Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

Bigg Boss Marathi Season 6 : आला रे आला…!! बिग

Border 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Kishore Kumar याच्या आयुष्यात ‘चार’ या क्रमांकाचे काय महत्व होते?

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा

‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर;

Sushmita Sen वयाच्या 50 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने स्वतः

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna

Human Cocaine चित्रपटाचा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”

 Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”
मिक्स मसाला

Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”

by रसिका शिंदे-पॉल 11/03/2025

Govinda विरारच्या मुलाने अभिनय आणि आपल्या नृत्याच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपासून तर तो त्याच्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जेम्स कॅमरॉन यांच्या Avatar चित्रपटाचं नाव गोविंदा यांनी सूचवल्याचं त्यांनी म्हटलं असून मुख्य भूमिका देखील ऑफर केल्याचं म्हटलं आहे. (Govinda)

मुकेश खन्ना यांच्याशी बोलताना गोविंदाने अवतार चित्रपटाचा उल्लेख करत म्हटलं की, लंडनमध्ये एका माणसाने मला जेम्स कॅमरॉनशी भेट घडवून दिली होती आणि मी त्याचा चित्रपट करावा असं मला सुचवलं होतं. मी जेम्सला जेवायला बोलावलं आणि बातचीत करत असताना त्यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितलं. मुळात अवतार हे चित्रपटाचं नाव मीच सुचवलं आहे. जेम्सने (James Cameron) मला सांगितलं की त्यांच्या या चित्रपटात मी  प्रमुख भूमिका साकारावी. शिवाय त्यांनी मला १८ कोटी रुपये आणि चित्रिकरणासाठी १० दिवस द्या असं सांगितलं. पण मी म्हणालो की ते शक्य नाही; कारण जर का मी शरीर पेंट केलं तर मला रुग्णालयात जावं लागेल”. (Bollywood update)

जेम्स कॅमरॉनचा ‘अवतार’ (Avatar) तर गोविंदाने नाकारलाच पण बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मधील भूमिकाही रिजेक्ट केल्याने त्याला ऑफिसमधून बाहेर काढण्यात आलं होतं असा त्याने खुलासा केला. गोविंदा म्हणाला की,”रेणु चोप्रासोबत माझी चांगली मैत्री होती. मी त्यांच्या घरीही अनेकदा जायचो. एक दिवस मला बी आर चोप्रांनी ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांनी मला महाभारत मधील अभिमन्युची भूमिका ऑफर केली. मात्र माझ्या आईने मला या भूमिकेला नकार द्यायला सांगितलं. माझी आई साध्वी होती आणि तिने मला ही भूमिका न करण्याचा सल्ला दिला होता.”(entertainment masala)

==================

हे देखील वाचा :Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा

==================

पुढे तो म्हणाला, “तेव्हा मी बीआर चोप्रांकडे इन्फ्लुएन्शियल फिगर म्हणून बघत नव्हतो. माझा नकार त्यांना अजिबात आवडला नाही. त्यांनी माझ्या आईला वेडी आहे ती असंही म्हटलेलं. ते जरा संतापले होते. मी त्यांना म्हणालो सर, ‘माझ्या आईने शारदा हा पहिला सिनेमा केला होता. तिने ९ सिनेमे केले आहेत. ती तुमची सीनिअर आहे. माझे वडीलही सीनिअर आहेत. मी स्ट्रगल करतोय. ती जे सांगते तेच होतं.’ मी नंतर जेव्हा आईला हे सांगितलं तेव्हा तिने मला त्यांच्यासमोर जाऊन अभिनय करण्याचा सल्ला दिला. तसंच तुमचा विचार मी खाल्ला असंही सांगितलं. नंतर बीआर चोप्रांनी मला हा वेडा आहे म्हणत बाहेर काढलं होतं.”(Govinda)

दरम्यान, गोविंदाने १९८६ मध्ये इल्जाम या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘सिंदूर’, ‘शिवा-शक्ती’, ‘हत्या’, ‘कर्ज’, ‘आवारगी’, ‘स्वर्ग’ अशा अनेक चित्रपटात कामं केली होती. तसेच, लवकरच तो ‘रंगीला राजा’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंज करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress avatar Bollywood Bollywood Chitchat Bollywood trending news bollywood update Celebrity entertainment masala entertainment tadaka govinda Hollywood james cameron
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.