‘Mi Pathishi Ahe’ सांगणार नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी

Michelle Trachtenberg : हॉलिवूड अभिनेत्रीचं वयाच्या ३९व्या वर्षी निधन
बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु करणारी हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्ग हिचं वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. तिच्या आकस्मिक निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. मिशेलचा मृतदेह न्यूयॉर्कमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला असून अद्याप तिच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलं नाही आहे.शिवाय या प्रकरणाची गंभीरता सांभाळून माध्यमांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती मिशेलच्या घरच्यांनी केली आहे. (Michelle Trachtenberg)

मिशेलच्या (Michelle Trachtenberg) कुटुंबियांनी आणि सहकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही काळ मिशेल मानसिक त्रासातून जात होती आणि त्यामुळेच तिची तब्येत बरी नव्हती. परंतु, इतका अचानक तिचा (Gossip Girl) मृत्यू होईल असं कुणाला ही वाटलं नव्हतं. तसेच, न्युयॉर्क पोलिसांनी प्राथमिक तपासात नैसर्गिकरित्याच मिशेलचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. परंतु, तरीही तिच्या मृत्यूचा अधिक तपास सुरुच आहे. (Hollywood film industry)
==================
हे देखील वाचा : Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा
==================
मिशेलच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास चित्रपट आणि टीव्ही जगात तिचं मोठं नाव होतं. मिशेलने लहानपणी एका टीव्ही जाहिरातीद्वारे अभिनयाला सुरुवात केली. यानंतर, १९९० ते २००० च्या दशकात, तिने हॉलिवूडमध्ये चित्रप आणि मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे लोकप्रियता मिळवली. तिने (Michelle Trachtenberg) ‘युरोट्रिप’, ‘आइस प्रिन्सेस’, ‘किलिंग केनेडी’ आणि ‘सिस्टर सिटीज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर मिशेलने ‘Gossip Girl’ मध्येही मुख्य भूमिका साकारली होती. २०२१ मध्ये मिशेलरीने मीट, मॅरी, मर्डर ऑन टुबी या खऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारित काही माहितीपटांसाठी होस्ट म्हणून काम केलं होतं. (Hollywood update)