा सीन पूर्ण केला आहे. कुडाळ येथील वालावल मंदिराजवळच्या तलावात हा सीन शूट करण्यात आला आहे. दलदल आणि कमळांचं पसरलेलं जाळं यामध्ये शूट करणं जोखमीचं होतं. मात्र मालिकेच्या संपूर्ण टीमच्या मदतीने गिरीजाने यशस्वीरित्या हा सीन पूर्ण केला. जवळपास तीन तास या सीनचं शूट सुरु होतं. संपूर्ण टीमच्या मेहनतीचं हे फळ आहे असं अभिनेत्री गिरीजा म्हणाली.

या आधीही गिरिजाने आपल्या भूमिकेसाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतले आहे.या भूमिकेसाठी गिरीजा जवळपास महिन्याभरापासून लाठीकाठीचं प्रशिक्षण घेत होती. काठी कशी पकडायीच इथपासून सुरु झालेला गिरीजाचा प्रवास आता काठीचा उपयोग करुन स्वरक्षण कसं करायचं इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.गिरीजाला नृत्यकला उत्तमरित्या अवगत आहेच. या मालिकेच्या निमित्ताने गिरीजा लाठीकाठीही शिकली.
=================================
हे देखील वाचा: ना Priyanka Chopra ना Deepika Padukone तर ‘या’ अभिनेत्रीकडे आहे थेट स्वतःच आयलंड…
=================================
तेव्हा ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा खेळ प्रचलित आहे. स्वसंरक्षण हा मुख्य हेतू असलेला हा खेळ शारिरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. लाठीकाठीचं हे प्रशिक्षण फक्त मालिकेपुरतं नाही तर आयुष्यभर माझ्यासोबत राहिल. ही कला प्रत्येकाने शिकायला हवी असं यानिमित्ताने मी आवाहन करेन.” अस गिरिजा म्हणाली होती. तेव्हा लाठीकाठीचं प्रशिक्षण आणि आता एका सीनसाठी चिखलात उतरणे याचा अर्थ भूमिकेला जिवंत अणि खर दिसण्यासाठी गिरिजा किती मेहनत घेतेय हेच यातून पहायला मिळतय. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ आपल्याला सोम. ते शुक्र. रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर पहायला मिळेल.