Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

गोविंदा आला रे….
कृष्णजन्म आणि गोपालकाला हे दोन दिवस तमाम भारतीयांसाठी उत्सवाचे असतात. भगवान कृष्णाच्या जन्माचा उत्सव जसा जोशात साजरा केला जातो….तसाच दुस-या दिवशी गोपालकाला साजरा होतो. मुंबई आणि परिसरात तर मोठमोठ्या दहीहंड्या लागतात…आणि त्या फोडण्यासाठी बालगोपाळांची गर्दी होते. यावर्षी कोरोनाचं सावट या दहीहंड्यावरही रहाणार आहे. त्यामुळे सर्वत्र शांतता असेल…पण या शांततेत एक गाणं मात्र आपल्याला गोविंदामय करणार हे नक्की…गेली 57 वर्ष हे गाणं गोपालकाल्याच्या दिवशी हमखास लागतं…आणि तमाम गोविंदांना उर्जा देऊन जातं…हे गाणं म्हणजे,
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
अरे एक दो तीन चार संग
पाँच छः सात हैं ग्वाला
गोविंदा आला रे आला

1963 मध्ये आलेल्या ब्लफ मास्टर या चित्रपटातील या गाण्याने गेली कित्येक वर्ष तमाम बालगोपाळांना ठेका धरायला लावला आहे. 1963 मध्ये मनमोहन देसाई दिग्दर्शित आणि सुभाष देसाई निर्मित या ब्लफ मास्टर या चित्रपटातील गोविंदा आला रे आला…हे गाणं. शम्मी कपूर, सायरा बानू, प्राण, ललिता पवार, मोहन चोटी हे यातील प्रमुख अभिनेते. शम्मी कपूर यांच्या बहारदार अभिनयानं हा चित्रपट लक्षात राहीला. एक फोटोग्राफर….आपल्याच मासिकाच्या संपादकाच्या मुलीचा फोटो काढतो…मग त्या दोघांचं भांडण…आणि त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी…त्यात येणारे व्हिलन…असा नेहमीसारखी कथा असणारा हा चित्रपट…असे असले तरी यातील गाण्यांमुळे चित्रपटाची गोडी वाढली आहे. त्यातील गोविंदा आला रे आला…हे गाणं तर शम्मी कपूर यांच्या अभिनयाचं आणि नृत्य कौशल्याचं प्रतिक आहे. शम्मी कपूर नृत्य करतांना कोरीओग्राफरची मदत घेत नसत…त्यांचा स्टाईल ही बेफाम होती…ही नृत्याची फ्री स्टाईलच त्यांच्या चाहत्यांना आवडत असे…गोविंदा आला रे आला या गाण्यात त्यांनी सर्वसामान्य मुंबईकर साकारला आहे. गोविंदा म्हटलं की मुंबईतील तमाम तरुण दहीहंडी फोडण्यासाठी गर्दी करतात. या तरुणांचे रुप शम्मी कपूर यांनी बल्फ मास्टरमध्ये साकारले आहे… हाताच्या बाह्या दुमडून बेफाम नाचणारा शम्मी कपूर प्रत्येकालाच आपलेसे वाटले…
महमंद रफी यांच्या आवाजातील गोविंदा आला रे आला या गाण्याला कल्याणजी आनंदजी संगीत दिलं आहे. या अजरामर गाण्याचे बोल लिहिले आहेत, राजेंद्र कृष्ण यांनी…राजेंद्र कृष्ण हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या जमान्यातील सर्वात चहेते गीतकार म्हणून ओळखले जात. गीतकार आणि पटकथा लेखक म्हणून त्यांची ओळख होती. शंकर-जयकिशन, राजेश रोशन, मदन मोहन, हेमंत कुमार, सज्जाद हुसेन, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, एस. मोहिंदर, चित्रगुप्त, सलील चौधरी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासह इतर अनेक दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर राजेंद्र कृष्णा यांनी सुनो सुनो ए दुनिया वालों बापू की ये अमर कहाणी… हे बापू की अमर कहानी या चित्रपटातील गाण लिहिलं…गाणे लिहिले. 1948 मध्ये आलेला हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला. राजेंद्र कृष्ण यांच्याबाबतीत आणखी एक किस्सा सांगितला जातो, तो म्हणजे घोडंयाच्या शर्यंतीत त्यांनी 4,600,000 रुपयांचा जॅकपॉट जिंकला होता.

ब्लफ मास्टरबाबत बोलायचं म्हटलं तर गोविंदा आला रे आला या गाण्याव्यतिरिक्त या चित्रपटातील अन्य गाणीही गाजली. शम्मी कपूर यांनी एका गाण्यात महिलेची भूमिकाही केली आहे. चली चली कैसी हवा ये कैसी…के भौरे पे मरने लगी है कली…या कव्वालीमध्ये शम्मी कपूर महिला गायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. एकूण काय यावर्षी जरी कोरोनाचं सावट गोविंदावर असलं तरी…गोविंदा आला रे आला…या गाण्यावर कोणतंही बंधन नसणार…यावर्षीही शम्मी कपूर बेफाम होऊन नाचणार…त्यांना बघून आपण आपली हौस पूर्ण करुया…
-सई बने