Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Govardhan Asrani : भारतीय चित्रपटसृष्टीतील हास्यवीर!
भारतीय चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचं २० ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झालं… एकेकाळी बॉलिवूडमध्ये एखादा रोल मिळवण्यासाठी वणवण करणाऱ्या या अभिनेत्याने भारतीय चित्रपटसृ्ष्टीत आपल्या विनोदी अभिनयाने अशी अविट छाप उमटवली की हिरोच्या अभिनयालाही त्यांनी बऱ्याचदा मागे टाकलं… जाणून घेऊयात विनोदवीर असरानी यांचा जीवनप्रवास….

पुण्यातील एफटीआयमधून असरानी यांनी अभिनयाचं शिक्षण पुर्ण केलं… असरानी यांचा चेहरा फारसा देखणा नाही असं बऱ्याच मेकर्सनी त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी कॉमेडी पात्रांवर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली… असरानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “माझ्या दृष्टीने कॉमेडी म्हणजे फक्त हसवणं नाही तर सत्यापर्यंत पोहचण्याचा हा एक मार्ग आहे… हसण्याच्या माध्यमातून आपण आपल्या भीतीतून बाहेर पडतो…”

उत्कृष्ट अभिनेता असूनही असरानींच्या वाटेला फार स्ट्रगल आलं होतं… एकेकाळी असरानी यांना गुलाजर साहेब म्हणाले होते की, तुझा चेहरा विचित्र आहे, मी तुला व्यावसायिक अभिनेता मानत नाही… इतकंच नाही तर आणखी एका दिग्दर्शकाने देखील ‘तुम्ही हिरो किंवा विलेन सारखे दिसत नाहीत. त्यामुळे तुला कोणती भूमिका द्यावी?’ असं म्हटलं होतं… लोकांकडून या प्रतिक्रिया ऐकल्यामुळे असरानी यांनी बॉलिवूडला रामराम केला आणि साऊथकडे मोर्चा वळवला होता… त्यांनी साऊथमधल्या प्रमुख अभिनेत्या आणि दिग्दर्शकांसोबत काम केलं… त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये संधी मिळाली. बी.आर. चोप्रा यांनी त्यांना निकाह चित्रपटात काम दिले. लोकांनी सांगितले की ते या भूमिकेसाठी योग्य नाहीत, मात्र तरीही चोप्रा यांनी संधी दिली आणि नंतर चित्रपट हिट झाला.
================================
हे देखील वाचा : Dilwale Dulhania Le Jayenge : राज-सिमरनच्या लव्हस्टोरीला ३० वर्ष पूर्ण
================================
यानंतर असरानी यांनी जवळजवळ पाच दशके बॉलिवूडमध्ये भन्नाट पात्र साकारली…त्यांनी ‘हम नहीं सुधरेंगे’,’दिल ही तो है’, ‘उडान’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. तसेच, त्यांनी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या ‘शो’लेमध्ये जेलरची भूमिका केली होती, यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली…. ‘गुड्डी’, ‘बावर्ची’, ‘नमक हराम’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्येही त्यांनी कामं केली… प्रेक्षकांना अजरामर भूमिकांचा ठेवा देऊ करणाऱ्या असरानी यांना कलाकृती मीडियातर्फे भावपू्र्ण आदरांजली…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi