Apurva Nemlekar हिने व्हेलेंटाईनच्या दिवशीच बांधली लग्नगाठ; फोटो शेअर करत

तरुणाईच्या नात्यांची दाखवणाऱ्या‘Girlfriend Boyfriend’ सिनेमाची घोषणा; शिवानी बावकर, निखिल वैरागकर यांची मध्यवर्ती भूमिका!
व्हॅलेंटाइन डे… म्हणजेच प्रेमाचा उत्सव! प्रेमिकांसाठी खास असलेल्या या दिवसाच्याच शुभमुहूर्तावर एका नव्या, भव्य आणि तरुणाईच्या हृदयाला भिडणाऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड (Girlfriend Boyfriend) अस या सिनेमाच नाव असून प्रेम, मैत्री, नात्यांतील गुंतागुंत आणि आधुनिक भावविश्व यांची रंगतदार मांडणी करणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार आहे. शिव लोखंडे ( Shiv Lokhande) आणि ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांच्या प्रस्तुतित साकारत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती करण के के यांनी केली असून, सरोज परदेशी, समृद्धी राज आणि विनोद कांबळे हे सहनिर्माते आहेत. शिवाकांत तिवारी यांनी एसोसिएट प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शनाची धुरा रेखा करन यांनी समर्थपणे पेलली आहे.(Girlfriend Boyfriend Marathi Movie)

या चित्रपटात दमदार आणि लक्षवेधी कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. शिवानी बावकर ( Shivani Baokar) निखिल वैरागर (Nikhil Vairagar), सक्षम कुलकर्णी, ऐश्वर्या शिंदे, अक्षय टंकसाळे, किशोर चौघुले, अभय कुलकर्णी, राजश्री पोहेकर-कुलकर्णी, समृद्धी राज आणि सोमन चौहान हे सर्व कलाकार आपल्या अभिनयातून कथेला वेगळ्या उंचीवर नेणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना अभिनयाची मेजवानी मिळणार, यात शंका नाही. “Girlfriend Boyfriend” हा केवळ प्रेमकथा नसून आजच्या पिढीच्या नात्यांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. सोशल मीडियाच्या आणि एआयच्या युगात नाती कशी जुळतात, कशी तुटतात आणि त्यामध्ये विश्वास, निष्ठा, कमिटमेंट यांचा नेमका अर्थ काय राहतो. याचा वेध हा चित्रपट घेणार आहे. अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा प्रेक्षकांना भावनांच्या वेगवेगळ्या छटांमधून प्रवास घडवणार आहे.

प्रेम ही संकल्पना कालातीत आहे. अनेक चित्रपटांनी प्रेमाचे विविध पैलू उलगडले असले तरी प्रत्येक काळ प्रेमाला नवा अर्थ देत असतो. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान जगात तरुणाई प्रेमाकडे कशा नजरेने पाहते? नात्यांमध्ये स्वातंत्र्य आणि बांधिलकी यांचा समतोल कसा साधला जातो? आणि ‘गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड’ या नात्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या सहवासाचा अर्थ काय असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न हा चित्रपट करणार आहे. (Girlfriend Boyfriend Marathi Movie)
==================================
==================================
तरुणाईच्या भावविश्वाला भिडणारी, मनाला स्पर्श करणारी आणि विचार करायला भाग पाडणारी ही कथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. प्रेम दिनाच्या निमित्ताने जाहीर झालेला “Girlfriend Boyfriend” हा चित्रपट येत्या काळात चर्चेचा विषय ठरणार, हे निश्चित!